राज्यातील धरणांत 87 टक्के उपयुक्त पाणीसाठा, जाणून घ्या मोठया धरणातील पाणीसाठा …
मुंबई – राज्यात लहान, मध्यम व मोठे एकूण एकत्रित सुमारे 2997 इतकी धरणे असून यावर्षीच्या 09 सप्टेंबर 2025 रोजी या सर्व धरणांमध्ये सुमारे 86.93 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत राज्यातील धरणात 82.66% उपयुक्त पाणीसाठा होता. यावर्षी सुमारे 4% टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा जास्त आहे.
138 मोठ्या प्रकल्पात 27 हजार टीएमसी (94%) साठा
राज्यातील एकूण 138 मोठ्या पाटबंधारे प्रकल्पात आजअखेर सुमारे 27,424.20 टीएमसी (94.23%), 260 मध्यम पाटबंधारे प्रकल्पात सुमारे 4,318.25 टीएमसी (78.43%) आणि 2,599 लघु पाटबंधारे प्रकल्पात सुमारे 3,498.86 टीएमसी (59.01%) इतका उपयुक्त पाणीसाठा झालेला आहे. यावर्षी 7 मे 9 सप्टेंबरपर्यंत पडलेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये उत्तम पाणीसाठा झालेला असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
सद्यस्थितीत गेल्या 15-20 दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भासह राज्यात सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे या विभागांतील बहुतेक महत्त्वाची धरणे तुडुंब भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे काही भागात, काही काळ पूर परिस्थिती देखील निर्माण झाली.
विभागनिहाय धरण पाणीसाठा (09 सप्टेंबर पर्यत)
कोकण विभागात एकूण 173 धरणे असून त्यांमध्ये आजमीतीस सुमारे 3,443.37 टीएमसी (92.94%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
नाशिक विभागात 537 इतकी लहान, मध्यम व मोठी धरणे असून त्यामध्ये आजमितीस 4,828.41 टीएमसी (81.34%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
पुणे विभागात एकूण 720 धरणे असून त्यामध्ये आज 13,942.74 टीएमसी (91.68%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
मराठवाडा विभागामध्ये एकूण 920 धरणे असून त्यामध्ये आज सुमारे 5,968.35 टीएमसी (82.20%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या 15-20 दिवसात मराठवाडा विभागातील मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे धरण साठ्यात सुमारे टीएमसी(17%) इतकी पाणी वाढ झाली आहे.
अमरावती विभागामध्ये 264 धरणे असून त्यामध्ये 3,265.33 टीएमसी (86.35%) पाणीसाठा आहे. नागपूर विभागात 383 धरणे असून या धरणांमध्ये 3,791.11 टीएमसी (81.64%) टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
सर्वात जास्त पाणीसाठा कोकण विभागात (92.94%) आणि त्या खालोखाल पुणे विभागात (91.68) दिसून येत आहे.
खान्देश/ उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख धरणातील उपयुक्त पाणीसाठा
जळगाव जिल्हा
1. हतनूर – 47.53%
2. वाघूर – 92.66%
3. बहुळा – 87%
4. मोर – 89%
5. हिवरा – 86%
6. गूळ – 73%
धुळे जिल्हा
1. अक्कलपाडा – 91%
2. करवंद – 87%
3. बुराई – 80%
4. अनेर – 73%
नाशिक जिल्हा
1. गिरणा – 96.35%
2. चणकापूर – 95.58%
3. दारणा – 99.60%
4. गंगापूर – 97.11%
5. मुकणे – 100%
6. ओझरखेड – 100%
7. तिसगाव – 100%
8. वैतरणा – 98.64%
9. वाघाड – 100%
10. पुणेगाव – 98%
अहिल्यानगर जिल्हा
1. भंडारदरा – 99.51%
2. मुळा – 95.51%
3. निळवंडे 2 – 100%
नाशिक विभागातील एकूण उपयुक्त जलसाठा – 94.29%
राज्यातील प्रमुख मोठ्या धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा :
1. उजनी -100%
2. कोयना – 98.15%
3. जायकवाडी – 98.90%
4. गिरणा – 96.35%
5. गोसीखुर्द – 50.44%
6. भातसा – 97.70%
7. मुळशी – 100%
8. भाटघर – 100%
9. ईसापुर – 98.22%
10. वारणा – 97.77%
11. राधानगरी – 96.71%
12. मुळा – 97.51%
13. उर्ध्व वर्धा – 95.63%
14. तोतलाडोह – 92.57%
15. येलदरी – 98.67%
16. दूधगंगा – 82.87%
17. तिल्लारी – 96.26%
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
नव्या अमेरिकी टेरिफचा कोणत्या देशांना काय फायदा..
शेती यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, खतांवर आता फक्त 5% जीएसटी
















