• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

बंदिस्त वातावरणात होईल केळीचे बंपर उत्पादन!

वातावरणातील बदल, नुकसानीपासून शेतीला शाश्‍वत करू शकेल असे जैन इरिगेशनचे शेतकरी हिताचे मॉडेल

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2024
in हॅपनिंग
0
बंदिस्त वातावरणात होईल केळीचे बंपर उत्पादन!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

बंदिस्त वातावरणातील केळी बाग हे जैन हिल्स कृषी महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. बंदिस्त लागवडीत उत्पादन जास्त मिळते. आठ महिन्यांत बाग कापणीला तयार होते. शेतकऱ्यांचा कमीत-कमी तीन महिने कालावधी वाचतो. उत्पादन कमीत-कमी वीस टक्क्यांनी वाढते. म्हणूनच बंदिस्त वातावरणातली केळी प्रथम दर्शनी खर्चाची वाटत असली तरी सुद्धा केळीच्या पिकाला शाश्वत करायचे असेल तर या तंत्रज्ञानाकडे केळी उत्पादक बंधूंनी बघणे गरजेचे आहे.

जैन हिल्सवरील हाय-टेक शेतीचा नवीन नवा हुंकार या कृषी महोत्सवांमध्ये अनेक शेतकरी बंधूंनी केळी पिकाच्या नवीन तंत्रज्ञानाबाबत उत्सुकता दाखविली. जैन हिल्सवर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन उभारलेले आहे, जे कृषी महोत्सवात हजारो शेतकऱ्यांनी उत्सुकतेने जाणून घेतले. ते बघण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरीवर्ग आला. बंदिस्त वातावरणातील केळी बाग हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले. इथे शेतकऱ्यांनी ओपन केळी बघितल्या, नंतर नेंद्रन, वेलची, रेड बनाना, बंथल या सगळ्या जातींचे आधुनिक मॉडेल शेतकऱ्यांनी या जैन हिल्सच्या कृषी महोत्सवात बघितले. तशाच प्रकारचे बंदिस्त वातावरणात म्हणजे शेड-नेट, ग्रीन हाऊस, पॉली हाऊसमध्ये केळी पिकाची लागवड, हे एक अनोखे आणि शाश्वत मॉडेल आहे.

 

सुजलाम सुफलाम झालेल्या शहादा येथे ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन | Agroworld Expo 2024 |

 

20-25 वर्षांपासून केळी उत्पादकांचे मोठे नुकसान
गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून वातावरण बदलामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. कधी वादळी पाऊस, कधी वादळी वारे, कधी गारपीट यामुळे केळी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. म्हणून आम्ही जैन इरिगेशनच्या माध्यमातून असे ठरवले की, जर आपण शेतकऱ्याला एखादा पर्याय देऊ शकत असू तर अशा प्रकारचा मॉडेल आपण उभे केले पाहिजे, जे केळीच्या शेतीला शाश्‍वत करू शकेल. या कृषी महोत्सवाच्या निमित्ताने हे मॉडेल या ठिकाणी उभे केले गेले.

2010 सालामध्ये केली गेली प्रयोगाला सुरुवात
याची सुरुवात सर्वप्रथम आम्ही 2010 सालामध्ये केली. बंदिस्त वातावरणामध्ये, जैन टिशू कल्चरच्या निर्मितीसाठी मदर नर्सरीत केळीची लागवड केली. कमर्शियल स्वरूपामध्ये या तंत्रज्ञानाला पुढे नेण्यासाठी ही लागवड केली. आज ही बंदिस्त केळीची लागवड शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बघायला उपलब्ध आहे. याचे वैशिष्ट्य काय आहे ?, याचे महत्त्व काय आहे ?, याचा उत्पादकाला फायदा काय, ते आपण बघू. सर्वप्रथम वाऱ्या वादळापासून पिकाचे संरक्षण होते. दुसरे रोगराईपासून संरक्षण, सीएमव्ही पासून संरक्षण, गारपीट पासून संरक्षण होते. केळीला शाश्वत करण्याचे काम बंदिस्त वातावरणातली केळी करते आहे.

ओपन प्लॉटमधील केळी पिकाला बसला फटका
जैन हिल्सवर प्लॉटमध्ये केल्या गेलेल्या प्रत्यक्ष लागवडीबाबत आपण बघू. 28 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर 2023 ला वादळ झाले, पाऊस झाला आणि ओपनमधली एका एकरामध्ये असलेली केळीची 240 झाडे पडली. परंतु, बंदिस्त वातावरणातील जी केळी आहे, त्याचे पानसुद्धा फाटले. त्यामुळे बंदिस्त वातावरणात दहा टक्केही नुकसान झाले नाही आणि उत्पादन वाढले. याउलट ओपन शेतीतील केळी उत्पादकांचा हातातोंडाशी आलेला घास पडला, जमिनीमध्ये गेला, नुकसान झाले. म्हणून बंदिस्त बागेमध्ये केळी लागवड सुरक्षित आणि फायद्याची ठरते..

