मुंबई : आजच्या पावसाबाबत भारतीय हवामान खात्याचे पूर्वानुमान राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा इशारा देणारे आहे; पण आज सकाळपासूनची प्रत्यक्ष स्थिती थोडी वेगळी दिसत आहे. अरबी समुद्रात मुंबईच्या जवळ निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मुंबईसह घाटमाथा आणि मराठवाडा वगळता महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला गेलेला आहे. प्रत्यक्ष रडार आणि उपग्रह स्थिती अजून त्यासाठी अनुकूल ढगांची गर्दी आकाशात दाखवत नाही. अरबी समुद्राकडून वेगाने वारे वाहून येतील, तशी ही परिस्थिती बदलत जाण्याची व पूर्वानुमानानुसार, राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
Todays Rain IMD Forecast
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
येत्या 2-3 दिवसात राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज “आयएमडी”ने यापूर्वीच वर्तविला आहे, तर “स्कायमेट”नेही याआधीच कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक परिसरात पावसाचा इशारा दिला आहे. “आयएमडी”ने पूर्वानुमानानुसार, मंगळवारी ठाणे, पालघर, मुंबई आणि नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. याशिवाय, पुणे, सातारासह राज्यातील इतर जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला गेला आहे. याशिवाय, “आयएमडी”ने देशातील 25 राज्यात येत्या 4-5 दिवसात मुसळधार पावसाचा तर अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रासह आसाम, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीरचा त्यात समावेश आहे.

उद्यापासून वाढू शकतो पावसाचा जोर – स्कायमेट
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अशा दोन्ही बाजूने मान्सून प्रणाली विकसित होण्याची चिन्हे आहेत. “स्कायमेट”च्या अनुमानानुसार, कमी दाबाचे क्षेत्र मुंबईच्या जवळ जाणार असल्याने आज कोकण, मुंबईसह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत तर 100 मिमीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस आज मध्यम आणि पुढे उद्यापासून जोरदार असू शकेल. जूनच्या उर्वरित दिवसातही चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याने मुंबईसह राज्यातही बहुतांश ठिकाणी मासिक सरासरी गाठली जाण्याची दाट शक्यता आहे. सध्या तरी 11 जूनचा मान्सून मुंबईत 25 जून रोजी पोहोचल्याने पावसाची तूट मोठी आहे. मान्सूनच्या पहिल्याच दिवशी मुंबईत 176 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासातील पावसासह मुंबईत 256 मिमी पाऊस झाला आहे. जूनच्या सरासरी 526 मिमीच्या तुलनेत हा पाऊस निम्माच आहे.
देशभरातील पावसाची स्थिती
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02YSDeCcPNS4mLsVuysg3gKgVmYJcQRqpysc2yTS3TTX9Sg7jDnBWt6bcTpZneyDHel&id=100063849854050&mibextid=Nif5oz
राज्यात पावसाची 70 टक्के तूट
मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यापासून राज्यात सोमवारपर्यंत पावसाची तूट 70 टक्के इतकी नोंदविली गेली आहे. राज्यात या कालावधीत साधारणतः 170.8 मिमी इतक्या पावसाची नोंद होते. मात्र, यंदा या काळात आतापर्यंत राज्यात फक्त 51 मिमी इतकाच पाऊस झाला आहे. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यातच पावसाची तूट मोठी आहे. रत्नागिरी – 70%, पालघर – 46%, रायगड – 56%, ठाण्यात 63% तर मुंबईत शहरात 66 आणि उपनगरात 42 टक्के इतकी पावसाची तूट आहे. याशिवाय उर्वरित राज्यात पावसाची तूट 70 ते 90 टक्के इतकी मोठी आहे.

जिल्हानिहाय पावसाच्या अलर्टची सद्य स्थिती
राज्यातील जिल्हानिहाय पावसाच्या अलर्टची सद्य स्थिती आणि पावसाचा जिल्हानिहाय इशारा आपण पाहूया. ही आज सकाळी 9:30 वाजेच्या अपडेटवर आधारित आहे, जी साधारणतः पुढील 4 तासांसाठी कायम राहू शकते. यानुसार, सध्या फक्त ठाणे आणि पालघर जिल्हा तसेच विदर्भात गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता दिसत आहे. वरील ग्राफिकल छायाचित्रात पाहिल्यास आपणास हे लक्षात येऊ शकेल. नकाशातील हिरव्या भागात सध्या पावसाचा कोणताही अलर्ट नाही. म्हणजे या भागात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो. नकाशातील पिवळ्या भागात “वॉच” म्हणजे स्थिती बदलण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राकडून काकी दाबाच्या क्षेत्राच्या तीव्रतेत बदल झाल्यास किंवा नवी प्रणाली विकसित झाल्यास नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह पिवळ्या क्षेत्रात पावसाच्या स्थितीबाबत बदल घडवून आणू शकतो. तसेच बंगालच्या उपसागराकडून होणाऱ्या बदलांमुळेही विदर्भात पिवळ्या पट्ट्यातील पाऊसमान अवलंबून आहे.

उपग्रह, रडार आधारे राज्यातील पावसाची “आयएमडी” नाऊ कास्टनुसार आताची स्थिती
उपग्रह, रडार आधारे राज्यातील पावसाची “आयएमडी”च्या रिअल टाईम नाऊ कास्ट नुसार, सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास, विदर्भ आणि ठाणे-पालघर साठी स्थिती बदलण्यासाठी थांबण्याचा “वॉच” इशारा आहे (पिवळे आयकॉन). उर्वरित महाराष्ट्रासाठी कोणताही इशारा नाही (हिरवे आयकॉन).
होसाळीकर म्हणतात, पाऊस दाटलेला!
पुणे वेधशाळेच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी मात्र राज्यासाठी पाऊस दाटलेला असल्याचे साडे नऊ वाजेच्या ताज्या ट्विट मध्ये म्हटले आहे. त्यानुसार, नवी मुंबई, मुंबई आणि ठाण्यात आज सकाळपर्यंत गेल्या 24 तासात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. संपूर्ण कोकणसह मुंबई, ठाणे आणि पुणे, नाशिक व सातारा 2 दिवस ऑरेंज अलर्टवर आहे. विदर्भाच्या काही भागांसह. राज्याच्या इतर काही भागात यलो अलर्ट आहे.
“आयएमडी”चा आज दिवसभरासाठीचा ऑरेंज अलर्ट कायम
“आयएमडी”चा आज दिवसभरासाठीचा ऑरेंज अलर्ट सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासाठी कायम आहे. मराठवाड्यासाठी कोणताही अलर्ट नाही. विदर्भात वेगवान वाऱ्यांसह अति मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीठ होऊ शकते.