• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

‘एक दिवस शेतकऱ्यांसोबत’ हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवा – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडास्तरीय कृषी आढावा बैठक

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 29, 2022
in तांत्रिक
2
एक दिवस शेतकऱ्यांसोबत

कृषी आढावा बैठक

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जालना : शेतकरी समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल, यासाठी शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांची लागवड, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत शेतकरी आत्महत्या होणार नाहीत यादृष्टीने कृषी धोरणामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच शेत पिकांच्या नुकसानीच्या भरपाईपासुन एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी “एक दिवस शेतकऱ्यांसोबत” हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.

कृषी विभागाचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच श्री सत्तार यांनी मराठवाड्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कृषी विषयक बाबींचा आढावा घेतला. त्याप्रंसगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी मंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर व मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

किसान क्रेडिट कार्ड योजना ; यासाठी मिळू शकते २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/SckaImzMZFk

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित या बैठकीस आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडित भुतेकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय‍ शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद डॉ. दिनकरराव जाधव, विभागीय कृषी सहसंचालक लातूर साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, आत्माच्या शितल चव्हाण यांची उपस्थिती होती.


कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, वातावरणामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळी परिस्थिती, पीकांवर रोगराई आदींमुळे अपेक्षित उत्पन्नापेक्षाही कमी उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडते. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई प्रत्येक शेतकऱ्याला मिळावी, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी महसुल, कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे निर्देश मंत्री श्री सत्तार यांनी यावेळी दिले.

Ellora Natural Seeds

शेतीच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची निकड असते. दरवर्षी जिल्ह्यातील बँकांना खरीप व रब्बीसाठी पीकककर्जाच्या वाटपाचे उद्दिष्ट देण्यात येते. पीककर्ज घेत असताना शेतकऱ्यांना अनेक समस्या भेडसावतात. ही परिस्थिती बदलून प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळावे यादृष्टीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पीककर्ज वाटपाबाबत बँक अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन शेतकऱ्यांना सहज व वेळेत पीककर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून पीक लागवडीची शेतकऱ्यांना बांधावर प्रत्यक्ष जाऊन कृषी सहाय्यकांनी माहिती द्यावी. गावा-गावात होणाऱ्या ग्रामसभांच्या माध्यमातुन बदलत्या हवामानानुसार शेतकऱ्यांना पीक पेरणीची माहिती देण्यात यावी. पेरणीसाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारी बि-बियाणे, खतेही उत्कृष्ट दर्जाची व योग्य भावामध्ये दिली जातील. तसेच यामध्ये कुठल्याही प्रकारचा काळाबाजार होणार नाही, यादृष्टीने कृषी विभागाने काळजी घेण्याची सुचनाही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.

Neem India

शेतीची मशागत करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा, संकटांचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या व्यथा व त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी “एक दिवस शेतकऱ्यांसोबत” हा उपक्रम संपुर्ण राज्यभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा श्री. सत्तार यांनी यावेळी केली. या माध्यमातून कृषी मंत्र्यांसह महसुल व कृषी विभागातील प्रमुख अधिकारी संपुर्ण दिवस शेतकऱ्यासोबत राहून त्यांचे प्रश्न समजुन घेतील. या उपक्रमाची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात येणार असुन पावसाळी अधिवेशनानंतर हा उपक्रम राज्यभर राबविण्याच्या सुचनाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिल्या.

यावेळी विभागीय कृषी सहसंचालक डॉ. दिनकरराव जाधव व साहेबराव दिवेकर यांनी औरंगाबाद व लातूर विभागात झालेल्या पेरण्या, पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, पीककर्जाचे वाटप आदी माहिती पॉवर पॉईंटच्या माध्यमातून मंत्री महोदयांना दिली.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • अतिपावसामुळे कापसात बोंडसड, आकस्मिक मर व नैसर्गिक गळ ; जाणून घ्या.. यावरील लक्षणे व उपाय..
  • Medicinal Plants Nursery : शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नासाठी फायदेशीर औषधी वनस्पती नर्सरी

 


 


 


 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अतिवृष्टीआधुनिक तंत्रज्ञानएक दिवस शेतकऱ्यांसोबतकृषिमंत्री अब्दुल सत्तारकृषी विभागगारपीटजिल्हाधिकारी कार्यालयदुष्काळी परिस्थितीपीकांवर रोगराई
Previous Post

शाश्वत विकास संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरपंचांचा सहभाग महत्त्वाचा – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

Next Post

भारतातून अमेरिकेला व्हेगन मीटची (शाकाहारी मटन) पहिली खेप रवाना; उच्च पौष्टिक मूल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी

Next Post
व्हेगन मीट,

भारतातून अमेरिकेला व्हेगन मीटची (शाकाहारी मटन) पहिली खेप रवाना; उच्च पौष्टिक मूल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी

Comments 2

  1. Pingback: भारतातून अमेरिकेला व्हेगन मीटची (शाकाहारी मटन) पहिली खेप रवाना; उच्च पौष्टिक मूल्यामुळे आंतरराष
  2. Pingback: Modern Farming Machinery... आधुनिक यंत्रांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे बदलतंय नशीब - Agro World

ताज्या बातम्या

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 2, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 31, 2025
0

5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

शून्यातून उभारला व्यवसाय; आज 5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 26, 2025
0

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

सेंद्रिय खजूर शेतीतून एकरी 12 लाखांचा नफा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 24, 2025
0

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

गव्हाचे पीक पिवळे

गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2025
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

शहाद्यात ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आज उदघाटन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 2, 2026
0

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 31, 2025
0

5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

शून्यातून उभारला व्यवसाय; आज 5000 कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 26, 2025
0

टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

अनुष्काचा टेरेसपासून पॉलिहाऊसपर्यंतचा कोटीचा प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish