• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ऊस उत्पादनातून एकरी सव्वा दोन लाखांचा नफा

कासारे गावाचे ऊसभूषण गुलाबराव काकुस्ते यांची यशोगाथा

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2023
in यशोगाथा
0
ऊस उत्पादना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

भूषण वडनेरे 

धुळे : जिल्ह्यात साक्री तालुक्यातील कासारे येथील सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर गुलाबराव काकुस्ते (वय 69) यांनी आपल्या कुटुंबियांच्या मदतीने शेतीत क्रांती केली आहे. त्यांच्याकडे 48 एकर जमीन असून जमिनीची प्रत अतिशय साधारण असताना सेंद्रीय खत, शेणखत टाकून जमिनीची सुपिकता वाढविली. इतकेच नव्हेतर ठिबक सिंचन व सेंद्रीय खताचा वापर करुन त्यांनी एकरी तब्बल 108 टन उसाचे उत्पादन घेवून नवा विक्रम रचला. याबद्दल त्यांना साखर परिषदेत 5 जुलै 2022 रोजी मा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुणे येथे ऊस भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे त्यांना ऊस उत्पादनातून एकरी तब्बल 2 लाख 15 हजारांचा नफा झाला. याशिवाय ते कापुस, पपई, टरबुज, टमाटे व जनावरांसाठी चार्‍याचे उत्पादनही घेतात.

कासारे ता.साक्री येथील सेवानिवृत्त डेप्युटी इंजिनिअर गुलाबराव दशरथ काकुस्ते (69) यांची गावातच 48 एकर वडीलोपार्जीत शेती आहे. त्यांचे वडील कै. दशरथ सदा पाटील हे शेतीसोबतच सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. मात्र, शेती करत असताना त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होवू दिले नाही. त्यांना तीन मुले असून एक मुलगा डेप्युटी इंजिनियर, दुसरा मुलगा डॉक्टर तर तिसरा मुलगा प्राध्यापक आहे. वडीलांकडून वारसा घेत या परिवाराने मातीशी नाळ जोडून ठेवली.

डेप्युटी इंजिनिअर असलेले गुलाबराव काकुस्ते यांनी सेवानिवृत्तीनंतर स्वतःला शेतीत वाहून घेतले आहे. वडीलोपार्जीत असलेली शेतजमिन ही अतिशय साधारण प्रतीची असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होत होता. पण वाळूचे कण रगडीता तेलही गळे या म्हणीप्रमाणे गुलाबराव काकुस्ते यांनी जमिनीचा पोत सुधारण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांना आपल्या परिवाराची मोठी झाली. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी त्यांनी शेतीत गाळ टाकून ताग सारखे सेंद्रीय खत, शेणखत टाकून जमिनीची सुपिकता वाढविली. परिणामी उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली. आज जमिनीची सुपिकता इतकी वाढली आहे की ते आता विक्रमी उत्पादन घेवू लागले आहेत.

 

ऊस उत्पादनात अग्रेसर

श्री.काकुस्ते हे वडीलोपार्जीत परंपरागत उसाचे उत्पादन घेत आहेत. परंतु, त्यांनी शेतीला आधुनिकतेची जोड दिल्याने उसाचे विक्रमी उत्पादन होत आहे. गेल्यावर्षी त्यांनी सटाणा (ता.मालेगांव, जि.नाशिक) येथील द्वारकाधिश साखर कारखान्याच्या मार्गदर्शनाने 48 पैकी 20 एकर क्षेत्रात ऊस लावला होता. ठिबक सिंचन व सेंद्रीय खताचा वापर करून त्यांनी उसाचे एकरी तब्बल 108 टन उत्पादन घेतले. त्यांनी उसाचे 265 हे वाण लावले होते. विशेष म्हणजे त्यांच्या शेतातून दरवर्षी 1000 ते 1200 टन उस द्वारकाधीशला जातो.

