राज्यात हरभरा हे रब्बी हंगामात घेतले जाणारे महत्वाचे कडधान्य आहे. हरभरा पिकाच्या उत्पादनात कमी होण्याचे मुख्य कारणे हरभाऱ्याला होणारे बुरशीचे रोग आणि त्याला लागणारी किड आहे. त्यामुळे हरभरा वाढीच्या वेळेला मर सारखे रोगाचे लक्षणे ओळखून नियंत्रण करणे फार गरजेचे आहे.
रोग व्यवस्थापन
मर
मर रोग फ्युजाहियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमीन मधुन आणि बियाव्दारे होतो. हा झाडाची अन्नद्रव्य वाहून घेऊन जाणाऱ्या पेशीला मारतो. मर रोगाची बुरशी 6 वर्षापर्यंत जमिनीत जिवंत राहू शकते. पण ज्या भागात हवामान जास्त थंड असते तेथे या रोगाचा प्रार्दुभाव कमी दिसतो.
लक्षणे
- झाडाचा जमिनी वरचा भाग, देठ आणि पाने सुकतात व झाड वाळून मरतात.
- कोवळी रोप सुकतात.
- जमिनी खालचा खोडाच्या भागाचा रंग कमी होतो.
- रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद दिल्यास फिकट तांबुस काळसर रंग दिसून येतो.
व्यवस्थापन
- वेळेवर पेरणी करावी.
- मोहरी किंवा जवस आंतरपिक म्हणून घ्यावेत.
- रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा.
(पीकेव्ही, हरिता, बीडी एन जी 797, दिग्विजय, जे एस सी 55)
- बीजप्रक्रिया
3 ग्राम कार्बेन्डाझिम (बाविस्टीन) किंवा कारबॉक्सिन + 2 ग्राम थायरम + 4 ग्राम ट्रायकोडेना व्हायरिड / किलो बियाणे
हरभरा पिकात मर रोग प्राथमिक अवस्था असताना . 1kg ट्रायकोडर्मा 200kg चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळा. 3 दिवसानंतर मर प्रादुर्भावित भागात याचा वापर करा किंवा ट्रायकोडर्मा आणि अन्य जैविक बुरशी नाशके असलेल्या औषधांचे ड्रेंचींग करा. जास्त तापमानामुळे आणि सिंचनाच्या आर्द्रतेमुळे पिकात मुळांजवळ बुरशीची शक्यता निर्माण होते. तेथेही अशा द्रावणाचे ड्रेंचींग उपयोगी पडेल. प्रोपेकनझोल 4 ml प्रति 10 लि पाण्यात मिसळून अळवणी केल्यास मर रोग आटोक्यात येऊ शकतो.
माहिती स्रोत:- वनस्पती रोगशास्त्र विभाग
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी,