• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेतीशाळा – शेतकऱ्यांना कामामध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in तांत्रिक
0
शेतीशाळा – शेतकऱ्यांना  कामामध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम
ADVERTISEMENT

शेतीशाळा म्हणजे काय ?                  

शेतकरी जे पिक घेतात त्या पिकामध्ये तज्ञ बनवण्याचं एक प्रभावी माध्यम म्हणजे शेतिशाळा आहे. शेती शाळा ही प्रत्यक्ष शेतावर घेतली जाते. यासाठी प्रगतीशील शेतकरी यांचे  एक एकर चे क्षेत्र निवडले जाते. या क्षेत्रावरच  गावातील जवळपासचे त्या पिकाचे किमान 25 शेतकरी त्या हंगामात त्या पिकाच्या पेरणी पासून ते मळणी पर्यंत दर 15 दिवसांनी एकत्र येतात. या प्रकारे 10 वर्ग शेतावरच आयोजित होतात. एक वर्ग किमान 2 तासाचा असतो. या शेती शाळेत कमीत कमी व्याख्याने आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून अनुभवातून शिक्षण अभिप्रेत आहे. या निवडलेल्या क्षेत्रावर सुधारीत तंत्रज्ञानाचे पथदर्शी प्रात्यक्षिक आयोजित केले जाते. यामध्ये एकात्मिक पिक व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन इ .बाबींचा अवलंब केला जातो. शेतकरी या क्षेत्रावर एकत्र येउन आपापले या सुधारित तंत्रज्ञानाबाबातचे तसेच पिकाबाबतचे अनुभव, चांगले/वाईट दृश्य परिणाम एकमेकांना सांगतात. आपापसात चर्चा करतात व प्रात्यक्षिक प्लॉट ची निरीक्षणे घेतात. किडीची चित्रे काढतात. थोडक्यात हा प्रात्यक्षिक प्लॉट म्हणजेच पाटी, पुस्तक, पेन, इमारत सर्व काही असते.                   

या शेतिशाळे साठी प्रशिक्षक म्हणून कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हे असतात. ज्या शेतकरी यांचे शेतात ही शेतीशाळा घेतली जाते तो शेतकरी म्हणजे होस्ट फार्मर. 
शेतिशाळे ची मूलतत्वे व ऊद्देश-1. निरोगी व सशक्त पिक जोपासणे साठी शेतकरी यांना मार्गदर्शन करणे. यामध्ये शेतकरी यांना फक्त शिकवणे हा ऊद्देश नाही तर शेतकरी यांना कर्यक्रमामध्ये सामावुन घेणे हा ऊद्देश आहे.2. किडीच्या नैसर्गिक शत्रूंचे अर्थात आपल्या मित्र किटकांचे संवर्धन करणे.3. नियमित पणे निरीक्षणे घेणे, निरिक्षणा वर आधारित निर्णय घेणे आणि शेतकरी यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेणे.4. शेतकरी यांना एकात्मिक पिक व्यवस्थापन आणि किड/रोग व्यवस्थापन यामध्ये तज्ञ बनविणे.5. शेतकरी समूह एकत्र येणे आणि त्यांच्या गरजांवर आधारित कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम राबवणे.

होस्ट फार्मर बाबत व प्लॉट बाबत-1.होस्ट फार्मर शेतकरी हा प्लॉट वर सुधारीत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास उत्सुक असावा. 2.सदर शेतकरी यांनी प्लॉट मध्ये वापरण्यात आलेल्या निविष्ठा, पिक उत्पादन खर्च तसेच इतर सर्व बाबींच्या नोंदी करणे आवश्यक आहे.3. शेतिशाळा प्लॉट धारकाकाडे संरक्षित सिंचनाची सुविधा असणे अभिप्रेत आहे. 4.शेतिशाळा प्लॉट हा शक्यतो रस्त्यालगत असावा जेणेकरुन इतर शेतकरी यांना येणे सोयीचे होइल.5. शक्यतो क्रॉप सैप अंतर्गत निवडलेले गावामध्ये एका प्रमुख पिकासाठी फिक्स प्लॉट निवडून शेतिशाळेचे आयोजन या प्लॉट वर करण्यात येते.6. शेतिशाळा प्लॉटवरिल तंत्रज्ञानाचा तौलनीक अभ्यास करता यावा आणि शेती शाळेतील शेतकरी यांना सदर तंत्रज्ञान अवलंब करण्याबाबत निर्णय घेता यावा यासाठी शेतिशाळा प्लॉट शेजारीच नियंत्रीत प्लॉट निवडण्यात येतो. 7. पिक वाढीच्या शेवटच्या टप्प्यात सदर प्लॉट वर शेतिदिना चे आयोजन करण्यात येते. यासाठी कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करण्यात येते.

गाव निवड  व पिक निवड बाबत-1. प्रत्येक कृषी सहय्यकाच्या कार्यक्षेत्रात एक गाव निवडले जाते व या गावात प्रमुख पिकाकरीता शेती शाळेचे आयोजन करण्यात येते.  2. प्रमुख पिक निवड करताना खरीप व रबी हंगामामध्ये त्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये पेरणी होणार्या क्षेत्रापैकी 70 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी होणारे जे पिक असते ते प्रमुख पिक होय. 3.महिला कर्मचारी हे महिला शेतकरी यांचे साठी शेतिशाळेचे आयोजन करतात. 4. शेती शाळेसाठी लागणारे प्रशिक्षण साहित्य उदा. रजिस्टर, फुटपट्टी, कोरे व ड्राइंग कागद, स्केच पेन सेट, 10x भिंग, लहान व्हायल्स इ . साहित्य शेतकरी यांना देण्यात येते.

शेतिशाळा घ्यावयाची पिके-कोंकण विभाग- भातनाशिक पुणे कोल्हापुर नागपुर विभाग- भात, कापूस, सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, उस, रबी हरभरा.औरंगाबाद लातूर अमरावती विभाग- वर नमुद सर्व पिके (भात वगळून)खरीप व रब्बी हंगामात उपरोक्त पिकांच्या पीकनिहाय शेतीशाळा आयोजित करण्यात याव्यात.


शेतिशाळे साठी बाबनिहाय खर्चाचे मापदंड-1. प्रशिक्षण साहित्य व इतर तांत्रिक साहित्य (प्रती शेतकरी रु.200x 25 शेतकरी)-  रु. 5000/-2. अल्पोपहार ( रु.20 प्रती शेतकरी x 25 शेतकरी x 10 वर्ग) – रु. 5000/-3. शेती दिन खर्च- रु. 2000/-4. विश्लेषणात्मक अहवाल तयार करणे- रु.2000/-याप्रमाणे एकुण तरतूद रु.14000/- इतकी आहे.


शेतिशाळे चे फायदे-1.

शेतिशाळेत सहभाग घेणारे शेतकरी यांचे मध्ये स्वत:चा आत्मविश्वास निर्माण होतो. स्वत:ला निर्माण झालेल्या अडचणी,शंका तो मांडू शकतो व चर्चा कर शकतो. एकात्मिक पिक व्यवस्थापन करताना कोणती पद्धती योग्य की अयोग्य या बाबतीत तो संभ्रमावास्थेत न राहता आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतो.2. शेतिशाळेत स्वत: प्रात्यक्षिक स्वरुपात प्रत्येक गोष्ट केल्यामुळे योग्य काय किंवा अयोग्य काय या बाबतीत आपल्या शेतीतील निर्णय घेण्यास शेतकरी निर्णयक्षम बनतात. उदा. बियाणे,मशागत पद्धती, कोणत्या घ्याव्यात याबाबत निर्णय ते स्वत: घेऊ शकतात.3. शेतकरी शत्रु किड व मित्र कीटक ओळखू शकतात. सर्वसाधारणपणे शेतकरी हा शेतात कोणत्याही प्रकारचा कीटक दिसला की तो पिकाचा शत्रु समजून फवारणी घेणे हा पर्याय निवडतो. परंतू शेतिशाळेचे प्रशिक्षण घेतलेला शेतकरी हा आपल्या शेतात असणारे शत्रु किडी व मित्र किटक ओळखू शकतो. त्यामुळे तो त्या शेतातील व्यवस्थापनाचे निर्णय स्वत: घेऊ शकतो.4. शेतिशाळेचे शेतकरी हे पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कसे करावे या बाबतीत दक्ष राहतात. पर्यायाने उत्पादन खर्च कमी होवुन शेतकरी यांचा फायदा होतो. 5. छोट्या छोट्या गटात काम केल्याने सहकार्याची भावना वृद्धींगत होते.6.पिक निहाय तंत्रज्ञान आणि त्या संबंधीत कौशल्ये शेतकरी यांचे पर्यंत प्रभावी पणे पोचतात.


