मुंबई : पीएम कुसुम योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजनेसाठी अनुदान किती असणार ?, घटक अ अंतर्गत पात्रता काय ?, अर्ज भरण्याची अंतिम मुदत काय ?, अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणती लागणार ?, अर्ज कसा करायचा ? हे आज आपण जाणून घेणार आहोत.
पीएम कुसुम योजना ही केंद्र सरकारने सुरु केलेली योजना आहे. सौर पंपाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, हा या योजनेचा उद्देश आहे. तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कुसुम सौरपंपसाठी चांगले अनुदान दिले जात आहे. मात्र, सौर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सौर पंपावर पाच ते दहा टक्के खर्च करायचा आहे.
शहादा येथे 23 ते 26 फेब्रुवारी दरम्यान ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन | Agroworld Expo 2024 |
योजनेसाठी अनुदान किती ?
सरकार शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान देते. यामुळे शेतकरी त्यांच्या विहिरीवर सौर पंप बसवू शकता. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी घटक अ अंतर्गत पुढील प्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे गट, वैयक्तिक शेतकरी, सहकारी संस्था, पंचायत, शेतकरी उत्पादक संस्था (FPOs), पाणी वापरकर्ता संघटना हे या योजनेचा लाभ घेऊ शकता. तसेच ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभारायचा आहे ते ठिकाण वीज उपकेंद्रापासून 5 किमीच्या अंतरावर असायला हवी.
या योजनेसाठी लागणारी ही आहेत आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड, अपडेट केलेला फोटो, ओळखपत्र, नोंदणीची प्रत, बँक खाते पासबुक, जमिनीची कागदपत्रे, मोबाईल नंबर ही कागदपत्रे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहे. तसेच या योजनेसाठीची अंतिम मुदत ही 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
या योजनेसाठीची अर्ज कसा करावा?
शेतकऱ्यांना प्रथम ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (pmkusum.mnre.gov.in) भेट द्यावी लागेल.
यानंतर येथे तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
लॉग इन केल्यानंतर ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करा.
येथे तुम्हाला तुमच्या स्वाक्षरीसह सर्व माहिती भरायची आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर युजर आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल.
यात तुमची माहिती युजर आयडी आणि पासवर्डद्वारे अपडेट करू शकता.
सर्व माहिती अपडेट केल्यानंतर अंतिम सबमिट बटनावर क्लिक करा.
पीएम कुसुम योजनेसाठीचा अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.