मुंबई : PM Kisan Sanman Nidhi Yojana पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. आता शेतकरी पीएम किसानच्या 13व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. केंद्र सरकार 13 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधीही टाकू शकते. मात्र, हा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी करावयाच्या आहेत. त्या जर नाही केल्या तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहू शकता.
केंद्र सरकारनं गेल्या वर्षी 31 मे रोजी 10.45 कोटी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता म्हणून 22,552 कोटी रुपये जारी केले होते. मात्र केवळ 8.42 कोटी शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळाला. अशाप्रकारे दोन कोटी शेतकरी या योजनेचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिले. आम्ही तुम्हाला आज दोन महत्त्वाची कामे सांगणार आहोत.
‘ही’ आहेत महत्वाची दोन कामे
या माध्यमातून तुम्हाला 13 वा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला दोन महत्वाची कामे ही करावी लागणार आहेत. एक म्हणजे लवकरात लवकर ई-केवायसी आणि दुसरे म्हणजे भु लेखांची पडताळणी. होय ही जर कामे तुम्ही वेळीच केली नाही तर तुम्हाला 13 वा हप्ता मिळणार नाही.
जमीन पडताळणी
पीएम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांकडे 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असावी. शेतकरी हा जमिनीचा मालक आहे, यासाठी त्याला त्याच्या जमिनीची सातबारा पीएम किसान वेबसाइटवर अपलोड करावी लागेल जेणेकरून लाभार्थी शेतकरी जमिनीचा मालक असल्याचे सिद्ध होईल. कागदपत्रे तपासल्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या जमिनीची प्रत्यक्ष पडताळणीही करणार आहेत. जर तुम्ही पीएम किसान योजनेशी संबंधित असाल, तर तुमच्यासाठी जमिनीची पडताळणी करणे अनिवार्य आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करा, अन्यथा तुम्हाला हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागू शकते.
ई-केवायसी
पीएम किसान योजनेशी संबंधित सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे आवश्यक आहे. जर कोणी ते पूर्ण केले नाही तर त्याला मिळणाऱ्या हप्त्याचा फायदा अडकू शकतो. त्यामुळे, विलंब न करता, लवकरात लवकर ई-केवायसी करा. ई-केवायसी करणे खूप सोपे आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही PM किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल http://pmkisan.gov.in वर जाऊन स्वतः ई-केवायसी करू शकता. याशिवाय, तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन देखील ई-केवायसी करू शकता.
येथे संपर्क करा
पीएम किसान योजनेबाबत काही समस्या असल्यास, तुम्ही [email protected] या अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता. पीएम किसान योजनेचा हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 या क्रमांकावरही संपर्क साधता येईल. या योजनेशी संबंधित तुमची प्रत्येक समस्या येथे सोडवली जाईल.