जळगाव ः आधुनिक युगात शेती बदलत चालली आहे. शेतीमधून अधिक उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेतकर्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे झाले आहे. बदलत्या काळानुसार शेती आता आधुनिक व हायटेक झाली आहे. शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी आता हायटेक उपकरणाची गरज भासू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकार तसेच राज्य सरकार आपल्या शेतकर्यांना हायटेक करण्यासाठी अनेक योजना राबवित असतात, या योजनाद्वारे सरकारे शेतकर्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करत असतात.
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतकर्यांसाठी एक फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे व हायटेक साधनामुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढत आहे. शिवाय पिकांचे उत्पादन व दर्जा यामुळे अजूनच चांगली होत आहे. या बदलत्या काळात व आधुनिक तंत्रामुळे शेतकर्यांना आपला माल विक्री करायला अधिक सोपे झाले आहे. भारतातील शेती ड्रोन व मोबाईलमुळे अधिकच हायटेक बनत चालली आहे आणि त्यामुळे शेतकर्यांचे उत्पादन व उत्पन्न साहजिक वाढले आहे. बदलत्या काळाला अनुरूप शेतकर्यांना हायटेक बनवले जात आहे. यासाठी सरकारे अनेक योजना राबवित आहेत व शेतकर्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
गुजरात सरकारची योजना
शेतकर्यांना स्मार्ट आणि हायटेक बनवण्यासाठी असाच एक प्रयोग गुजरात सरकारने सुरु केला आहे. शेतकर्यांना शेती करणे सोपे व्हावे व त्यातून त्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून गुजरात सरकारने शेतकर्यांना मोबाईल घेण्यासाठी आर्थिक साहाय्य देण्याची योजना बनविली आहे. गुजरात सरकारच्या कृषी विभागानुसार, गुजरात राज्यातील शेतकर्यांना मोबाईल खरेदी करण्यासाठी 1500 रुपयापर्यंत मदत केली जाणार आहे. गुजरात सरकारची ही कल्याणकारी योजना शेतकर्यांना मोबाईल खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित करणार असल्याने या योजनेचे शेतकर्यांमधून स्वागत होत आहे. गुजरात राज्यातील अल्पभूधारक व गरीब शेतकर्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. आजच्या डिजीटल युगात प्रत्येक क्षेत्रात मोबाईल गरजेचा झाला आहे, मग ते शेतीचे का क्षेत्र असेना. स्मार्टफोन चा उपयोग शेतीमध्ये अनेक ठिकाणी केला जातो. त्यामुळे या योजनेचा फायदा शेतकर्यांना नक्की होईल, असा गुजरात सरकारचा दावा आहे.
10 टक्के अनुदानाचा लाभ मिळणार
गुजरातच्या कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील कोणताही जमीनधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्यांना गुजरात सरकारच्या एका पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती देखील त्या पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, अशा प्रकारची योजना महाराष्ट्र सरकारने देखील राबवून राज्यातील शेतकर्यांना हायटेक होण्याच्या दृष्टीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे.
Fairly advisible to modern agriculture and animal husbandry application.
Please provide information as when
Maharashtra state govt or Council of agriculture and animal husbandry will initiate the farmer towards DEVELOPMENT FOOT FORWARD.
I AM Mahendra Kamble micro poultry farmer from satara Taluka wai