पुणे : जानेवारीपर्यंत पावसाचा मुक्काम लांबणार असल्याच्या बातम्या, दावे चुकीचे असल्याचे भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) स्पष्ट केले आहे. अशा कुठल्याही तथाकथित हवामान तज्ञांच्या भाकितावर विश्वास न ठेवता जनेतेने, शेतकऱ्यांनी हवामान विभागाचे अधिकृत सरकारी अंदाज पाहावेत, असेही आवाहन करण्यात आले आहेत.
काही माध्यमांनी गेल्या 2-3 दिवसात चुकीचे वृत्त पसरविले आहे. “जानेवारीपर्यंत पावसाचा मुक्काम वाढणार – हवामान खात्याचा इशारा” असे बातम्या पसरविल्या गेल्या. त्यासाठी स्वयंघोषित हवामान तज्ञांचे दाखले देण्यात आले. यासंदर्भात पुणे वेधशाळेने स्पष्टीकरण जारी केले आहे.
शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज। PMEGP Scheme।
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/ScTiASiJrCo
चुकीच्या बातम्या पसरविणे महाराष्ट्रासाठी धोकादायक
आयएमडी पुणेचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी ॲग्रोवर्ल्डला सांगितले, की “मीडियाने शेतकरी आणि सामान्य जनतेसाठी अशा तथाकथित स्वयं दावा केलेल्या तज्ञांकडून पूर्णपणे दिशाभूल करणारी माहिती कृपया काटेकोरपणे टाळली पाहिजे. हे खोटे दावे आहेत, त्यांचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही. दुर्दैवाने हे वारंवार घडत आहे. ते माझ्या महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे.”
होसाळीकर यांनी जाहीरपणे ट्विटरदवारेही हे स्पष्टीकरण सर्वसामान्य जनतेच्या माहितीसाठी प्रसारित केले आहे. त्यावर अनेक ट्विटर युजर्सनी आयएमडीचे शास्त्रीय अंदाज व धडपडीचे कौतुक केले आहे.
“विवेक”हीन वार्तांकनाबद्दल उपटले कान
कोणताही “विवेक” न बाळगता स्वयंघोषित तज्ञांचे बिनबुडाचे अंदाज व तार्किक पसरविणाऱ्या एका माध्यमाच्या प्रतिनिधीचेही होसाळीकर यांनी कान उपटले आहेत. संबंधित प्रतिनिधीने चूक करूनही आपला हेका सोडला नाही. त्याला त्यांनी सांगितले – “कृपया आपल्या चुकीचे समर्थन जारी ठेवू नका. आयएमडी वेबसाईट्स आणि ॲप 24 तास अपडेट्स देत असतात. तुम्हाला त्याची कल्पना नसेल तर कुठल्याही नजीकच्या किंवा पुण्यातील वेधशाळेला भेट द्या. लाईव्ह निरीक्षण, रडार, उपग्रह, पाऊस हे सर्व अनुमान, पूर्वानुमान आणि इशारे वेगवेगळ्या पातळीवर दिले जातात. विविध भाषांतून प्रेस नोटस् जारी केल्या जातात. सोशल मीडियावर माहिती दिली जाते.”
शिवचेतन नीतेकर यांनीही “विवेक”हीन बातम्यांचा समाचार घेतला आहे. ते संबंधित प्रतिनिधीला म्हणाले, “तुमच्यामुळे नाहक गैरसमज पसरतात आणि लोक चुकीचे निर्णय घेतात. तुम्हाला लाज वाटायला हवी खरेतर चुकीच्या बातम्या पसरवताना. हवामान खात्याची अधिकृत वेबसाईट, ट्विटर अकाऊंट आहेत तरी.”
बोगस अंदाज देणारी व्यक्ती भौतिकशास्त्र प्राध्यापक
शशिकांत मोगल यांनी चुकीचे अंदाज पसरविणारी व्यक्ती ही भौतिकशास्त्र प्राध्यापक असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यात प्रसारित होत असतात. त्यांना वेळीच आळा घातलेला बरा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
पोलिसात तक्रार देऊन अशा प्रवृत्ती रोखायला हव्या
सुशीन जाधव यांनी म्हटले आहे, की चुकीच्या बातम्या पसरविणाऱ्यांना कोणत्या आधारावर हवामान अंदाज देतात, याचा लेखी जाब विचारायला हवा असे सांगितले. अशा स्वयंघोषित तज्ञाविरुद्ध स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद द्यायला हवी, असेही ते सुचवितात. हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांना संबंधित विभागाचे प्रतिनिधी म्हणून हे करता येण्यासारखे आहे. खरे तर स्वयंघोषित तज्ज्ञांवर कारवाई व्हायला हवीच. त्यानंतर माध्यमेही अशा तज्ज्ञांचे अंदाज प्रकाशित करणार नाहीत, असेही जाधव यांनी म्हटले आहे.
Claim your super offer now; More than 100+ offers 👇
हवामान खात्याच्या नावाचा परस्पर गैरवापर कसा?
राजेंद्र जवळकर म्हणतात, हवामान खात्याने या अशा स्वयंघोषित तज्ञांवर व त्यांची चुकीची माहिती पसरविणाऱ्या माध्यमांवर कायदेशीर कारवाई करावी. हे तज्ञ हवामान खात्याचे नाव परस्पर कसे काय वापरत आहेत?
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Relief: रिटर्न मान्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण होणार; पुढील 3 दिवसात शेवटचे कमी दाब क्षेत्र
- धक्कादायक Climate Change : हवामान बदलामुळे वाढतेय उष्णता; दिल्लीत दीर्घकाळ उन्हाळ्याची शक्यता तब्बल 30 पटीने वाढली
- Amazing : पुण्यात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने साहिवाल वासरू घातले जन्माला; 27 किलो वजन
Comments 1