• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

लहान वयात शेतीत मोठे काम करून ठरला आदर्श

बांबरुड येथील मयूर वाघ यांचा प्रेरणादायी प्रवास

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2023
in यशोगाथा
0
लहान वयात शेतीत मोठे काम करून ठरला आदर्श
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

गौरव हरताळे
पाचोरा : वडिलांचे छत्र हरविल्यानंतर एका दहावीच्या विद्यार्थ्यावर आपल्या घराची संपूर्ण जबाबदारी आली. मोठ्या भावाने शिक्षणाचा मार्ग अवलंबला तर या लहान भावाने शिक्षण सोडून आपल्या परिवाराची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी आपल्या पारंपरिक शेती व्यवसायात या लहान वयात मोठ्या हिम्मतीने काम केले. आजोबांच्या आणि आई च्या शब्दाचा मान ठेऊन मोठ्या कष्टाने शेती कार्य करून आणि या शेतीत नवनवीन प्रयोग करून आज त्यांची संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एक आदर्श शेतकरी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. तसेच त्यांना खान्देश कृषी सम्राटासारख्या विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

 

mayur vagha

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बांबरुड (राणीचे) या गावातील मयूर अरुण वाघ या शेतकऱ्याची ही यशोगाथा. मयूर हे एक युवा शेतकरी असून त्यांनी सर्व तरुणाई समोर त्यांच्या नवीन शेती पद्धतीचा एक आदर्श ठेवला आहे. मयूर यांची सुरुवात ही काही सोपी नव्हती शालेय शिक्षण संपल्यानंतर मुलं मोठ्या उत्सुकतेने आपल्या पुढील जीवनाची रूपरेषा आखात असतात. त्याच वेळी मयूर यांच्या सोबत काळाने घात केला आणि त्यांच्या घरातील सर्वात जबाबदार व्यक्ती म्हणजे त्याचे वडील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांचे जीवन हे एका क्षणात बदलले. या विषयी मयूर सांगतात की, मी दहावीत असतांना माझ्या वडिलांचे हृदय विकारामुळे निधन झाले. ही त्यांच्यासाठी खूप हृदयद्रावक घटना होती. यातून सावरत असतांना आजोबा आणि आईने शेती करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आणि मोठ्या भावाने शिक्षण घेण्याचे ठरवले.

निर्मल रायझामिका 👇

पुढे मयूर सांगतात, आमच्याकडे १६ एकर बागायती शेती आहे. त्यात माझे वडील केळी हे पीक घ्यायचे. ते योग्य नियोजन करून शेती करत असल्यामुळे विक्रमी पीक घेत असत. वडिलांचे अनुकरण करून मी देखील उत्तम प्रकारे शेती करून दाखवील या आत्मविश्वासाने मी शेती करू लागलो. शेतीमध्ये काम करत असतांना मला शेती विषयी आवड निर्माण झाली. आवड असली की सवड निर्माण होते. त्यामुळे मी माझा जास्तीत जास्त वेळ शेती कार्यात देऊ लागलो. कुठलेही कार्य मनापासून केल्यास माणूस यशस्वी होत असतो हि खूणगाठ मनाशी बांधून मेहनत करत गेलो. मेहनती सोबतच शेतीच्या नवनवीन पद्धती आत्मसात करत गेलो. शेती मधील विविध पिकांचा अभ्यास करून पिके लागवडीस सुरुवात केली. यात केळी, कापूस, उन्हाळी तीळ, पत्ता कोबी, ठिबक सिंचनावर वर गहू, उन्हाळी सोयाबीन, मका, ऊस, पपई, अद्रक, सूर्यफूल या सर्व पिकांमध्ये मी आतापर्यंत विक्रमी उत्पादन घेऊन विविध आंतरपिके यशस्वी करून दाखवली असून मोसंबी पंजाबला तर केळी इराक पाठवली असल्याचे ते सांगतात.

 

