कधी कधी, धाडसी निर्णय घेतल्याने आपल्या आयुष्यातील नवे मार्ग खुलतात. मुजफ्फर सबा यांचा संघर्ष याच धाडसाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. एक कुशल कंप्यूटर इंजिनिअर असताना, त्यांनी आपल्या हृदयातील शेती करण्याच्या इच्छेला मान देत आयटी क्षेत्रातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळात लॉकडाऊनच्या निमित्ताने त्यांनी आपल्या गावी परत येऊन मत्स्य शेतीत करिअर बनवण्याची पायरी उचलली. आज ते बिहारमध्ये यशस्वी मत्स्यपालक म्हणून 20 लाख रुपये वार्षिक कमवत आहेत. त्यांच्या या प्रवासात त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला, परंतु त्यांच्या समर्पणाने आणि मेहनतीने ते एक प्रेरणादायक उदाहरण बनले आहेत, जे इतर शेतकऱ्यांना नवीन संधींविषयी विचार करण्यास प्रवृत्त करत आहेत.
कंप्यूटर इंजिनिअर मुजफ्फर कमाल सबा यांनी आयटी क्षेत्रातून शेतीकडे धाडसी वळण घेतले. आज ते बिहारमध्ये यशस्वी मत्स्यशेती करत आहे. त्यांनी 15 एकरावर 150 क्विंटल मासे उत्पादन केले आणि वार्षिक 20 लाख रुपये कमवत आहे. मुजफ्फर यांचे यश त्यांच्या शिक्षणामुळे नाही, तर त्यांनी स्वप्नांच्या दिशेने घेतलेल्या धाडसी पावलामुळे आहे. मुजफ्फर यांनी 2011 मध्ये कंप्यूटर सायन्सची पदवी पूर्ण केली. त्यांनी बंगलोर आणि दिल्लीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम केले. 3 – 4 वर्षांनंतर त्यांना जाणवले की त्यांचा मन तिथे नाही. त्यांचे मन नेहमी शेतीकडे आकर्षण होतं होते. विशेषतः पारंपरिक शेतीच्या पलीकडे काहीतरी करण्याची इच्छा होती.
मत्स्य शेतीचा अभ्यास
२०१९ मध्ये सबा यांनी धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लॉकडाऊनच्या काळात त्यांनी आपल्या गावात परत येण्याचा आणि समाजात चांगला प्रभाव निर्माण करण्याचा ठरवला. ते पिढ्यानपिढ्या तांदूळ पिकवत होते, पण ते खूप मेहनतीचे होते. मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्यासाठी ते त्यांच्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्राकडे (KVK) वळले, जे शेवटी त्यांच्या प्रवासातील महत्त्वाचे वळण ठरले. KVK मध्ये सबा यांनी मत्स्यपालनाचे आवश्यक प्रशिक्षण घेतले. “त्यांनी तलाव बांधण्यापासून ते माशांची निवड, रोग व्यवस्थापन आणि पोषणापर्यंत सर्व काही शिकलेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा प्रवास सुरू करण्याचा सबा यांना आत्मविश्वास मिळाला. सबा यांनी 1 एकर जमिनीवर तलाव तयार करून मत्स्य शेतीची सुरुवात केली. त्यांनी “एमजे फार्महाऊस” नावाने आपली फर्म स्थापन केली. हळूहळू, त्यांनी त्यांचा हा व्यवसाय 1 एकरापासून 5 एकरांपर्यंत वाढवला आणि आता 15 एकर नेवून ठेवला आहे. ज्यात मालकीची आणि भाडेतत्त्वावर घेतलेली दोन्ही जमीन आहे. त्यांनी तयार केलेल्या तलावात भारतीय प्रमुख कार्प (कॅटला, रोहू आणि मिरगल) आणि देशी मांगूर आणि पंगाशियस सारख्या स्थानिक जातींसह माशांच्या प्रजातींचे मिश्रण आहे.
वार्षिक 20 लाखांची कमाई
सबा हे त्यांचे मासे स्थानिक बाजारात विकत होते, जे आंध्रच्या मास्यांप्रमाणे लोकप्रिय होते. त्यामुळे त्यांना फायदा झाला.” आज सबा 130 – 150 क्विंटल माशांचे उत्पादन घेत असून वार्षिक 20 लाख रुपये कमवत आहेत. “मी माझे उत्पादन दुप्पट केले तरी ते बाजारात पूर्णपणे विकले जाईल, असे सबा सांगतात. उदाहरणार्थ, 1 किलो IMC मासळी वाढवण्यासाठी ते सुमारे 80 रुपये खर्च करतात. जे ते थेट त्याच्या शेतातून 135 ते 150 रुपये प्रति किलो या दराने विकतात. त्यांच्या कॅटफिशची किंमत 70 – 75 रुपये प्रति किलो आहे आणि ते 100 – 105 रुपये प्रति किलो दराने विकत आहे. शेती आणि विक्री या धोरणात्मक दृष्टिकोनाने त्यांच्या आर्थिक यशात मोठी भूमिका बजावली आहे.