मुंबई : Vangi Lagwad… भाजीपाल्यामध्ये वांगे हे सर्वाधिक आवडीने खाल्ली जाणारी भाजी आहे. त्यामुळे बहुतांश शेतकर्यांकडून वांग्याची लागवड करून उत्पन्न कमविले जाते. वांगी ही आकाराने लहान किंवा मोठी असतात, त्यांचा रंग हिरवा किंवा जामुनी असतो, हे आपण सर्वाना चांगलेच ठावूक असते. मात्र, वांग्यांचा रंग हा पूर्णपणे पांढरा असतो असे कोणी सांगितले तर आपला विश्वास बसणार नाही. मात्र हे खरे आहे. सध्या या वांग्यांना मोठी मागणी असून शेतकरी देखील याचे उत्पादन घेवून कमी दिवसात चांगला नफा घेवू शकतो. चला तर मग जाणून घेवू या पांढर्या वांग्यांची सविस्तर माहिती.
भारतीय कृषी संशोधन परिषद आणि भारतीय कृषी संशोधन संस्थेने ही पांढर्या वांग्यांची प्रजाती विकसित केली आहे. जी अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. हे वांगे अगदी अंड्यांसारखे दिसतात. इतर रंगाच्या वांग्यापेक्षा या वांग्यामध्ये अधिक पौष्टिक गुणधर्म आढळतात, त्यामुळे बाजारपेठेत विशेषत: परदेशात या वांग्याची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जम्मू, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि बिहार सारख्या राज्यांतील शेतकरी या पांढर्या वांग्याची लागवड करीत आहेत.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
कमी वेळेत अधिक उत्पादन
पूसा पांढरे वांगे 1 ही एक जलद वाढणारी वांग्याची प्रजाती आहे, जी लागवडीच्या 40 ते 55 दिवसांच्या आत फुलते. त्याची झाडे मध्यम उंचीची असतात. एका वांग्याचे वजन 50 ते 60 ग्रॅम असते त्यामुळे या वांग्याचे उत्पादन एक हेक्टरमध्ये 35 टन पर्यंत होते. एक हेक्टरमध्ये वांग्याची लागवड करण्यासाठी, 250 ग्रॅम बियाणे आवश्यक आहे, जे रोपवाटिकेत लावले जाते.
या दिवसात करा लागवड
पांढर्या वांग्याच्या लागवडीसाठी फेब्रुवारी आणि मार्च हा सर्वोत्तम काळ असतो. मात्र, भारतात अनेक ठिकाणी डिसेंबरच्या अखेरीसही त्याची रोपे लावली जातात. त्याचबरोबर जून-जुलैमध्येही या वांग्याची मुबलक प्रमाणात लागवड होते. त्यामुळे तुम्हालाही कमी वेळेत अधिक उत्पादन घ्यायचे असेल तर पांढरी वांगी हा एक उत्तम पर्याय आहे.
अशी करा लागवड
पांढर्या वांग्याची पेरणी करण्यासाठी सर्वात आधी एक ते दीड मीटर लांब आणि तीन मीटर रुंद कुदळाचा बेड तयार करावा, त्यानंतर ती माती मुरवावी आणि प्रत्येक बेडमध्ये सुमारे दोनशे ग्रॅम डीएपी टाकून जमीन सपाट करावी. यानंतर वांग्याच्या बियांवर थिरमची प्रक्रिया करावी, एक रेषा काढून त्यात पेरणी करावी. मग ते पेंढ्यानी झाकुन ठेवावे. त्यातून काही दिवसांत रोपे तयार होवून बाहेर येतील. अशा पद्धतीने पांढर्या वांग्यांची लागवड करून शेतकरी चांगले उत्पादन घेवू शकतो.