Ajeet Seeds

पिकांचे योग्य नियोजन

कुठलेही कार्य करत असतांना आपण त्यासाठी नियोजन केले पाहिजे उत्तम नियोजनाने आपण कुठलेही कार्य यशस्वी रित्या करू शकतो. याची प्रचिती मयूर यांच्या कार्यातून येते. ते आपल्या शेतीत ५०% रासायनिक आणि ५०% जैविक पद्धतीचा अवलंब करतात. यामध्ये वेस्ट डी कंपोजर, जीवामृत, ताक व गूळ या सर्व सेंद्रिय बुरशीनाशकांसोबत गांढूळ खत या जिवाणू खतांचा समावेश असतो. यात अगोदर रासायनिक खते पिकांना दिल्यानंतर ८ ते १० दिवसानंतर पिकांना जैविक खते देत असतात. तसेच उत्पादन निघाल्यानंतर उर्वरित अपव्ययाचा उपयोग शेत जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी करत असतात. जसे केळी चे पीक निघाल्यानंतर त्याच्या उर्वरित भागाला न फेकता, न जाळता त्याला मातीमध्ये कुजवले जाते व त्यावर जैविक खतांची फवारणी करून मातीची सुपीकता वाढवली जाते. ज्यामुळे मयूर यांना शेतात नांगरणी करण्याची आवशक्यता भासत नाही. अशाच प्रकारे जिल्ह्यातील उष्ण तापमानाला पाहता मयूर यांनी शेतात एक नवीन प्रयोग करून बघितला. त्यात १ एकरात असलेल्या सूर्यफुलाचे उत्पादन घेतल्यानंतर ज्या सूर्यफुलाच्या काड्या उरतात त्यांचे शेजारीच असलेल्या मोसंबीच्या शेतात आच्छादन करून ४२ अंश सेल्सिअस तापमानातही मोसंबीचा बचाव केला आहे. मोसंबी ही अतिशय दर्जेदार असल्याचे मयूर सांगतात. त्याप्रमाणे पपईच्या १५ ते १६ फुटांच्या पिकात केळीचे आंतरपीक घेऊन केळी पिकाचे उन्हापासून संरक्षण करून उत्तम पीक घेत असतात. हाच प्रयोग त्यांनी गहू या पिकासाठी केला. यात मोसंबीच्या शेतात गहूचे आंतरपीक हे ठिबक सिंचनावर घेतले आहे. अशा प्रकारे हवामानाची, जमिनीची योग्य माहिती घेतल्याने व त्यात आंतरपिकांचे नवीन प्रयोग, जैविकांचा वापर केल्याने त्यांना चांगलाच फायदा झाला आहे.

रानभाज्यांची निर्मिती आणि दुग्धव्यवसाय

मयूर हे नियमित पिकांसोबतच रानभाज्यांचे सुद्धा उत्पादन घेत असतात. यात कटूरले, पाथरी, चिवळ, आडुचे पान, दोडीचे फुल या रानभाज्यांची समावेश आहे. कृषी विभागाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या रानभाजी प्रदर्शनात सर्व लोकांना या भाज्यांची ओळख व्हावी म्हणून प्रदर्शनात आवर्जून आपला सहभाग नोंदवतात. त्याप्रमाणे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून सोबतीला दुग्धव्यवसाय ते करत असतात. त्यांच्या जवळ ४ म्हशी आणि एक बैलजोडी असं पशुधन आहे. या पशूंच्या चाऱ्यासाठी ते आपल्या शेतातच चारा पिकवत असतात. यातून त्यांना अतिरिक्त नफा होतो.

 

या पिकांतून झाला फायदा

संपूर्ण १६ एकर शेतात मयूर हे वेगवेगळे पीक घेत असतात. मुख्य पिकांसोबतच ते अंतरपिकेही घेत असतात जेणेकरून वर्षभर उत्पादनाची वाट न बघता अंतरपिकांतून दोन ते तीन महिन्यांत उत्पादन मिळू शकेल. त्यांनी मागील वर्षी अडीच एकरातील तीन वर्षाच्या मौसंबी पिकातून २५ टन उत्पादन घेतले होते. यातून त्यांना लागवडीचा १ लाखाचा खर्च वगळता ६ लाख रुपयांचा फायदा झाला होता. त्याचप्रमाणे पपई या पिकातून १६० टन उत्पादन होऊन ९ लाखाची कमाई झाली होती.

या संदर्भात मयूर सांगतात की, अरबी कंद हे पिक पेरले असता त्यात आंतरपीक म्हणून हिवाळ्याच्या वेळेस पपईची लागवड केली. अरबी कंदाच्या पानांमुळे पपईची वाढ सुरक्षितरित्या झाली. तसेच आंतरपीक पत्ताकोबी या पिकातून एकरी दीड लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. सध्यस्थितीत मयूर यांच्या अडीच एकर शेतात असलेल्या मोसंबीच्या ४०० झाडांना जवळजवळ चार वर्ष झाली आहेत. या वर्षी त्यांना यातून ४० टन उत्पादन अपेक्षित आहे. याची कापणी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात होणार असून यातून त्यांना २५ ते ३० रुपये किलो प्रमाणे तब्बल १० लाख रुपयांचे उत्पन्न होणार असल्याचे ते सांगतात. त्यांच्या शेतात हल्ली टरबूज, पपई, मोसंबी, केळी, कापूस ही पिके आहेत.

