पुणे (प्रतिनिधी) –
खरिपातील पिकांना पावसाचा फटका बसल्यानंतर बळाराजा हवालदिल झाला होता. यातच झालेल्या (Crop Dameged) नुकसानीची तक्रार दाखल करायची कशी असा पेचही निर्माण झाला. शिवाय दिवसागणिस नियामवलीत बदल होत असल्याने संभ्रम अवस्थेतील शेतकऱ्यांना आता ( Agriculture Commissionerate ) कृषी आयुक्तालयाकडूनच दिलासा मिळाला आहे. नु्कसानीची तक्रार नोंदिवण्यासाठी आता वेगवेगळे सहा पर्याय शेतकऱ्यांसमोर राहणार आहेत.
महाराष्ट्रातील बहुतांश भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसला. नुकसानीनंतर पेच होता तो झालेल्या नुकसानीची पीक विमा कंपनीकडे तक्रार नोंदवायची कशी..? सुरवातीस केवळ ऑनलाईनद्वारेच तक्रार नोंदण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, स्थानिक पातळीवर नुकसानीसंदर्भातील सर्व माहिती ही अॅपद्वारे भरणे शक्य नाही. शेतकऱ्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुन्हा ऑफलाईन तक्रारही नोंदिवता येणार असल्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांची होणारी गर्दी आणि तारांबळ पाहता आता कृषी आयु्क्तालयानेच वेगवेगळे सहा पर्याय दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.
काय आहेत सहा पर्याय…
1) शेतकऱ्यांना ‘क्रॉप इंन्शुरन्स अॅप’ यामाध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्वतः भरायची आहे. याद्वारे माहिती भरल्यानंतर अधिकारी कर्मचारी हे पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर येणार आहेत.
2) विमा कंपनीने 18004195004 हा टोल फ्री क्रमांक दिला आहे. याद्वारेही शेतकरी झालेल्या नुकसानीची माहिती सांगू शकतात.
3) तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीच्या कार्यालयात शेतकरी हे ऑफलाईनही तक्रार करु शकतात. कंपनीकडून देण्यात आलेल्या फॅार्मवर आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.
4) शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही तक्रार नोंदिवता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्याकडे तक्रारीचा अर्ज द्दावा लागणार आहे.
5) पिक विमा कंपनीचा [email protected]/[email protected] हे मेल आयडी आहेत. यावरही तक्रार नोंदविता येणार आहे.
6) ज्या बॅंकेत शेतकऱ्यांनी आपला विमा भरलेला आहे त्या बॅंकेच्या शाखेतही शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येणार आहे.
या परिस्थितीमाध्ये उपयोगी पडणार हे पर्याय
स्थानिक नैसर्गिक आपत्ती, गारपीट, ढगफुटी, शेत जमीन जलमय झाल्यास तसेच वीज कोसळून लागलेली आग या प्रसंगी शेतकऱ्यांना याच सहा पर्यांयांचा उपयोग होणार आहे.
या आहेत आवश्यक बाबी..
नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आतमध्ये विमा कंपनीला याबाबतची सुचना देणे आवश्यक आहे. याकरीता वरील सहाही पर्याय हे खुले असणार आहे. नेमून दिलेल्या वेळेत तक्रार दाखल झाल्यास विमा कंपनीलाही योग्य ती कारवाई करता येणार आहे.
Gokul Bachhav
Soyabin nokasan pavsamode