• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अशी काढली जाते तापमान, पाऊसाची आकडेवारी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 29, 2023
in तंत्रज्ञान / हायटेक
0
तापमान
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

गौरव हरताळे
जळगाव :
दैनंदिन जीवन जगत असतांना मानवाला ऋतुमानानुसार ऊन, पाऊस, वारा, थंडी याचा सामना करावा लागतो. आजचे तापमान इतके, आज इतक्या मी.मी. पावसाची नोंद हे आपण नेहमी वाचत किंवा ऐकत असतो. परंतु, तुम्ही कधी विचार केलाय का? की, कशी काढली जाते ही आकडेवारी. त्यासाठी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो. चला तर मग जाणून घेवू या त्यासंदर्भात…

निर्मल रायझामिका 👇

तापमान

सर्वात आधी आपण तापमानाची कशी नोंद केली जाते, यासंदर्भात जाणून घेवू. सूर्याच्या उष्णतेची तिव्रता अर्थात पृथ्वीवर पडणार्‍या किरणांची तिव्रता नोंद करण्यासाठी सनशाईन रेकॉर्डरचा उपयोग केला जातो. त्याला आपण तापमान असे म्हणतो. सनशाईन रेकॉर्डर हा एक काचेचा गोळा असतो, त्याचा व्यास जवळपास 10 से.मी. पर्यंतचा असतो. हा काचेचा गोळा एका अर्धगोलाकार धातूच्या सहाय्याने समकेंद्रितरित्या ठेवलेला असतो. यात अर्धगोलाकार धातूवर एक पट्टी लावली जाते. काचेच्या गोळ्याच्या सहाय्याने पट्टीवर सूर्याची किरणे एकवटली जाऊन त्या पट्टीवर जळाल्याचे निशाण पडते. यावरून किमान आणि कमाल म्हणजेच जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमानाची नोंद केली जाते.

सनशाईन रेकॉर्डर
सनशाईन रेकॉर्डर

पावसाचे पर्जन्यमान

पावसाचे पर्जन्यमान हे मिलीलिटरमध्ये मोजले जाते. पर्जन्यमान मोजण्यासाठी अनेक प्रकारचे यंत्र आहेत. त्यातील रेनमीटर हे हाताळण्यास सर्वात सोपे यंत्र आहे. रेनमीटर हे धातूचे असून ते सिमेंटच्या साहाय्याने एका मोकळ्या जागेत जमिनीवर स्थापित केले जाते. त्याचा वरील भाग गोल तर खालील भाग शंखाकृती असून असतो. यात पावसाचे पाणी साठवले जाते. या साठलेल्या पाण्याला एका काचेच्या नळीच्या साहाय्याने मोजले जाते. यावरून किती पाऊस झाला याची नोंद केली जाते. तासी 2.5 मि.लि. व त्यापेक्षा जास्त नोंद झाल्यास त्याला साधारण पाऊस तर 60 मि.लि. व त्यापेक्षा अधिक नोंद झाल्यास त्याला जोरदार पाऊस म्हणून नोंद केली जाते.

 

हवेचा दाब

बैरोमीटर हे एक असे उपकरण आहे, ज्यात हवेचा दाब मोजला जातो. बैरोमीटरमध्ये पारा असतो. तो पारा स्वयंचलित पद्धतीने काम करीत असतो. हा पारा जस-जसा खाली खाली येतो, त्यावरुन हवेचा दाब किती? याची नोंद केली जाते. हा पारा अगदी खाली आल्यास वादळ-वारा येण्याची शक्यता वर्तविली जाते.

बाष्पीभवन यंत्र
बाष्पीभवन यंत्र

वार्‍याचा वेग

तापमान, पावसाची सरासरी जसी मोजली जाते, तसा वार्‍याचा वेगही मोजला जातो. अनिमोमीटर या यंत्राच्या सहाय्याने त्याचा वेग मोजला जातो. वार्‍याचा वेग हा किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या प्रमाणात मोजला जातो. (1 नॉट = ताशी 1.852 किमी.) अनिमोमीटर हे यंत्र उंच ठिकाणावर बसवले जाते.

