• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

असा मिळविला दहा गुंठ्यात एक लाखाचा निव्वळ नफा

Team Agroworld by Team Agroworld
August 23, 2021
in यशोगाथा
0
असा मिळविला दहा गुंठ्यात एक लाखाचा निव्वळ नफा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

बदलत्या पिक पद्धतीत नगदी पिकांना भाजीपाला पिके ही चांगला पर्याय ठरला असून कमी दिवसात हमीचे उत्पन्न यापासून मिळत आहे. मराठवाड्यातही शेतकरी आता एकूण शेतीतील ठराविक क्षेत्र भाजीपाला पिकासाठी राखीव ठेऊन त्यापासून शाश्वत असे उत्पन्न मिळवीत आहे. त्यामुळे मुख्य शेतीचा व घराचा सर्व खर्च या पिकापासून मिळतो आणि मुख्य नगदी पिकाचे उत्पन्न शिल्लक राहते. अण्णासाहेब जाधव या शेतकऱ्याने देखील भाजीपाला पिकात सातत्य राखत यावर्षी दहा गुंठ्यातील चवळीपासून पाच टन उत्पादन घेत एक लाख दहा हजार निव्वळ नफा मिळविला आहे.
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुका हा सुजलाम सुफलाम असून येथील जमीन काळी कसदार सुपीक आहे. या भागातील शिवारात केळी, हळद, कापूस, तूर, मुग, उडीद, सोयाबीन ही पिके खरीपात तर रब्बी हंगामात हरभरा, करडी, गहू, टाळकी ज्वारी ही पिके शेतकरी प्रामुख्याने घेत असतात. सेलू, मानवत या तालूक्यात रब्बीत मोठ्या प्रमाणावर टाळकी ज्वारी पिकत असल्यामुळे येथे ज्वारीचे विक्रमी उत्पादन होते, त्यामुळे ही दोन्ही तालूके ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जातात. शिवाय अनेक शेतकरी सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकाचे बारमाही उत्पादन घेतात. मानवत तालुक्यातील आंबेगाव येथील युवा शेतकरी अण्णासाहेब शिवाजीराव जाधव या शेतक-याने आपल्या शेतीत कोबी, सिमला मिरची, टोमॅटो, वांगी, भाजीपाला पिकात वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग राबवून त्याचे यशस्वीरीत्या भरघोष उत्पादन घेतले आहे. यंदा त्यांनी दहा गुंठे क्षेत्रातील शेडनेटमध्ये संकरीत चवळीची लागवड करुन त्यात पाच टन म्हणजेच ५० क्विंटल चवळी शेंग भाजीचे उत्पादन घेतले आहे.

दहा वर्षांपासून भाजीपाला पिकात सातत्य

     दहावी शिक्षण असलेले शेतकरी अण्णासाहेब जाधव यांना आंबेगाव येथे एकूण १० एकर जमीन आहे. शेतीत विहीर, बोअरवेल ही पाण्याची साधने आहेत. दहावीनंतर पुढे शिक्षण न घेता त्यांनी शेतीच करण्याचे ठरवले. गत दहावर्षांपासून ते भाजीपाला पिकात स्थिरावले आहेत. शेती करत असतांना काही चुका होत असतात. पिकं घेत असतांना एखाद्या व्यवस्थापनात आपण कुठे कमी पडलो? याचा शोध घेत त्याची भर अनुभवातून भरुन काढत त्यांनी भाजीपाला व ईतर पिकात यश मिळवणे चालू केले. गतवर्षी कोबी, सिमला मिरचीचे चांगले उत्पादन घेवून मोठा आर्थिक नफा कमावला. यंदाही चवळीचे विक्रमी उत्पादन घेतले.

