नाशिक : नत्र, स्फुरद व पालाशनंतर महत्त्वाचा अन्नघटक म्हणजे गंधक. पीएच वाढलेल्या जमिनीमध्ये गंधक वापरल्याने पिकांना अन्नद्रव्य शोषणाच्या क्रियांना गती मिळते. थायोग्रीन हे 90% गंधकयुक्त उच्च तंत्रज्ञानाने तयार केलेले गंधक खत आहे. हे पाण्यात 100% टक्के घुलनशील असल्याने ड्रीपद्वारे देता येते, शिवाय अमोनियम नायट्रेट वगळता इतर सर्व खतांसोबतही थायोग्रीन देता येते.
थायोग्रीनचे जमिनीतील फायदे
मुळाच्या कक्षेतील पीएच कमी होऊन अन्नद्रव्यांचे शोषण वाढते. चुनखडीचे विघटन होऊन कॅल्शियम व इतर अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात. क्षार असलेल्या जमिनीत क्षारांचे विघटन होऊन अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात. अन्नद्रव्य स्थिरीकरणास आळा बसतो. भू -सुधारकांचे फायदे मिळतात. जैविक व अजैविक ताण कमी होतो. जमिनीचे तापमान स्थिर राखल्या गेल्याने सूक्ष्मजीवांची कार्यक्षमता वाढून अन्नद्रव्य उपलब्धतेचे प्रमाण वाढते.
पिकांमधील फायदे
हरितद्रव्य निर्मिती, प्रकाश संश्लेषणामध्ये वाढ, विकरे उत्तेजित होऊन पिकांमधील विविध क्रिया गतिशील होतात, तेल वर्गीय पिकांमध्ये तेलाचे प्रमाण व प्रत वाढ, डाळवर्गीय पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढते, अमिनो आम्ले निर्मितीमध्ये सहभाग, नत्र स्थिरीकरणास मदत, कांदा लसूण पिकामध्ये तिखटपणा वाढ, साठवण क्षमता वाढ, हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाणात वाढ, कंदवर्गीय पिकांमधील स्टार्च प्रमाण वाढ.
थायोग्रीन देण्याची पद्धत व प्रमाण
थायोग्रीनचा वापर फक्त जमिनीतून करावा. जमिनीतील गंधकाचे प्रमाण पिकाचा कालावधी व पिकांची गंधकाची गरज अनुसरण थायोग्रीन एकरी 6 किलो ते 18 किलोपर्यंत ड्रिपद्वारे किंवा खतात मिसळून वापरावे. एकंदरीत ‘थायोग्रीन’ हे सकस अन्नधान्य निर्मितीसाठी अत्यंत मोलाचे गंधकयुक्त खत आहे. तसेच मिंगल व थायोग्रीनचा एकत्रित वापर सर्व पिकांना केल्यास पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता वाढीचा फायदा मिळतो.
अधिक माहितीसाठी संपर्क :-
ॲग्रीसर्च (इंडिया) प्रा. लिमिटेड
मो. नं. :- 9822650661
(जाहिरात पुरस्कृत)