योग शिबिरे भरवून देशभरात योग क्रांती घडवून आणल्यानंतर योगगुरू बाबा रामदेव यांचे पतंजली आता देशात ग्रामविकास क्रांती घडवून आणणार आहे. समृद्ध ग्राम, पतंजली दिव्य योग मंदिर ट्रस्टतर्फे पाच दिवसीय कृषी उपक्रम प्रशिक्षण शिबिरे राबविली जाणार आहेत.
समृद्ध ग्राम, पतंजली दिव्य योग मंदिर ट्रस्टने आयोजित केलेल्या पहिल्या पाच दिवसीय कृषी उपक्रम प्रशिक्षण कार्यक्रमाचा परवा समारोप झाला. या कार्यक्रमाला पतंजली योगपीठाचे संस्थापक अध्यक्ष योगगुरू बाबा रामदेव आणि सरचिटणीस आचार्य बाळकृष्ण यांची उपस्थिती होती. योगानंतर पतंजली ग्रामीण क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे रामदेव यांनी म्हटले आहे.
चार शेतमजुरांचे काम आता एकचजण करणार… इलेक्ट्रिक बुल। Electric bull।
माती परीक्षण, व्यवसाय समृद्धी प्रशिक्षण
शिबिरात महिला उद्योजकांना नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आणि माती परीक्षणाचे महत्त्व या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना डॉक्टर ऑफ सॉईल किटचे प्रशिक्षणही देण्यात आले.
याशिवाय, महिला उद्योजकांना त्यांचा व्यवसाय समृद्ध करण्यासाठी स्टॉक आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी ॲनालिसिस, तसेच ई-मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग आणि सोशल मीडिया मार्केटिंग या विषयांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
खेड्यांचा स्वयंपूर्ण विकास करण्याचे पतंजलीचे उद्दिष्ट
स्वामी रामदेव म्हणाले, की खरा भारत आपल्या खेड्यांमध्येच राहतो. ग्रामीण भागात आर्थिक समृद्धीसह आजीविका वाढवून खेड्यांचा स्वयंपूर्ण विकास करण्याचे पतंजलीचे उद्दिष्ट आहे. स्वदेशीने भारावलेल्या चळवळीसह आर्थिक सुरक्षा प्रदान करून ग्रामीण विकासात पतंजलीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आमच्या कार्याची आज फक्त देशातच नव्हे तर जगभरात चांगली ओळख निर्माण झाली आहे.
शेतकरी मित्रांना एकत्र आणून मदत करायचीय
पतंजलीने योग क्रांती, ऋषी क्रांती आणि आता ग्रामीण भारतात आर्थिक समृद्धीची क्रांती आणण्याचा निर्धार केला आहे, असे स्वामी रामदेव यांनी सांगितले. आचार्य बाळकृष्ण म्हणाले की, आम्हाला आता शेतकरी मित्रांना एकत्र आणून मदत करायची आहे. आम्ही तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाने आर्थिक समृद्धी निर्माण करू इच्छीतो.
उत्तराखंड राज्य उपजीविका अभियानाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार पांडे यांनीही हा प्रशिक्षण कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल पतंजली परिवाराचे अभिनंदन केले आणि कृतज्ञता व्यक्त केली.
ते म्हणाले की, पतंजलीने उत्तराखंड प्रांतात उद्योग म्हणूनही एक वेगळी आणि जगप्रसिद्ध ओळख निर्माण केली आहे. त्याचा फायदा केवळ गावकऱ्यांनाच नाही तर उत्तराखंड राज्यातील सर्व उद्योजकांना होत आहे. पतंजली योगपीठाच्या आवारात आपण प्रशिक्षण घेत आहोत हे आपले भाग्य आहे आणि यातून आपण आर्थिक समृद्धी साधू शकतो.
करार शेती… म्हणजे शेतकर्यांसाठी हमखास उत्पन्नाची हमी। Contract Farming।
शेतकरी महिला उद्योजकांनी मानले पतंजलीचे आभार
कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त करताना शेतकरी महिला उद्योजकांनी पतंजलीचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, आम्ही योग्य प्रशिक्षण घेतले आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आम्हाला प्रथमच सांगितल्या गेल्या.
कार्यक्रमाची सांगता सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली, ज्यामध्ये उत्तराखंड राज्यातील समृद्धीची आनंददायी गाणी आणि लोकनृत्य सादर केली गेली.
लवकरच योग शिबिराच्या धर्तीवर पतंजली विद्यापीठस्थळी बोलावून देशभरातील शेतकऱ्यांना राज्यनिहाय ग्रामविकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- शेतकऱ्यांनो, आज-उद्याच आवरा महत्त्वाची कृषी खरेदी; राज्यातले 70 हजार कृषी केंद्र तीन दिवस राहणार बंद
- IMD Alert: हवामान पुन्हा बदलणार, 5 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; थंडी, धुकेही वाढणार