सध्याची दोन्ही चक्रीवादळे आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाची शक्यता नसली तरी सध्या वातावरण आल्हाददायक व्हायला त्याची मदत होत आहे. राज्याच्या अनेक शहरातील किमान तापमान सध्या खालावलेले असून पहाटे आणि रात्रीही थंडी जाणवू लागली आहे. आता महाराष्ट्र नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच ठंडा-ठंडा, कूल-कूल राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या थंड वातावरणाचा रब्बी हंगामाला मोठा फायदा होणार आहे.
देशभरातील अनेक राज्यात गेल्या 3-4 दिवसांपासून तापमानात घट होत असून थंडीची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात थंडी जाणवू लागली आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीची तीव्रता वाढणार असल्याचे म्हटले आहे.
करार शेती… म्हणजे शेतकर्यांसाठी हमखास उत्पन्नाची हमी। Contract Farming।
उत्तरेत गुलाबी थंडी, गारवा, धुके अन् बर्फवृष्टी
देशातील काही राज्यांमध्ये गारवा तर जाणवत आहेच. शिवाय, पहाटे गुलाबी थंडीसह धुक्याची चादरही दिसत आहे. अरबी समुद्रातील ‘तेज’ चक्रीवादळामुळे आता ओमानजवळ विसर्जित झाले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले हामून चक्रीवादळही कमजोर पडले आहे. मात्र, देशातील हवामानावर त्याचा परिणाम होताना दिसत आहे. चक्रीवादळामुळे देशातील अनेक राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होत आहे. अनेक भागांत विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यताही आयएमडीने व्यक्त केली आहे. त्यातच येत्या काही दिवसांत उत्तरेकडील पहाडी प्रदेशात बर्फवृष्टीचा अंदाज असून तापमान खालावणार आहे. त्यामुळे देशभरात थंड वारे वाहू लागतील.
थंडीचा रब्बी पिकांना फायदा, विक्रमी उत्पादन अपेक्षित
सध्याचा देशभरातील पाऊस आणि थंडी गहू, तेलबिया आणि कडधान्यांसाठी अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे देशात यंदाही रब्बी हंगामात विक्रमी उत्पादन होऊ शकते. सरकारने 2023-24 पीक वर्षासाठी (जुलै-जून) 332 मेट्रिक टन अन्नधान्य उत्पादनाचे उच्च उद्दिष्ट ठेवले आहे. यात रब्बी हंगामाचा वाटा 161.2 दशलक्ष टन असेल. त्यात मागील वर्षीच्या अंदाजे 112.74 दशलक्ष टनाच्या तुलनेत यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाचे वाढीव 114 दशलक्ष टन उत्पादनाचे उच्च उद्दिष्ट ठेवले आहे. पिकांचे आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी या रब्बी हंगामात हरभरा, तेलबिया, कडधान्यांचे उत्पादन वाढविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
डीएपी 1,350, तर एनपीके 1,470 रुपयात
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खजिना उघडला असून 22,303 कोटी रुपयांचे अनुदान (सबसिडी) दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत फॉस्फेटच्या पोषक तत्वांवर (P&K खतांवर) आधारित अनुदानालाही मंजुरी देण्यात आली आहे. या अनुदानाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना परवडणारी, अनुदानित खते रास्त दरात दिली जातील. यासोबतच डीएपी जुन्या किमतीतच मिळणार आहे. शेतकऱ्यांना डीएपी प्रति पोती 1,350 रुपयात मिळेल, तर एनपीकेची किंमत प्रति बॅग 1,470 रुपये राहील. शेतकऱ्यांना अनुदानावर खते दिली जातील. अनुदानानंतर सल्फर 89 रुपये प्रति किलो, पोटॅश 2.38 रुपये प्रति किलो, स्फुरद 20.82 रुपये प्रति किलो आणि नायट्रोजन 47.2 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होईल.
गव्हासह 6 पिकांच्या हमी भावात मोठी वाढ
यंदाच्या रब्बी हंगामासाठी केंद्र सरकारने गव्हासह 6 पिकांच्या हमी भावात (एमएसपी) मोठी वाढ केली आहे. वाढीव हमी भावामुळे पीक पेरा वाढून रेकॉर्डब्रेक रब्बी उत्पादनाची सरकारला अपेक्षा आहे. गेल्या हंगामासाठी गव्हाचा हमी भाव 2,125 रुपये होता. तो आता दीडशे रुपयांनी वाढवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यानं आता गव्हासाठी प्रति क्विंटल 2,275 रुपये इतका हमी भाव मिळणार आहे. याशिवाय, जव (जौ/सत्तू/बार्ली) – 115, हरभरा – 105, मसूर – 425, मोहरी (राई/सरसो) – 200, सूर्यफूल (कुसुम) – 150 याप्रमाणे हमी भावात वाढ करण्यात आली. त्यामुळे या हंगामात हरभऱ्याला 5,440, मसूर – 6,425, मोहरी – 5,650, सूर्यफूल – 5,800 आणि जवसाठी 1,850 रुपये इतका प्रति क्विंटल हमी भाव मिळणार आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- बाईकच्या किमतीत नांगरणी, खुरपणी करून देणारे ट्रॅक्टर; किंमत ऐकून म्हणाल, चला लगेच घेऊन येऊ….
- कापसाला या बाजार समितीत मिळतोय असा भाव