पुणे : जळगाव जिल्हा केळीचे आगार म्हणून ओळखला जातो. याच जळगाव जिल्ह्यातील यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीची सर्वाधिक आवक झाली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून केळीचे दर स्थिर आहेत.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, केळीची सर्वाधिक आवक यावल बाजार समितीत झाली असून केळीला पुणे-मोशी बाजार समितीत चांगला दर मिळाला. 15400 इतकी केळीची आवक ही यावल बाजार समितीत झाली असून येथे केळीला जास्तीत जास्त दर हा 1300 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीला 1900 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
केळी (20/05/2024) |
|||
नाशिक | क्विंटल | 230 | 1500 |
नागपूर | क्विंटल | 49 | 525 |
पुणे | क्विंटल | 6 | 1100 |
पुणे-मोशी | क्विंटल | 53 | 2750 |
यावल | क्विंटल | 15400 | 1200 |
सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- मान्सून अंदमान – निकोबारमध्ये दाखल ; महाराष्ट्रात कधी येणार ?
- आजचे कांदा बाजारभाव ; पहा कुठे मिळाला सर्वाधिक दर ?