पुणे – ऊस शेतकऱ्यांना चिंता असते ती उत्पादन वाढीची…! याकरिताअनेक पर्यायांचा अवलंब केला जातो. कारण उताऱ्यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. ऊस उत्पादन वाढीसंदर्भात राहुरी कृषी विद्यापीठाने केलेल्या सूचना आता शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहेत. सिलिकॉन अन्नद्रव्यामुळे ऊसाच्या उत्पादनात वाढ होणार आहे.
सिलिकॉन हे अन्नद्रव्य इतर पिकांच्या तुलनेत ऊसासाठी उपयोगी आहे. शोषलेले हे सिलिकॉन वनस्पती सिलिसिक आम्लाच्या स्वरूपात विसरण व प्रवाही वस्तुमान पद्धतीने शोषून घेऊन त्याची साठवण खोडात व पानात करतात. ऊस पिकाचा विचार केला तर हे पीक हेक्टरी 700 किलो सिलिकॉन शोषून घेते.
ऊसाला सिलिकॉनचे फायदे
पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी उपयुक्त- सिलिकॉन हे वनस्पतीच्या पानांच्या पेशीभित्तिवर सिलिका जेल या स्वरूपात साठून राहते. त्यामुळे त्याचा पानांवर जाड थर निर्माण होतो. या साचलेल्या थरामुळे वनस्पतींमध्ये यांत्रिक शक्ती निर्माण होऊन वनस्पती सरळ वाढतात. त्यामुळे त्यांचे जमीनीवर लावण्याचे प्रमाण कमी होते. पाने सरळ वाढल्याने एकमेकांचे सावली पानांवर पडत नाही. या सर्वांमुळे प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत मदत होऊन पिकाची उंची, खोडा ची जाडी व फुटव्यांची संख्या वाढते. ऊस पिकात वाढतो साखरेचा गोडवा वाढतो. एवढेच नाही तर त्याची साठवण होऊन त्याच स्वरूपात ती टिकून राहते यासाठी सिलिकॉनचा उपयोग होतो.
सिलिकॉनमध्ये काय असते..?
सिलिकॉनचा यासर्व उपयोगामुळे सिलिकॉन पुरवठा करण्यासाठी पारंपारिक तसेच वनस्पतीच्या अवशेषांचा फेरवापर व रासायनिक घटकांचा वापर केला जातो. रासायनिक स्त्रोतांमध्ये कॅल्शियम सिलिकेट व मॅग्नेशियम सिलिकेट यांचा समावेश होतो. उसामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार मध्यम खोल काळ्याजमिनीत उसाची लागण आणि खोडव्याचे अधिक ऊस व साखर उत्पादन घेण्यासाठी कॅल्शियम सिलिकेट 832 किलो प्रति हेक्टरी ऊस लागवडीच्या वेळेस एकदाच वापरले असता चारशे किलो प्रति हेक्टरी सिलिकॉन ऊसाला मिळते तसेच बगॅस ऐशचा वापर केला तर सिलिकॉन उसासाठी उपलब्ध होऊ शकते.