मुंबई : सध्या पाऊस परतीच्या वाटेने निघाला आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढणार की ओसरणार ?, असा प्रश्न शेतकऱ्यांसह अनेकांना पडू लागला आहे. राज्यात आजपासून पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम राज्यातही होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल पाहायला मिळत असून राज्यातील काही भागात प्रचंड उकाडा जाणवत होता. त्यातच काल राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. वाढते तापमान आणि कुठे पावसाचा जोर असे दुहेरी संकट एकाचवेळी निर्माण झाले आहे. या वातावरणीय बदलांमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छ. संभाजीनगर, बीड, जालना, पुणे, मुंबई, मुबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, परभणी, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