मुंबई (प्रतिनिधी) – मान्सून पावसाचा अखेर परतीचा प्रवास आता अंतिम टप्प्यात आहे. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला राजस्थान व संलग्न गुजरातच्या काही भागातून 6 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. अर्थात याबाबत भारतीय हवामान विभागाकडून 30 सप्टेंबरला भाकीत वर्तविण्यात आले होते. 1 जूनला मान्सून पावसाला सुरूवात होऊन जून ते सप्टेंबर कालावधीत देशभरात सर्वसाधारण सरासरीच्या 99 टक्के पाऊस झाला.
जळगावात मंगळवारी 19 ऑक्टोबरला अॅग्रोवर्ल्ड आयोजीत एकदिवसीय कुक्कुटपालन कार्यशाळा; प्रवेश मर्यादित..
देशात सप्टेंबरमध्ये तब्बल 135% पाऊस झाला…; दक्षिण भारतात एकूण 111% पाऊस..*
यंदाचा नैऋत्य मान्सून हंगाम 1 जूनला सुरू झाला होता. तो 30 सप्टेंबरला संपला आहे. या हंगामात देशाच्या वायव्य भागात 96 टक्के, मध्य भागात 104 टक्के, पूर्व आणि ईशान्य भागांत 88 टक्के आणि दक्षिणेत 111 टक्के असं विभागनिहाय पावसाचं प्रमाण राहिलं आहे. यापैकी जून महिन्यात 110 टक्के पाऊस झाला. देशभरात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत पावसाचं प्रमाण अनुक्रमे 93 आणि 76 टक्के राहिलं. तर, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 135 टक्के पाऊस पडला.
महाराष्ट्रात आजपासून बहुतांश भागात उघडीप पण…
नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनने विदर्भाच्या काही भागातून निरोप घेतला. यातच राज्यात सुरु असलेला वादळी पाऊस विश्रांती घेणार असताना आज (ता. 14) पासून बहुतांशी भागात उघडीत मिळण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील अंदमान समुद्राजवळ आज (ता. 14) पुन्हा हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून शुक्रवार (ता. 15) पर्यंत ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनार्याकडे येण्याचे संकेत आहेत. अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि त्यापासून बंगालच्या उपसागरातपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा या स्थितीमुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.