Panchaganga Seeds

ऊसातून एकरी दोन लाखांचा नफा

श्री. काकुस्ते यांना ऊस उत्पादनाचा सुरवातीपासूनच दांडगा अनुभव आहे. त्यामुळे दरवर्षी त्यांच्या उत्पादनात वाढच होत आहे. गेल्या वर्षी त्यांनी 20 एकरात उसाची लागवड केली होती. त्यातून त्यांनी प्रती एकर 108.60 मेट्रीक टन इतके उत्पादन काढले. या उसाला प्रति मेट्रीक टन 2500 रुपये भाव मिळाला. म्हणजेच एकरी 2 लाख 71 हजार 500 रुपयांचे उत्पादन झाले. त्यातून 56 हजार रुपये खर्च वजा जाता एकरी 2 लाख 15 हजार 500 रुपयांचा निव्वळ नफा झाला. विशेष म्हणजेच ठिबक सिंचन व सेंद्रीय खतांचा वापर करुन ते उसाचे उत्पादन घेतात.

थोडक्यात महत्त्वाचे

काकुस्ते घेताहेत वडीलोपार्जीत परंपरागत ऊस पिकाचे उत्पादन
ऊस शेतीतून दोन लाखांचा मिळाला नफा
इतर पिकातूनही चांगले उत्पन्न
आधुनिक शेती करण्याचे नियोजन

 

श्री.काकुस्ते हे ऊसाबरोबरच इतर पिकांचीही लागवड करीत असतात. त्यात कापसाचीही दरवर्षी लागवड ठरलेली असते. गेल्यावेळी त्यांनी 15 एकरात कापसाची लागवड केली होती. त्यातून त्यांना एकरी सुमारे 15 क्विंटल कापूस निघाला. त्यास सरासरी 8 हजारांचा भाव मिळाल्याने एकरी एकूण 1 लाख 20 हजारांचे उत्पादन झाले. त्यातून एकरी खर्च 45 हजार रुपये वजा जाता एकरी 75 हजार रुपये निव्वळ नफा झाला. तर पाच एकरात पपईची लागवड करुन त्यात अडीच एकरात वेलवर्गीय असलेले टरबूज व अडीच एकरात काकडीची लागवड केली होती. म्हणजेच जागेचा पुरेपूर उपयोग करत त्यांनी पाच एकरात त्यांनी पपईसोबतच टरबूज व काकडीही लावली. यातूनही समाधानकारक उत्पन्न झाल्याचे श्री.काकुस्ते यांनी सांगितले. शिवाय शेतातच कांदाचाळ असल्याने लागवडीतूनही ते दरवर्षी चांगला नफा कमवितात.

असे आहे पाण्याचे नियोजन

श्री.काकुस्ते यांची बागायती शेतजमिन असून एकूण 48 एकर जमीनीपैकी 35 एकर जमिन ठिबक सिंचनाखाली आहे. शिवाय शासनाच्या योजनेतून शेतात 60 बाय 75 फुट आकाराचे शेततळे केले असून त्यात पाण्याची सोय केली आहे. शिवाय शेतीला चार विहिरींद्वारे पाणी पुरवठा होतो. पाण्याची मोठया प्रमाणात उपलब्धता असली तरी ठिंबक सिंचनाचा वापर करुन पाण्याच्या कमी वापरावर त्यांचा भर असतो. तसेच कांदाचाळ अनुदान योजनेचा लाभ घेत शेतात दोन कांदाचाळी केल्या आहेत. तसेच शेतमाल साठविण्यासाठी दोन गोदामही केले आहेत. त्यामुळे शेतीमालाची नुकसान होत नाही. व त्यास भावही चांगला मिळत असल्याचे काकुस्ते सांगतात.

सात जणांना कायमस्वरुपी रोजगार

काकुस्ते यांच्याकडे असलेल्या 48 एकरावरील पिकांची व्यवस्था, जनावरांची देखभाल करण्यासाठी 7 गडी कायमस्वरुपी कामावर असतात. त्यांच्या माध्यमातून सात जणांना रोजगार मिळून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला आहे. या गाड्यांसाठी त्यांनी शेतातच निवासाची सोय केली आहे. असे असले तरी श्री.काकुस्ते हे स्वत: न चुकता शेतात हजेरी लावतात. तसेच पिकांच्या व्यवस्थापनाची दैनंदिन कामे ठरवून देत असतात. यासाठी काकुस्ते यांना आपल्या कुटुंबियांची भक्कम साथ मिळत आहे.