पारंपारिक ते आधुनिक शेतीची सुरुवात

याआधी वडील पारंपरिक पद्धतीने खरीप हंगामात सोयाबीन, तूर, कापूस ही पिके घेत. वडिलोपार्जित एक जूनी विहीर होती, तीला पाणी नसल्याने पावसाच्या पाण्यावर येणारे कोरडवाहू पीक पद्धती असायची. या पिकातून खर्च जाता फारसे उत्पन्न हाती येत नव्हते. शाळा सोडल्यानंतर अण्णासाहेब यांनी आपल्या शेतात बोअरवेल घेतला. त्याला चांगले पाणी लागल्यामुळे सुरुवातीला अद्रक पीक घेतले. त्यामध्ये चांगला आर्थिक फायदा झाला. त्यानंतर परिसरातील अन्य शेतकरी विविध भाजीपाला पिके घेत असल्याचे पाहून टोमॅटो, वांगी, कोबी, मिरची व ईतर भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात केली. यातून फायदेशीर अर्थार्जन मिळू लागल्याने मानवत तालुका कृषी खात्याकडून आनूदानावर दोन शेडनेट व छोटा ट्रॅक्टर मिळाले. त्यामुळे ख-या अर्थाने आधुनिक शेतीस सुरुवात करुन केली, सर्व प्रकारचे भाजीपाला पिके उत्पादन करण्यात यश आले. जिल्हा कृषी अधिक्षक संतोष आळसे, तालुका कृषी अधिकारी प्रदिप कच्छवे,  सुपरवायझर गुलाबराव शिंदे,  कृषी साह्यक घरमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेती पिकात वेगवेगळे प्रयोग राबवून त्यात यश मिळवले. पूर्वी कोरडवाहू पिकातून काहीच उरायचे नाही. आता आधुनिक पद्धतीने शेडनेटमध्ये भाजीपाला व सलग जमीनीत केळी पिक घेत असल्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली.

फुलकोबी व सिमला मिरचीचे घेतले भरघोष उत्पादन

१० गुंठे क्षेत्रातील शेडनेट मध्ये गत वर्षी एका पाठोपाठ फूलकोबी व त्यानंतर त्याच ठिकाणी सिमला मिरचीची लागवड केली होती. योग्य व्यवस्थापनानंतर फुलकोबीचे अडीच टन उत्पादन निघाले. कोबीला प्रति किलो ४० रु दर मिळाला. विक्रीतून १०००००/ एक लाख रुपये मिळाले. यातून उत्पादन खर्च १५ हजार रुपये जाता ८५००००/ पंच्याशी हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले.  यानंतर शेडनेटमध्ये सिमला मिरचीची लागवड केली. कोबी प्रमाणेच सिमला मिरचीचे खतपाणी व रोग नियंत्रण व्यवस्थापन करण्यात आले. १० गुंठे क्षेत्रातील सिमला मिरचीपासून १० टन उत्पादन झाले. मिरचीस प्रति किलो २० रु दर मिळाला. सिमला मिरची विक्रीतून २ लाख रुपये मिळाले, तर यामधून उत्पादनासाठी सर्व मिळून आलेला ४० हजार रुपये खर्च वजा जाता १ लाख ६० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले.

चवळी लागवड प्रयोग

जाधव यांनी आपल्या शेतात दहा गुंठे क्षेत्रात ५ लाख रुपये खर्चून यापूर्वी शेडनेटची उभारणी केली आहे. त्यात ते भाजीपाला पिके घेतात. यावर्षी २०२१ ला शेडनेटमध्ये ५ फूट रुंदीचे बेड तयार केले. त्यात काही खतांचा बेसल डोस टाकून ठीबक अंथरले आणि बेडवर मल्चिंग पेपरचे अच्छादन केले. १५ फेब्रुवारी २०२१ रोजी दरम्यान बेडवरील ३ फूट लांबी छिद्रावर चळवळीच्या बियाण्याची लागवड केली.

पिक व्यवस्थापन

लागवडीनंतर ठीबकमधून आवश्यक त्या दिवसाला ०-५२-३४, १२-६१, १९-१९-१९, पोटॅशियम ही विद्राव्य खते पाण्यासोबत दिली. जसजसे चवळीचे वेलं वाढत होती त्यावेळी एक दिवस आड व आवश्यक खतमात्रा ठीबकमधून पाण्यासह दिले. चवळी या शेंग भाजीच्या वेलीवर नागअळी, मावा, बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. त्याच्या निवारणासाठी त्यांनी अळी व बुरशीरोग नियंत्रण ठेवण्यासाठी काही रासायनिक किटकनाशक औषधांच्या फवारण्या केल्या.

