गेल्या 3 वर्षात जवळपास 5 कोटी 58 लाख भारतीय नव्याने शेतीकडे वळले आहेत. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इंस्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट यांच्या “इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024” मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
कोविड साथीच्या काळात व नंतरही शहरी भागातील अनेक जण गावाकडे परतून शेतीकडे वळत आहेत. 2020 मध्ये, कृषी आणि संलग्न क्षेत्रातील कामगारांची संख्या 3 कोटी 8 लाखांनी वाढली. पुढील वर्षी, 2021 मध्ये कृषी क्षेत्रातील कामगारांमध्ये 1 कोटी 21 लाखांची भर पडली. 2022 मध्ये आणखी 1 कोटी 29 लाख नवे लोकं शेतीत सामील झाले. 2019-2022 मध्ये कृषी विकासाला चालना मिळाल्याचे अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
दुसरीकडं, इतक्या मोठ्या संख्येनं लोकांनी शेतीकडे परत जाणं, हे कदाचित नव्या संकटाचं लक्षण असू शकतं, आही भीती व्यक्त केली गेली आहे. बिगरशेती क्षेत्र रोजगार निर्माण करण्यास सक्षम नसल्यामुळे, लोकांना कृषी क्षेत्राकडे वळावे लागत आहे. त्यात महिलांची संख्या पुरूषांहून अधिक असल्याचं अहवालात म्हटलं आहे.