डॉ. बी. डी. जडे
आपल्या देशात हरभरा रब्बी हंगामातील प्रमुख कडधान्य पिक असून देशात या पिकाचे 111 लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादकता अतिशय कमी 11.08 क्विंटल / हेक्टर (फक्त 4.48 क्विंटल/एकर) एवढीच आहे. हरभरा पिकाची प्रामुख्याने पारंपारिक लागवड पद्धतीने केली जाते. पाटपाणी / मोकाट सिंचन पद्धतीने सिंचन केले जाते. काही शेतकरी सपाट जमिनीत लागवड करतात तर काही शेतकरी सरी वरंबा वर लागवड करतात. यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने धरणे पुर्ण भरलीत, भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावल्याने विहीरी आणि बोअरवेलमध्ये पाणी मुबलक उपलब्ध असल्याने रब्बी हंगामातील पिकांखाली क्षेत्र वाढणार असून शेतकऱ्यांचा कल हरभरा, मका, कांदा, सुर्यफुल, गहु या पिकांकडे असणार आहे.
हरभरा पिकाचे उत्पादन आणि आर्थिक फायदा अधिक मिळविण्यासाठी आपली मानसिकता बदलवून हरभरा पिकाची पारंपारिक पद्धतीने लागवड न करता आणि मोकाट सिंचन पद्धतीने पाणी न देता प्रगत तंत्रज्ञानावर लागवड करावी. लागवड पांभरीने पेरणी न करता टोकण पद्धतीने करावी. लागवडीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशक, ट्रायकोडर्मा आणि रायझोबीयम कल्चरची बीज प्रक्रिया करावी. हरभराची लागवड गादी वाफ्यावर केल्यास अधिक फायदेशीर आहे. गादी वाफ्याची रूंदी 60 सेमी (2 फूट) असावी, उंची 30 सेमी (1फूट) ठेवावी. गादी वाफे करताना रासायनिक खतांचा बेसल डोस 1 बैग (50 किलो) डी. ए. पी. + आर्धी बैग (25 किलो) पोटाश + 10 किलो सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे मिश्रण प्रती एकर उपयोग करावा. सिंचनासाठी ठिबक सिंचन किंवा रेन पोर्ट सिस्टीम स्प्रिंकलर्सचा उपयोग करावा. दोन्ही सिंचन पद्धतींना सुक्ष्म सिंचन पद्धती म्हणतात. हरभरा पिकासाठी जैन रेनपोर्ट स्प्रिंकलर्स (मॉडेल 5022) चा वापर करावा अथवा इनलाईन ठिबकचा त्यात जैन टर्बोएक्सेल, जैन टर्बोलाईन सुपर, कमी खर्चाची नळी जैन टर्बोस्लिम, जैन क्लास वन इनलाईन नळीचा वापर करावा.
सूक्ष्म सिंचन पद्धतीचे फायदे
सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे हरभरा पिकाचे उत्पादनात भरीव वाढ होते. पारंपरिक लागवडीत हरभरा पिकाचे शेतकऱ्यांना एकरी 4 ते 6 क्विंटल उत्पादन मिळते. उत्पादन कमी मिळाल्याने नफा कमी मिळतो. सुक्ष्मसिंचन पद्धतीवर एकरी 15 – 20 क्विंटल उत्पादन मिळणे शक्य आहे.
हरभराची उत्तम गुणवत्ता मिळते, हरभऱ्याची टपोरी दाणे मिळतात, पाणी वापरामुळे 40 ते 50 टक्के बचत होते.
जमीन कायम वाफसा ठेवता येत असल्याने उत्पादन अधिक देण्याची क्षमता वाढते.
हरभरा पिकात फुलगळ कमी होते आणि घाट्यांमध्ये दाणे चांगले भरले जातात.
रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढते.
ठिबक सिंचनाद्वारे रासायनिक खते दिल्यास खतांच्या वापरात बचत होते.
वेळ, मजूरी, विजेची बचत होते.
सूक्ष्म सिंचन पद्धतीमुळे कमी पाण्यात, कमी वेळेत, कमी विजेत अधिक क्षेत्र लागवडीखाली आणता येते.
रेनपोर्टच्या वापरामुळे दव, धुके (फॉग) पासून हरभरा पिकाचे संरक्षण होते. तसेच रस शोषण करणारी किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
तरी शेतकरी बंधूंनी हरभरा पिकाच्या अधिक उत्पादनासाठी सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करावा.
मनातील गैरसमज दूर करावा की पिकासाठी खूप जास्त पाणी दिले म्हणजे उत्पादन जास्त मिळते, असे होत नाही. पिकांच्या उत्तम वाढीसाठी पिकांच्या मुळlजवळ फक्त वाफसा हवा असतो. जास्त पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय तर होतोच शिवाय दिलेली खते ही झिरपून जातात. तसेच जास्त आद्रतेमुळे बुरशीजन्य रोगही वाढतात. हरभरा पिकास जादा पाणी दिल्यास हरभरा पिकात मर रोग येतो, हरभरा उभाळतो, उत्पादन ही कमी मिळते. यावर शेतकर्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हरभरा पिकाचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी सर्व शेतकरी बंधूंना शुभेच्छा.
अधिक मार्गदर्शनाकरिता आम्हास संपर्क करा.
आमच्या जैन ठिबकच्या लोकल डिलर यांना अथवा आमचे प्रतिनिधी यांना संपर्क करावा.
– डॉ. बी. डी. जडे
वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ,
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
942274981