एकत्र कुटूंबामुळे शेती सुकर

आजकाल मजूर मिळणे कठीण झाल्याने शेती करणे अवघड असल्याचे आपण सर्वत्र ऐकत असतो. परंतु, काकुस्ते हे यास अपवाद ठरतात. कारण आजही काकुस्ते यांचे एकत्र कुटुंब असून भावांसह पुतण्या व परिवारातील सदस्यांची मोठी मदत होत असल्याचे काकुस्ते सांगतात. गुलाबराव काकुस्ते हे कासारे येथील माजी सरपंच कै. दशरथ सदा काकुस्ते यांचे सुपूत्र तर डॉ.संभाजी काकुस्ते व साक्री पं.स.चे माजी सदस्य तथा प्रा.युवराज काकुस्ते यांचे बंधू तर पोलीस पाटील दीपक काकुस्ते यांचे काका आहेत. पुतणे दीपक काकुस्ते हे कासारे गावाचे पोलीस पाटील आहेत. ते डीएड, बीए व शेतकी पदवीकाधारक असून नोकरीपेक्षा त्यांचाही शेतीकडेच अधिक कल आहे. विशेष म्हणजे त्यांनी आधुनिक पध्दतीने शेती करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून श्री.काकुस्ते यांच्या परिवाराची ख्याती आहे.

Planto

राज्यस्तरीय साखर परिषदेत गौरव

श्री. काकुस्ते यांनी राज्यात सन 2020-21 या वर्षात मध्य विभागात पुर्व हंगामात उसाचे हेक्टरी 270 टन विक्रमी उत्पादन घेतले. याची दखल घेत त्यांना पुणे येथील साखर परिषदेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे ऊसभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गत 5 जून रोजी राज्यस्तरीय परिषदेत खा.शरदचंद्र पवार यांच्या हस्ते त्यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. यावेळी राज्याचे तत्कालिन आरोग्यमंत्री राजेश टोपे, तत्कालिन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, द्वारकाधीश सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शंकरराव सावंत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांना राज्यस्तरावरील पुरस्कार मिळाल्यामुळे साक्री तालुक्याच्या नावलौकीकात भर पडली. शिवाय इतर शेतकर्‍यांनाही प्रेरणा मिळाली.

कुटुंबियांची साथ मोलाची!

तीन भावांचे एकत्र कुटूंब असल्यामुळे शेतीची कामे करणे सोपे व सोईस्कर जाते. एकमेकाला सोबत घेवून शेती क्षेत्रात कशी जास्तीत जास्तीत-जास्त प्रगती करता येईल, यावर भर दिला जातो. उच्च तंत्रज्ञानाचे शेती अवजारे वापरुन तसेच भविष्यात सेंद्रीय शेतीवर भर देवून उत्पादन अधिकाधिक कसे वाढेल, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच कृषी विदयापीठाकडून मार्गदर्शन घेवून उत्पदन दुप्पट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– गुलाबराव काकुस्ते,
प्रगतशील शेतकरी,
कासारे, ता.साक्री, जि. धुळे

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • तेलंगणा राज्यात पायाभूत सुविधांमुळे कृषी क्षेत्र 15% नी वाढले..; उत्पादकतेत देखील भरीव वाढ
  • Mashroom Farming Success Story : नोकरी सोडून केली मशरुमची शेती

Share this:

  • Facebook
  • X
Tags: ऊस उत्पादनगुलाबराव काकुस्तेठिबक सिंचनसेंद्रीय खत
Previous Post

तेलंगणा राज्यात पायाभूत सुविधांमुळे कृषी क्षेत्र 15% नी वाढले..; उत्पादकतेत देखील भरीव वाढ

Next Post

सध्या कापसाला मिळतोय असा भाव ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

Next Post
कापूस बाजारभाव

सध्या कापसाला मिळतोय असा भाव ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.