मुंबई : महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज आणि उद्या राज्यातील काही भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई विक्रमी पाऊस झाला, मात्र राज्यातील काही भागात अजूनही पाऊस सर्वदूर पोहचला नाही. दरम्यान, आज रत्नागिरी, पुणे, ठाणे, रायगड आणि सातारा या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. उद्या (दि. 14 जुलै) रोजी मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
आज (दि. 13 जुलै) जळगाव, नाशिक, मुंबई. पालघर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या (दि. 14 जुलै) रोजी नाशिक, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.