नाशिक : येथील ‘ग्रीनझोन अॅग्रोकेम प्रा. लि.’ संचलित ‘बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र’ आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने, दि. 20 मे (शनिवारी) आणि 21 मे (रविवारी) रोजी ‘बसवंत मधुक्रांती – 2023’ या राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. बसवंत गार्डन, पिंपळगाव बसवंत (मुखेड रोड), ता. निफाड येथे होणार्या या कार्यक्रमात मधमाशी पालन क्षेत्रातील देशपातळीवरील नामवंत मान्यवर सहभागी होणार आहेत.
‘मधमाशी पालनाची राज्यातील सद्य:स्थिती आणि नाविन्यपूर्ण संकल्पनेतून उद्योजकता विकास’ हे या परिसंवादाचा विषय असल्याची माहिती ‘ग्रीनझोन’चे कार्यकारी संचालक संजय पवार यांनी दिले असून विनामूल्य असलेल्या या दोन दिवसीय परिसंवादाचा मधुमक्षिका प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. हा उपक्रम 2019 पासून सुरू असून मधमाशी संगोपनातील प्रसारकार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींसह, महाराष्ट्रातील मधुउद्योजकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येते. यंदाही सात पुरस्कारार्थींना बसवंत मधुक्रांती’ पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. परिसंवादाचे उद्घाटन दि. 20 मे (शनिवारी) रोजी सकाळी 10 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तांत्रिक सत्रात पहिल्या दिवशी…
तांत्रिक सत्रात पहिल्या दिवशी ज्येष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. तुकाराम निकम जागतिक तसेच राष्ट्रीय पातळीवरील मधमाशी पालनाचा वेध घेतील. ‘ग्रीनझोन’चे कार्यकारी संचालक संजय पवार महाराष्ट्रातील अॅपी टुरिझमला असलेल्या व्यापक संधी विषयी मनोगत व्यक्त करतील. आग्या मधमाशीचे संवर्धन व मध उत्पादना बद्दल वर्धा येथील मधुप्रशिक्षक डॉ. गोपाल पालिवाल मार्गदर्शन करतील. मधमाशी वसाहतींच्या विभाजना च्या संदर्भात उत्तर प्रदेशातील तनिष्क ग्रामीण सेवा संघाचे सचिव संजीव तोमर विचार व्यक्त करतील. हरियानास्थित कंबोज हनी-बी फार्मचे संस्थापक सुभाष कंबोज व्यापारी तत्त्वावरील मधमाशी पालनाचा आढावा घेणार असून, चंदीगडचे उद्योजक मदन शर्मा मध उत्पादनाच्या जागतिक तसेच भारतीय स्थिती ची माहिती देतील.
तांत्रिक सत्रात दुसर्या दिवशी…
तांत्रिक सत्रात दुसर्या दिवशीच्या (21 मे) हिमाचल प्रदेशातील कृषिशास्त्रज्ञ डॉ. हरीश शर्मा हे परागीभवनासाठी मधमाशी सेवा पुरवठा या विषयावर बोलतील, तर दिल्ली येथील हायटेक नॅचरल प्रॉडक्ट युनिटचे संस्थापक डॉ. देवदत्त शर्मा मधमाशी क्लस्टर निर्मिती बद्दल विचार मांडतील. कोसबाडच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. उत्तम सहाणे फुलोरी मधमाशी संवर्धनाच्या तंत्रा विषयी बोलतील. सी.बी.आर.टी.आय.चे माजी तांत्रिक अधिकारी डॉ. धनंजय वाखले मधमाशीजन्य विविध उपयुक्त पदार्थां बद्दल माहिती देतील. ‘ग्रीनझोन’चे तांत्रिक सल्लागार डॉ. भास्कर गायकवाड महाराष्ट्रातील मधमाशी पालनाची सद्य:स्थिती आणि संधी यांचा परामर्श घेतील, तर नितीन कराळे बसवंत मधमाशी उद्यान आणि प्रशिक्षण केंद्राच्या योगदाना ची माहिती देतील.
पर्यावरणप्रेमी तसेच मधमाशी पालन व्यवसाय करू इच्छित असणारांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन परिसवांदाचे समन्वयक डॉ. भास्कर गायकवाड यांनी केले आहे.
परिसावादासाठी प्रवेश विनामूल्य मात्र नाव नोंदणी आवश्यक… अधिक माहितीसाठी
कैलास भामरे – 7420014781