जिरेनियमच्या तेलाची भारतात देशांतर्गत मागणी 250 टन तर उत्पादन मात्र अवघे 10 टन आहे. उर्वरीत तेल आयात करावे लागते. हे तेल खुल्या बाजारात विकत घ्यायला गेल्यास फक्त 1 मिलिग्राम तेलाची किंमत ₹ 891 /- आहे. एक लिटर तेलाची आजची बाजारातली किंमत आहे ₹ 89,000/- इतकी… यावरून कल्पना करा जिरेनियम किती पैसा मिळवून देऊ शकते.. शिवाय, यावर कीड, रोगांचा फारसा प्रादुर्भाव नसल्याने फावरणीचा फार खर्च नाही.. आणि जनावरेदेखील या पिकाला तोंड लावत नाही… वर्षातून तीन वेळा कापणी होते.
केंद्रीय अहवालानुसार जिरेनियमची सद्यस्थितीत मागणी जास्त, उत्पादन नगण्य..
केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था (लखनौ) यांच्या अहवालानुसार देशांतर्गत सौंदर्य प्रसाधन उद्योगाची सुगंधी तेलाची गरज सुमारे २५० टनांची आहे. त्यापैकी अवघे दहा टन तेलाचे उत्पादन देशात होते. अत्तरे, सौंदर्य प्रसाधने यांच्या उत्पादनासाठी जिरेनियमच्या तेलाला मोठी मागणी आहे. सौंदर्य प्रसाधन उद्योगाच्या गरजेपैकी अवघे पाच टक्के जिरेनियम तेलाचे उत्पादन देशात होते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांचा उद्योग प्रामुख्याने आयात तेलावर अवलंबून आहे. याचाच अर्थ भविष्यात जिरेनियम तेलाची मागणी वाढतीच राहणार आहे.
जिरेनियम तेलाला मार्केट..
भारतात डाबर, बैद्यनाथ, हमदर्द, कॉस्मेटिक कंपन्या, खादी ग्रामोद्योग यांच्याकडून या फुलांच्या तेलाला भरपूर मागणी आहे. जर आपण जिरेनियमचे तेल काढणार असाल तरच जिरेनियम शेती फायदेशीर ठरेल. तेलाची बाजारपेठ महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि देशात बंगलोर, दिल्ली, कनौज, लखनऊ या शहरांमध्ये आहे.
एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो. या पिकामध्ये आंतरपिक म्हणून शेवगा हे पिक उत्तम असते. या शेवग्याच्या उत्पादनावर लागवडीचा खर्च निघून जातो. या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते व कापणी नंतर उरलेल्या चोथ्यापासून खत निर्मिती केली जाते. एका एकरात सरासरी तीस किलो ऑईल वर्षाला मिळते. एक लिटर ऑईलची किंमत 12500 हजार रु मिळते. एक एकरमध्ये एका वर्षात साडेतीन ते चार लाखांचे ऑईल मिळते. खर्च वजा जाता एकरी उत्पादन सरासरी 2 ते अडीच लाखांच्या पुढेच मिळते.
कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ :-
दिनांक – 25 डिसेंबर 2021 (शनिवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
स्थळ – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव…
नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹ 1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)
संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली
ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800
For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564 OR
UPI ID :shailendra.agro@okicici
आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अॅग्रोवर्ल्ड..! 🌱
कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे
संपूर्ण नाव :- ……..
गाव :- ……..
तालुका :- … जिल्हा :- …
मोबाईल नं :- …….
www.eagroworld.in
Comments 1