आजकाल सतत पडणारा दुष्काळ व कमी झालेली मजुरसंख्या यामुळे शेतकऱ्यांना अंतर मशागतीसाठी बैलजोडी सांभाळणे अवघड झाले आहे. तसेही आता जवळपास सर्वच शेतकरी नांगरणीसारखी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्यानेच करतात; परंतु अंतरमशागतीसाठी आजही बैलावरच विसंबून आहे. काही जास्त शेती असणारे सधन शेतकरी मिनी ट्रॅक्टरचा वापर करतात. सर्वसामान्य शेतकऱ्याला मिनी ट्रॅक्टरची औजारासहीत जाणारी 7 लाखापर्यंतची मोठी किंमत व ट्रॅक्टर चालवण्यासाठी वाढणारे दोन ओळीतील अंतर यामुळे कमी होणारी एकरी रोप संख्या या गोष्टी परवडत नाहीत. खास अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी मोटारसायकल संचलित नंदिराज बाईक-बुल आंतरमशागत यंत्र उपयुक्त आहे. या यंत्राद्वारे पुढील कामे सहज होतात.
पेरणी
या यंत्राद्वारे कांदा, कापूस, सोयाबीन, तुर, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहु अशा जवळपास सर्वच पिकांची पेरणी करता येते.
उच्च दर्जाच्या पेरणी यंत्रामुळे खत व बियाणे एकाच वेळी योग्य अंतरावर समान प्रमाणात पडते.
पेरणी सरळ रेषेत होते, त्यामुळे अंतरमशागतीस अडचण येत नाही.
कापूस, तुर लागवड यंत्राने झाल्यामुळे मजुरांची गरज पडत नाही.
पाळी (वखरणी)
या यंत्राद्वारे कापूस, तूर अशा पिकातील पाळी (वखरणी) करता येते.
याद्वारे सोयाबीन, मका, बाजरी अशा पिकांमध्ये कोळपणी करता येते.
पेरणी, पाळी, कोळपणी यांचा सरासरी एकरी पेट्रोल खर्च 80 ते 100 रुपये येतो.
या यंत्राची रुंदी अॅडजेस्टेबल असल्यामुळे साडेतीन फुट अंतरावरील ओळीतही सहज चालते.
फवारणी
या यंत्रावर फवारणी यंत्र जोडून कापूस, तूर, सोयाबीन, मका आदी पिकांसह डाळींब, मोसंबी, द्राक्षे, आंबे अशा प्रकारच्या फळ पिकांवरसुद्धा फवारणी करता येते.
फवारणीसाठी सरासरी एकरी फक्त 50 रुपयांचा पेट्रोल खर्च येतो.
दिवसभरात 15 एकर कापूस, तूर व ४ एकर सोयाबीनची फवारणी करता येते.
वैशिष्ट्ये
यंत्रास मिनी ट्रॉली जोडून 5 क्विंटलपर्यंत माल वाहून नेता येतो
कोणत्याही जुन्या गाडीवर चालते. कुठल्याही 100 सी.सी. क्षमतेच्या मोटारसायकलला सहज जोडता येते.
कमी जागेत वापरता येते. रिव्हर्स गिअर सुविधेमुळे कमी जागेत चालवणे व
वळवणे सहज शक्य होते.
कांदा, कापूस, सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, गहू सर्व पिकांसाठी
उपयुक्त अंतर मशागत यंत्र
कमी मनुष्यबळ लागते.
कमी खर्चात कामे होतात.
वेळेची बचत होते.
बैलजोडी इतक्या किंमतीत उपलब्ध.
एकाच यंत्रात अनेक कामे.
संपर्क :
नंदीराज बाईक-बुल एजन्सी, बीड-परळी हायवे, ढेकणमोहा, बीड- 431153 मोबाईल : 9852021111, 9403788444