बंदिस्त वातावरणात लागवडीचे अनेक फायदे
बंदिस्त वातावरणात लागवडीचे दुसरेही अनेक फायदे आहेत. आपण बंदिस्त केळी लागवडीमध्ये उष्ण तापमान असताना तापमान मेंटेंन करू शकतो. बाहेरचे कोरडे वातावरण आहे, तेव्हा आपण आतमध्ये आर्द्रता निर्माण करू शकतो. जळगावचे तापमान उन्हाळ्यात 47 अंशांपर्यंत जाते. हे आर्टिफिशल क्लायमेट आपण केळीच्या बागेमध्ये निर्माण करू शकतो. या बागेवर फादर, मायक्रो स्प्रिंकलर, फादरच्या माध्यमातून आर्द्रता निर्माण होते. मायक्रो स्प्रिंकलरच्या माध्यमातून केळीच्या पानावर घटकांचा फवारा होतो, त्याचे पोषण केले जाते. करपा किंवा कुठलाही रोग होत नाही; परंतु दिसला तर एका दिवसामध्ये मिनी स्प्रिंकलरच्या माध्यमातून करप्याचा स्प्रे केला जातो. किड्यांपासून रोगांपासून आणि नैसर्गिक नुकसानीपासून ही बाग वाचते.

शाश्वत शेती करण्याचा प्रयत्न
बंदिस्त लागवडीत आपल्याला उत्पादन जास्त मिळते. महोत्सवात जैन हिल्सवरील बाग आठ महिन्यांच्या अवस्थेतील आहे. आठ महिन्यांची बाग कापणीला तयार आहे. शेतकऱ्यांचा कमीत-कमी तीन महिने कालावधी वाचला. उत्पादन कमीत-कमी वीस टक्क्यांनी वाढले. म्हणूनच बंदिस्त वातावरणातली केळी प्रथम दर्शनी खर्चाची वाटत असली तरी सुद्धा केळीच्या पिकाला शाश्वत करायचे असेल तर या तंत्रज्ञानाकडे केळी उत्पादक बंधूंनी बघणे गरजेचे आहे. या मॉडेलला पुढे घेऊन जाऊन आमच्या शेतीला शाश्‍वत शेती करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला पाहिजे.

केळी बागायतदारांसाठी जैन हिल्स हे श्रद्धेचे स्थान
राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांनी नव्या शेतीचा नवा हुंकार अनुभवला. “चला जाऊया, जैन हिल्सवरील कृषी महोत्सवात,” असे म्हणत हजारो पावले या कृषी पंढरीकडे वळली. आपण नेहमी म्हणत असतो, पाऊले चालती पंढरीची वाट; इथे शेतकऱ्यांनी म्हटले, “पाऊले चालती, जैन हिल्सची वाट.” जशा पांडुरंगाच्या भक्तांना पंढरीची वारी हे श्रद्धेचे स्थान आहे, तसे महाराष्ट्र आणि देशातल्या केळी बागायतदारांना जैन हिल्स हे श्रद्धेचे स्थान आहे. त्यामुळे हजारो शेतकरी या महोत्सवामध्ये सहभागी झाले, त्यांनी शेतीतील नावे तंत्रज्ञान जाणून घेतले. केळी आणि इतर पिकांच्या विकासासाठी एकत्रितरित्या आपण सर्वांनी काम करावे, असं या निमित्ताने तमाम शेतकऱ्यांना आव्हान करतो आणि ॲग्रोवर्ल्डला धन्यवाद देतो.

लाल केळी लागवडीतून घ्या चांगले उत्पन्न
जैन हिल्सवरील हाय-टेक शेतीचा नवीन नवा हुंकार या कृषी महोत्सवांमध्ये अनेक शेतकरी बंधूंनी केळीबाबत उत्सुकता दाखविली. या ठिकाणी जी लाल केळी आहे, या लाल केळीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने जळगाव जिल्ह्यामध्ये प्रथमच जैन इरिगेशनने केलेला आहे. ही केळी तशी तामिळनाडू आणि केरळ या राज्याची आहे; परंतु महाराष्ट्रातील केळीच्या शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान आपण देत असतो. म्हणूनच जैन टिशू कल्चरच्या माध्यमातून या रोपांची निर्मिती केली गेली आहे.

लाल केळीमध्ये उपयुक्त कॅरोटोनाईटचे प्रमाण जास्त
लाल केळीमध्ये कॅरोटोनाईटचे प्रमाण जास्त आहे, पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे बेसिक्सचे प्रमाण जास्त आहे. याला टिकाऊपणासुद्धा जास्त आहे. त्यामुळेच या केळीला युरोपच्या बाजारपेठेमध्ये चांगली मागणी आहे. आखाती देशांच्या बाजारपेठेमध्येसुद्धा तिला मागणी आहे. आपल्याकडे उत्तर भारतामध्येसुद्धा लाल केळीची मागणी आहे. म्हणूनच लाल केळीचा प्रयोग आणि लाल केळीची लागवड महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी करावी.

