हॅपनिंग

सीएमव्हीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत

मुंबई (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील सन २०२२ मध्ये २७४ गावातील १५६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकाचे सीएमव्ही “(कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १९ कोटी ७३ लक्ष एवढी रुपये मदत वितरण करण्याचे” आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले आहे. तसेच याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. सीएमव्ही या रोगामुळे केळी या बहुवार्षिक पीकांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची मदत देण्यात आली आहे, असे देखील मंत्री पाटील यांनी सांगितले.

 

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले, केळी हे बहुवार्षिक पीक जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण पीक आहे. जळगाव जिल्ह्याला केळीचे आगार मानले जाते. मात्र, केळी उत्पादक शेतकऱ्यांचे सन २०२२ मध्ये सीएमव्ही या केळी पीकावरील रोगामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सन २०२२ मध्ये जळगाव जिल्ह्यातील एकूण २७४ गावातील १५६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकाचे सीएमव्ही (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाले आहे. या रोगामुळे बाधित झालेले एकूण क्षेत्र ८७७१ हेक्टर एवढे होते. जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेचा निकष पाळून दि. २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयातील सुधारित दर व निकषांप्रमाणे एकूण १९ कोटी ७३ लक्ष एवढी मदत देण्यात आली आहे. वातावरणातील बदलामुळे केळी उत्पादक शेतकरी हा अडचणीत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रतिकूल परस्थिती असतानाही शेतकरी मोठ्या प्रमाणात केळी पीक घेत असतात.

 

Nirmal Seeds

 

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले, “तत्कालीन वादळी पावसाच्या तडाख्याने केळीबागांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांनी नवीन लागवड केलेल्या केळीबागांवर हे संकट आले होते. हे संकट आस्मानी नसून एका व्हायरसचे होते. केळीच्या खोडावर सीएमव्हीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. जून महिन्यात २०२२ मध्ये झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी केळी जमीनदोस्त झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची मदत देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळेल.

 

Ajit seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

 

Related Articles

Back to top button