कृषी क्षेत्रातील आव्हाने असूनही ‘ॲग्रिप्लास्ट’चे सहसंस्थापक अभिषेक भट्ट आणि शशांक भट्ट या दोन भावांनी एकत्र येऊन एक समृद्ध ब्रँड तर तयार केलाच, शिवाय शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून टाकला आहे. वडिलांकडून मिळालेल्या 50 हजार रुपयांच्या कर्जापासून ते गेल्या वर्षी 50 कोटींच्या व्यवसायापर्यंतचा या भावंडांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
देशाचा कणा म्हणून ओळखले जाणारे भारताचे कृषी क्षेत्र परंपरा, आव्हाने आणि संधींचा गुंतागुंतीचा समूह आहे. येथील बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात राहत असल्याने केवळ अन्नसुरक्षाच नव्हे, तर उपजीविका टिकविण्यातही शेती महत्त्वाची भूमिका बजावते. तथापि, या क्षेत्राला असंख्य आव्हानांचा सामना करावा लागला आहे, ज्यात विखुरलेली जमीन, अत्यंत कमी तांत्रिक प्रगतीसह कालबाह्य शेती पद्धती आणि हवामान बदलामुळे अनियमित हवामानामुळे शेतकऱ्यांना मोकळ्या शेतात पिके घेणे अधिक कठीण झाले आहे.
धडपडणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात बदल
अनेक आव्हाने समोर उभी ठाकलेली असतानाही ‘ॲग्रिप्लास्ट’चे सहसंस्थापक अभिषेक आणि शशांक या दोन भावांनी मिळून एक समृद्ध ब्रँड तर तयार केलाच, शिवाय शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून टाकला आहे. त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी भिन्न असली तरी त्यांच्या सामायिक उद्योजकतेच्या भावनेने ॲग्रिप्लास्ट’च्या उल्लेखनीय प्रवासाचा पाया घातला. मोकळ्या शेतातील शेतीतून उदरनिर्वाहासाठी धडपडणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी एकत्र येऊन ॲग्रिप्लास्ट नॉर्थ लाँच केले.
शेतीत टिकून राहण्याबाबत शंका
सुरुवातीच्या काळात त्यांच्या प्रयत्नांबद्दल परिसरात साशंकता वाढली होती, कारण विविध आव्हानांमुळे ही जोडी किती काळ शेती करण्याच्या प्रयत्नात टिकून राहील, या क्षमतेबद्दल अनेकांना शंका होती. मात्र, त्यांच्या अढळ संयमाचे आणि चिकाटीचे फळ मिळाले. त्यांनी पिकांचे लक्षणीय उत्पादन मिळवले. त्यांच्या यशाची बातमी वणव्यासारखी पसरली. त्यानंतर विविध भागातील शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित झाले, जे त्यांच्या शेतीतील नाविन्यपूर्ण गोष्टींपासून शिकण्यास उत्सुक होते.
नवा दृष्टीकोन घेऊन शेती
2011 मध्ये या दोघांनी बी.टेक. आणि एमबीए पूर्ण केल्यानंतर नोकरी सोडली आणि 5 एकर भाडेतत्त्वावरील जमिनीवर शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीत उत्पन्न वाढवून आपले जीवन बदलू शकते, असा विश्वास शेतकऱ्यांना वाटावा, यासाठी त्यांनी शेतीतील नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला.
एकरी 2 लाखांवरून 25 लाखांपर्यंत
ठिबक सिंचन, मल्चिंग, नेटहाऊस, पॉलीहाऊस, ऑटोमेशन यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे उद्योजक बांधव शेतकऱ्यांच्या उत्पन्नात बदल घडवून आणत आहेत. त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न एकरी दोन लाख रुपयांवरून ते एकरी 25 लाख रुपयांपर्यंत पोहोचवले आहे. अभिषेक आणि शशांक या दोघा भावंडांचा प्रभाव त्यांच्या स्वतःच्या गावापलीकडे पसरला, कारण त्यांनी 15,000 हून अधिक शेतकऱ्यांना यशस्वीरित्या प्रशिक्षित केले. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढविण्यासाठी नव्या कृषी पद्धती अवलंबून, तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचे विस्तृत जाळे आता त्यांनी स्थापित केले आहे.
अनेक इस्रायली शेती तंत्रज्ञान भारतात आणले
आज अभिषेक ॲग्रिप्लास्ट या संरक्षित लागवड कंपनीचे संचालक आणि बोर्ड सदस्य म्हणून कार्यरत आहेत. गेल्या दशकात अनेक इस्रायली तंत्रज्ञान भारतात आणून यशस्वी करण्यात त्यांची मोलाची भूमिका आहे. कंपनीच्या महसुली वाढीतही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच कंपनीची एकूण उलाढाल सुमारे 45 ते 50 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
शेतकरी वर्गात अतिशय दृढ नाते शशांक हे ॲग्रिप्लास्ट नॉर्थचे व्यवस्थापकीय
भागीदार आहेत. नव्या कल्पनांची अंमलबजावणी आणि सुनिश्चित पद्धतीने राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शेतकरी वर्गात अतिशय दृढ नाते त्यांनी निर्माण केले आहे. आता ते शेतकऱ्यांमध्ये सुपरिचित आणि आदरणीय आहेत. ॲग्रिप्लास्टच्या यशात त्यांच्या संवाद, संपर्क अन् समन्वय कौशल्याचा मोलाचा वाटा आहे. वडिलांकडून मिळालेल्या 50 हजार रुपयांच्या कर्जापासून कंपनी गेल्या वर्षी 50 कोटींच्या व्यवसायापर्यंतचा पोहोचली, या भावांचा प्रवास कमालीचा प्रेरणादायी आहे.
स्वच्छ अन्न आणि शाश्वत शेती
इस्रायली आणि डच तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कीटकनाशके आणि पाण्याचा वापर 90 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, परिणामी स्वच्छ आणि सुरक्षित अन्न उत्पादन झाले आहे. शिवाय, वर्षानुवर्षे कीटकनाशके आणि खतांच्या अतिवापरामुळे नुकसान झालेल्या पाणी आणि माती सारख्या आवश्यक संसाधनांचे जतन करण्यासाठी ॲग्रीप्लास्ट कंपनी समर्पित आहेत. त्यांचे उत्पादन प्रकल्प, शेतीचे विशाल जाळे आणि 15 पेक्षा जास्त देशांमध्ये जागतिक उपस्थितीसह, ॲग्रिप्लास्ट आणखी लक्षणीय वाढीसाठी सज्ज आहे. पुढील पाच वर्षांत भारतात अनेक कारखाने सुरू करण्याचे या भावंडांचे उद्दिष्ट आहे, शेतीत नवनवे तंत्रज्ञान आणताना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा 500 कोटी रुपयांचा ब्रँड ॲग्रिप्लास्ट बनवण्याचा अभिषेक आणि शशांक या भट्ट भावंडांचा मानस आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
ॲग्रिप्लास्ट नॉर्थ, 39, सेक्टर-1, शिव विहार कॉलनी, जानकीपुरम, लखनौ – 226021 (उत्तर प्रदेश)
कस्टमर केअर : 09935099590 ई-मेल : [email protected]
वेबसाईट : http://HTTPS://AGRIPLASTUP. COM/
ॲग्रो टॉक । एफपीओचा शेतकऱ्यांना फायदा काय ?, या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण माहिती