उत्कृष्ट शेतिशाळा आयोजन स्पर्धा–                      

उत्कृष्ट शेतिशाळा स्पर्धा आयोजित केल्याने कर्मचारी यांचे मध्ये खिलाडू वृत्ती वाढुन त्यांच्या मधिल सुप्त गुणां ना चालना देण्याच्या उद्देशाने जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येते. यामुळे कर्मचारी यांचे मध्ये उत्साहाची भावना निर्माण होते व योजनेचा उद्देश सफल होण्यास मदत होते. जिल्ह्यातील स्पर्धे मध्ये सहभागी होवू इच्छिणारे  कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक यांचे अर्ज शेती शाळेच्या प्रथम टप्प्यात मागविण्यात येतात. शेतिशाळांचे मुल्यांकन करुन जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट काम करणारे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक यांचे प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकासाठी गुणांकन करण्यात येते. जिल्हास्तरावरील प्रथम मानांकित शेतिशाळे चा प्रस्ताव विभाग स्तरावर पाठविण्यात येतो.

पुरस्काराचे स्वरुप- खालील प्रमाणे पारितोषिक व प्रशस्तिपत्रक

जिल्हा स्तर-प्रथम क्रमांक- रु. 5000/-द्वितीय क्रमांक- रु. 3000/-तृतीय क्रमांक- रु. 2000/-विभाग स्तर-प्रथम क्रमांक- रु. 10000/-द्वितीय क्रमांक- रु. 8000/-तृतीय क्रमांक- रु. 7000/-
राज्य स्तर-प्रथम क्रमांक- रु. 15000/-द्वितीय क्रमांक- रु. 13000/-तृतीय क्रमांक- रु. 11000/-
अधिक माहितीसाठी मार्गदर्शक सूचना

Tags: शेतीशाळा
Previous Post

हवामान आधारीत फळपिक विमा योजना – अंबिया बहार

Next Post

अत्याधुनिक कृषी मशिनरी आता अॅपद्वारे मिळणार भाडेतत्वावर ..

Next Post
अत्याधुनिक कृषी मशिनरी आता अॅपद्वारे मिळणार भाडेतत्वावर ..

अत्याधुनिक कृषी मशिनरी आता अॅपद्वारे मिळणार भाडेतत्वावर ..

ताज्या बातम्या

Understanding Cookie Casino’s Responsible Gambling Tools in Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Почему не работает мостбет сайт? Проверьте интернет-соединение

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Duospin: Budování komunity a spojení mezi hráči

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Həftəlik Turnirlər: Pinco Kazino’da Ən Yaxşı Oyunçular Kimlərdir?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Mostbet real pulla oynamaq üçün büdcə planı necə hazırlamaq olar?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Community Insights: Players’ Favorite Games at BetSekiz Casino Türkiye

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Fortunica Casino Australia’s Approach to Game Fairness: A Comprehensive Review

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

How to Use Free Spins at WinHero Casino Nederland

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Key Findings from Golden Tiger Research Studies: An In-Depth Review of Golden Tiger Casino

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Understanding Cookie Casino’s Responsible Gambling Tools in Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Boo Casino: Revolutionizing Online Gambling in Casino Canada

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Почему не работает мостбет сайт? Проверьте интернет-соединение

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

Duospin: Budování komunity a spojení mezi hráči

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 9, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.