वेलींच्या वाढीसाठी जाळीची उभारणी

या चवळी वाणाची वेलझाडे जास्त वाढून हिरव्यागर्द शेंग भाजीचे अधिक उत्पादन देणारे असतात. शिवाय लागवडीपासून ४५ ते ४८ व्या दिवशी शेंग तोडणीस येतात. वेलझाडे लवकर आणि उंच वाढावेत म्हणून त्यांनी शेडनेट मध्ये ७ फूट उंच तारबांधणी केली व त्यावरती रेडीमेड तयार जाळी विकत आणून बसवली. जाळीवर चवळीची चांगली वाढ होवून पिक बहरदार येवून भरपूर शेंगा लगडल्या.

चवळी शेंगाचे उत्पादन

लागवडीनंतर ४८ व्या दिवशी चवळी शेंगाचा पहिला तोडा निघाला. पिकाच्या योग्य व्यवस्थापनासाठी कंपनी प्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखाली चवळी वाणाची सोय केल्यानंतर शेंगाची संख्या वाढली. त्यामुळे एक दिवसाआड शेंगा तोडा कराव्या लागल्या. दहा गुंठे क्षेत्रातील शेडनेट मधील चवळीपासून जवळपास ५ टन शेंगाचे उत्पादन झाले. या वाणाच्या चवळी शेंगा लांब वाढल्या. तसेच रंग हिरवागर्द व शेंग लवकर नीबर न होता तीचा दोरा निघत नाही आणि भाजी चवदार असल्यामुळे पाथरी, मानवत येथील बाजारात हातोहात विक्री झाली. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन काळ असल्यामुळे विक्री करीता अतिशय कमी वेळ मिळत होता. त्यामुळे २० ते २५ रुपये किलो कमी दराने विक्री करावी लागली. तसे ५० ते ६० रु दर किलोला लाॅकडाऊन नसते तर दर मिळत होता. असे शेतकरी अण्णासाहेब जाधव सांगत होते.

खर्च व मिळालेले निव्वळ उत्पन्न

दहा गुंठे क्षेत्रातील शेडनेटमध्ये असलेल्या चवळी पिकाच्या उत्पादनाकरीता बियाणे, खते, औषधी, मजूर यासाठी त्यांना एकूण १५ हजार रुपये खर्च आला. तर ५ टन म्हणजे ५० क्विंटल उत्पादन झाले. त्यास किलोला २५ रुपये भाव धरता १,२५००००/ एक लाख पंचवीस हजार रुपये विक्रीतून आले तर त्यातून १५००० हजार रुपये उत्पादन खर्च वजा जाता १,१००००/ एक लाख दहा हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले.

आदलून बदलून पिके घेतली तर शेती नक्कीच परवडणारी

लाॅकडाऊनमुळे सेलू, मानवत, परभणी येथील भाजीपाला बाजार बंद राहत होता. काही तासच बाजार खुला राहू लागल्याने कोबी, सिमला मिरची, चवळी या भाजीपाला पिकाला थोडक्याच किलोत व्यापारी  खरेदी करायचे. त्यामुळे उर्वरित भाजीपाला गाव व परिसरात बेभाव दरात विक्री करावा लागला. त्यामुळे लाॅकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले. पूर्ण वेळ बाजार खुला राहिला असता तर दरात वाढ झाली असती. शेती करीत असतांना शेतक-यांनी तेच ते पिके न घेता विकेल तेच पिकवणे गरजेचे असते. नाहीतर सगळ्यांनी एकच पिक घेतले तर बाजारात त्याची आवक वाढून दर घसरतात. अशा वेळी भाजीपाला अक्षरशः गुरांना चारण्याची वेळ शेतक-यावर येते. आदलून बदलून पिके घेतली तर शेती नक्कीच परवडणारी आहे.

अण्णासाहेब शिवाजीराव जाधव

मु. आंबेगाव, ता. मानवत. जि. परभणी.

मो. ८०८०७५१४३७.

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: चवळीपरभणीफुलकोबीभाजीपाला पिकेमानवतशेंगसिमला मिरची
Previous Post

अनिल जैन यांचा ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराने गौरव

Next Post

मिश्रपिक पद्धती आर्थिक समृद्धीचा पॅटर्न

Next Post
मिश्रपिक पद्धती आर्थिक समृद्धीचा पॅटर्न

मिश्रपिक पद्धती आर्थिक समृद्धीचा पॅटर्न

ताज्या बातम्या

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

विदर्भातील 30,000 शेतकऱ्यांना कर्जाच्या चक्रव्युहातून बाहेर येण्यास मदत करणारे स्टार्टअप

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish