मुंबई : रब्बीच्या हंगामात गहू, हरभरा या प्रमुख पिकांसह मका या पिकाचे (Maka pik) उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे या पिकाची लागवड करतांना कोण कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत. पिकावर रोग येवू नये, अळी पडू नये, यासाठी काय काळजी घ्यावी, याची माहिती आपण सर्वांना असणे गरजेचे आहे. आजच्या या बातमीत खोडकिडा, कणसातील अळीच्या नियंत्रणासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत जाणून घेणार आहोत.
मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक असून त्याच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, उत्तम निचर्याची आणि अधिक जलधारणाशक्ती असलेली जमीन असणे महत्वाचे आहे. मकाच्या योग्य वाढीसाठी 25 ते 30 अंश (से) तापमान चांगले असते. ज्या ठिकाणी तापमान 20 ते 25 अंश (से.) आहे, अशा ठिकाणी मकाचे पिक वर्षभर घेता येते. 35 अंश (से) पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. मका या पिकावर लष्करी अळी, खोड पोखरणारी अळी, खोडमाशी, मावा यांचा प्रादुर्भाव होत असतो, याचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात घट होवू शकते. त्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
अशी करा फवारणी
मका पिकावर (Maka pik) पडणार्या लष्करी अळीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी मका पिका भवती नेपिअर गवताच्या तीन ते चार ओळी लावाव्यात. हे गवत सापळा पीक म्हणून कार्य करते. या गवतावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास पाच टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टिन 1500 पी पी एम 50 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, जेणेकरून लष्करी अळीवर वेळीच नियंत्रण मिळविता येईल.
मकाच्या निरोगी वाढीसाठी तसेच दर्जेदार उत्पादनासाठी फवारण्या करणे गरजेचे आहे. मकाच्या उगवणीनंतर पहिली फवारणी 15 दिवसांनी करावी. जर्मिनेटर 250 मिली, थ्राईवर 250 मिली, क्राँपशाईनर 250 मिली, प्रिझम 100 मिली, प्रोटेक्टंट 100 ग्रॅम, हार्मोनी 100 मिली, स्प्लेंडर 100 मिली आणि 100 लिटर पाणी आदींचे मिश्रण करून फवारणी करावी. दुसरी फवारणी उगवणीच्या 25 ते 30 दिवसांनी थ्राईवर 500 मिली, क्राँपशाईर 500 मिली, राईपनर 250 मिली, प्रिझम 250 मिली, न्युट्राटोन 250 मिली, हार्मोनी 250 मिली, स्प्लेंडर 250 व 150 लिटर पाणी आदींचे मिश्रण करून करावी.
तिसरी व शेवटची फवारणी उगवणीच्या 40 ते 45 दिवसानंतर करावी. थ्राईवर 750 मिली, क्राँपशाईर 750 मिली, राईपनर 500 मिली, प्रोटेक्टंट 500 ग्रॅम, प्रिझम 500 मिली, न्युट्राटोन 500 मिली, हार्मोनी 300 मिली, स्प्लेंडर 300 मिली व 200 लिटर पाणी आदींचे मिश्रण करून करावी. यामुळे पिकावर कोणताही रोग न पडता उत्पादनात वाढ होवू शकते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