जळगाव जिल्ह्यात लाल केळी लागवड डिसेंबरपासून मार्चपर्यंत करावी
जळगाव जिल्ह्यामध्ये लाल केळीची लागवड करायची झाली तर डिसेंबरपासून तर मार्चपर्यंत या तीन महिन्यांमध्येच आपण लागवड केली पाहिजे. कारण, मार्चच्या शेवटी जेव्हा तापमान वाढते, त्याच्या आधी या केळीचे कापणी संपली पाहिजे. नाशिक, ठाणे, पालघर, अलिबाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, चिपळूण, सांगली, कोल्हापूर, जुन्नर, नारायणगाव परिसर सौम्य वातावरणाचा भाग आहे. या परिसरामध्ये जर का आपण लाल केळीची लागवड केली तर अतिशय उत्तम पीक घेऊ शकता,

केळीला उत्तम रंग येण्यासाठी हवी जास्त आर्द्रता
लाल केळीला उत्तम रंग येण्यासाठी आर्द्रता जास्त पाहिजे आणि तापमान कमी पाहिजे. या दोन्ही-तिन्ही गोष्टी या संपूर्ण कोस्टल बेल्टमध्ये इव्हन गुजरातमध्ये बलसाड, वापी, सुरत, घोलवड तसेच उमरगाव, सिलवासा हा परिसरसुद्धा लाल केळीसाठी खूप चांगला आहे.

शेतकरी, केळी उत्पादकांनी रेड बनानाकडे वळावे
आता संपूर्ण जगाची फळ खाण्याची पद्धत ही बदलत चाललेली आहे. कॉस्मेटिक लूक असलेल्या फळाला मागणी वाढत आहे. आपण हिरवी केळी पाहिली, आपण गोल्डन यलो ग्रँड लाईन बनाना पाहिला, त्याचीही जगामध्ये प्रचंड मागणी आहे. त्याच्यासोबतच लाल केळीला सुद्धा मागणी आहे. त्याला कॉस्मेटिक लूक असल्यामुळे जगाच्या बाजारपेठेमध्ये खूप जास्त नसली तरी सुद्धा त्याची मागणी ही वाढत चालली आहे. त्यामुळे रेड बनाना केळीकडे शेतकरी, केळी उत्पादकांनी वळावे. त्यांनी जैन हिल्सवर येऊन बघावे, काय सुंदर बाग आहे, जणू चित्रांमध्ये आपण बघत आहोत.

जैन हिल्सवर केळीच्या 6 जातींची प्रत्यक्ष लागवड
जैन हिल्स या ठिकाणी प्रत्यक्ष सहा केळीच्या व्हरायटी लागवड आहे, ग्रॅनाईट आहे, लाल केळी आहे, पवन आहे, नेंद्रन आणि मंथन आहे, वेलची आहे. नेट हाऊसमध्ये केळीची शेती आहे. खुल्या जागेतही केळीची शेती आहे. वादळात खुल्यामधल्या केळी पडल्या. बंदिस्त जागेतील केली मात्र पाऊस पडल्यावरही संरक्षित राहिल्या. त्याचे पानसुद्धा फाटले नाही. यात केळीला खोलवर फिटिंग, मजबूत खोड आहे. सगळ्या प्रकारचे हाय-टेक मॉडेल जैन हिल्सवरील कृषी महोत्सवामध्ये केळी बागायतदारांना व इतर उत्पादकांना बघायला मिळाले.

बाजारात मागणी असलेली निर्यातक्षम केळी
महाराष्ट्र हे राज्य केळी उत्पादनाबाबत देशाच्या केळी उत्पादकांचा मुख्य आधार आहे. इथून संपूर्ण उत्तर भारतामध्ये केळी पाठविली जाते आणि इथूनच संपूर्ण जगामध्ये केळीची मोठी निर्यात होते. रेड बनाना ही एक अशी जात आहे, असे वाण आहे, ज्याला एक कॉस्मेटिक लूक आहे. या केळाचा रंग लाल आहे, याचा गरसुद्धा थोडासा गुलाबी आहे.

डॉ. के. बी. पाटील
केळी तज्ज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम, जळगाव

 

Panchaganga Seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • सर्वसामान्य शेतकरीदेखील करु शकतो हाय-टेक शेती ; जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांचा शेतकऱ्यांना सल्ला
  • केंद्र सरकारतर्फे गौरव कृषी क्षेत्राचा ; भारतरत्न झाले हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषी महोत्सवकेळी बागजैन हिल्स
Previous Post

सर्वसामान्य शेतकरीदेखील करु शकतो हाय-टेक शेती ; जैन इरिगेशनचे सह व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांचा शेतकऱ्यांना सल्ला

Next Post

कापसाला या बाजार समितीत मिळतोय चांगला दर ; वाचा आजचे बाजारभाव

Next Post
कापसाला या बाजार समितीत मिळतोय चांगला दर

कापसाला या बाजार समितीत मिळतोय चांगला दर ; वाचा आजचे बाजारभाव

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.