 

वार्‍याची दिशा

दिशादर्शक हे हवेच्या स्तिथी दर्शविण्यासाठी उपयोगी ठरते. या यंत्राच्या सहाय्याने हवेची दिशा समजण्यास मदत होते. दिशादर्शक हे यंत्र सुद्धा उंचीवरच्या ठिकाणी स्थापित केले जाते. यात आठ आरे असतात यात सर्व दिशा असतात तर एक फिरता भाग असतो ज्याच्या सहाय्याने दिशा ठरवली जात असते.

Soil Thermometers
Soil Thermometers

जमिनीची उष्णता

ज्याप्रमाणे काही अंतरावर भाषा बदलते, त्याचप्रमाणे जमिनीची प्रतही बदलते. त्यासाठी जमिनीची उष्णता मोजण्यासाठी (Soil Thermometers) उष्णता मापीचा उपयोग केला जातो. या उपकरणाच्या सहाय्याने जमिनीतील 30 से.मी. पर्यंतचे तापमान मोजले जातो. हे यंत्र शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाचे असून या यंत्राच्या माध्यमातून जमिनीची प्रतपाहून त्याप्रमाणे पोषक वातावरण तयार केले जाऊ शकते.

 

Hygrometers
Hygrometers

हवेतील आद्रता

हवेत सामावलेल्या बाष्पाच्या प्रमाणाला आद्रता म्हणतात. हवेतील आद्रता ही पाऊस निर्मितीसाठी महत्वाचा घटक आहे. हवेतील आद्रता (Hygrometers) हायग्रोमीटर किंवा (Psychrometer) सायक्रोमीटर यंत्राच्या सहाय्याने मोजली जाते. या आद्रतेवरच पावसाची स्थिती अवलंबून असते. आद्रता नसलेली हवा कोरडी असते. यासाठीची एक सोपी पद्धतही आहे. ज्यात तांब्याच्या भांड्याचा उपयोग करून पाणी साठवण केली जाते. हवेचं तापमान कमी होत असतांना ज्या बिंदुवर दवं हवेपासून विलग होतात, तो बिंदु ड्यु पॉइंट म्हणून ओळखला जातो. ह्या बिंदुचे तपमान मोजूनही सापेक्ष आणि निरपेक्ष आद्रता शोधता येते.

Ajeet Seeds

जिल्हास्तरावरील कृषी विज्ञान केंद्रात स्थानिक हवामानाविषयीची माहिती घेतली जाते. दररोज सकाळी 8:30 वाजता व संध्याकाळी 4:30 वाजता या नोंदी घेतल्या जातात. हा सर्व डेटा कोडींग करून तो हवामान विभाग, मुंबई यांच्याकडे पाठवला जातो. तेथून हा डेटा प्रसिद्ध केला जातो.
(वरील सर्व माहिती कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथून संकलित केली आहे.)

Panchaganga Seeds

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • पीक विमा योजनेमध्ये 66 लाख शेतकऱ्यांनी नोंदवला सहभाग  
  • राज्यात आज 4 जिल्ह्यात रेड तर दहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; जाणून घ्या जळगाव, नाशिक, संभाजीनगरची स्थिती

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कृषी विज्ञान केंद्रतापमानपाऊसाची आकडेवारीममुराबाद
Previous Post

राज्यात आज 4 जिल्ह्यात रेड तर दहा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट; जाणून घ्या जळगाव, नाशिक, संभाजीनगरची स्थिती

Next Post

भारतातील कापसाची निर्यात 19 वर्षांच्या नीचांकी पातळीवर; शेतकऱ्यांचा तेलबिया, कडधान्याकडे वाढता कल

Next Post
भारतातील कापसाची निर्यात 19 वर्षांच्या नीचांकी पातळीवर

भारतातील कापसाची निर्यात 19 वर्षांच्या नीचांकी पातळीवर; शेतकऱ्यांचा तेलबिया, कडधान्याकडे वाढता कल

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.