 

सातत्याने नवीन काही करण्याचा प्रयत्न

जग हे परिवर्तनशील आहे त्याप्रमाणे आपण आपल्यात वेळप्रसंगी योग्य बदल केल्यास प्रगती साधू शकतो. अन्यथा, आपण मागे राहून जातो. मयूर वाघ यांनी आपल्या शेती करण्याच्या पद्धतीत वेळोवेळी बदल केलेत. त्यामुळे आज ते एक यशस्वी शेतकरी आहेत. आंतरपिकांच्या प्रयोगासह शेतीतील अपव्ययाचा वापर योग्य पद्धतीने करून म्हणजेच आपण ज्याला टाकाऊ म्हणतो त्यापासूनही त्यांनी शेतीची माती कशी सुपीक करता येईल याचा विचार केला. हा एक उत्तम प्रयोग होता. तसेच मक्याचे पीक घेत असतांना त्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान होण्याची भीती होती. पण, मयूर यांनी त्यावेळी जुगाड शोधून काढला. सर्व शेतकरी या लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मक्याच्या पानांवर फवारणी करतात. मात्र, या अळीची उत्पत्ती ही मक्याच्या पिकात होते. हे लक्षात घेऊन मयूर यांनी एक जुगाड तयार केला. ज्यात काही बॉटल घेऊन त्याच्या झाकणावर सुईने छिद्र करून त्यात १०० मिली डेलिगेट हे औषध टाकून त्याचे दोन ते तीन थेंब ज्या ठिकाणी कणीस तयार होते तेथे टाकले. या प्रयोगातून लष्करी अळीचा नायनाट होऊन पीक अधिक चांगले येऊ लागल्याचे ते सांगतात.

सिमला मिरचीच्या रोपांची लागवड

अनेक पुरस्कारांनी सन्मानित

मयूर वाघ यांचा ते करत असलेल्या प्रगत शेती पद्धतीमुळे सत्कार देखील झाला आहे. यात कोरोना काळात घरोघरी जाऊन भाजीपाला विक्री केला त्यासाठी कोरोना वीर पुरस्कार, खान्देश गौरव पुरस्कार २०२०, कृषिभूषण पुरस्कार, पुणे येथील किसान प्रगती पुरस्कार २०२२ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार २०१९ या प्रतिष्ठित पुरस्काराने सुद्धा मयूर यांना सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षी मयूर वाघ यांना खान्देश कृषी सम्राट २०२३ या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मयूर हे एक युवा शेतकरी आहे. त्यांनी युवा पिढीला दाखवून दिले आहे की, केल्याने होते रे आधी केलेची पाहिजे. या पुरस्कारामुळे त्यांना अजून मेहनत घेण्याची, शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे ते सांगतात.

 

अवगत केलेल्या ज्ञानाचा प्रसार व्हावा यासाठी तत्पर

मयूर हे आपल्या ज्ञानाचा नेहमी प्रसार करत असतात ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून करत असलेल्या शेती प्रक्रियेविषयीची माहिती अपडेट करतात. त्याप्रमाणे त्यांच्या शेती पद्धतीविषयी जाणून घेण्यासाठी जिल्ह्याभरातील तसेच जिल्ह्याबाहेरील शेतकरी येत असतात. तर काही शेतकरी भ्रमण ध्वनीच्या साहाय्याने त्यांच्याकडून माहिती घेत असतात. म्हणजेच अवगत केलेल्या ज्ञानाचा उपयोग फक्त स्वतःसाठी न करता त्याचा फायदा हा सर्व शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी मयूर नेहमी तत्पर असतात.

श्रीराम
Shriram Plastic And Irrigation

मयूर अ‍ॅग्रोवर्ल्डशी बोलताना सांगतात की, माणसाने बोलून न दाखवता करून दाखवले पाहिजे. कारण, या जगात चमत्कार दाखवल्याशिवाय आपल्याला कोणीच नमस्कार करत नाही. त्यामुळे मी जिद्द केली आणि रोज विविध पिकांचा अभ्यास केला जे काम हाती घेतले ते यशस्वी करून दाखवले. शेतीत जुगाड पद्धतीने नवनवीन प्रयोग करून आपणही नाव कमवू शकतो हे माझे काम आणि त्यासाठी मिळालेले पुरस्कार सिद्ध करतात. माझ्या सारखा छोट्या गावातील शेतकरी पंजाबला मोसंबी तर थेट इराक येथे केळी पाठवतो. हे मी शक्य करून दाखवले आहे. स्वतःच्या मेहनतीवर स्वतःची ओळख तयार केली आहे. मी एक प्रगतशील शेतकरी असल्याचा माझ्या आईला सार्थ अभिमान असल्याचे ते सांगतात.

 

मयूर यांचं हे यश शेती आणि मातीवर असलेल्या प्रेमामुळेच आहे. नवनवीन पिकांविषयी माहिती घेत असतांना इतरांच्या शेतात जाऊन तसेच कृषी प्रदर्शनातून प्रगत शेतकऱ्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणे त्याप्रमाणे आपण काय नवीन करू शकतो याचा ते नेहमी शोध घेत असतात. या त्यांच्या चिकित्सक वृत्तीमुळे त्यांनी हे यश अवगत केले आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय ; ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ
  • राज्यात सरासरीच्या 104 टक्के पाऊस ; पेरण्या 85 टक्के

Share this:

  • Facebook
  • X
Tags: बागायती शेतीबांबरुडमयूर वाघयुवा शेतकरी
Previous Post

महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय ; ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ

Next Post

कांद्याला सध्या असा मिळतोय दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

Next Post
कांद्याला सध्या असा मिळतोय दर

कांद्याला सध्या असा मिळतोय दर ; जाणून घ्या.. आजचे बाजारभाव

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.