मुंबईत आजही मूसळधार पाऊस, 24 विभागात सतर्कतेचा इशारा
टीम अॅग्रोवर्ल्ड(पुणे) : राज्यात काल विवीध भागात मान्सूनच्या सरी कोसळल्या त्यात कोकणात व तळकोकणात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस मुसंडी मारत असून पुढील दोन दिवस मुंबईत व कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना हवामान विभागाने दिली आहे.
दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात मॉन्सूनला पोषक हवामान तयार झाले असून आज (16 जुलै)आणि उद्या राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 17 जुलैपर्यंत कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.