मुंबई : Gram Crop… महाराष्ट्रात रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा, गहू या पिकांची लागवड केली जाते. त्यातही हरभरा पीक (Gram Crop) हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, हरभरा पिकावर येणाऱ्या विविध रोगांमुळे उत्पादनात घट होते. हरभरा वाढीच्या वेळेला मर, मूळकुजव्या सारखे रोग आणि घाटे आळी सारख्या किडींचे लक्षणे ओळखून नियंत्रण करणे फार गरजेचे आहे. आज आपण मर रोग व त्याचे व्यवस्थापन, लक्षणे आणि नियंत्रण जाणून घेवू या.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
मर रोग व्यवस्थापन
मर रोग फ्युजाहियम ऑक्सिस्पोरम बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार जमिनीमधून आणि बियाद्वारे होतो. हा झाडाच्या अन्नद्रव्य वाहून घेऊन जाणाऱ्या पेशीला मारतो. मर रोगाची बुरशी ६ वर्षापर्यंत जमीनीत जिवंत राहू शकते. पण ज्या भागात हवामान जास्त थंड राहते, तेथे याचा प्रार्दुभाव कमी दिसतो.
अशी आहेत लक्षणे
झाडाचा जमिनीवरचा भाग, देठ आणि पाने सुकतात व झाड वाळून मरतात. कोवळी रोपे सुकतात, जमिनी खालचा खोडाच्या भागाचा रंग कमी होतो. रोगग्रस्त झाडाच्या खोडांना उभा छेद पडून फिकट तांबुस काळसर रंग दिसून येतो.
असे करा व्यवस्थापन
पिकांची मर रोगापासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळेवर पेरणी करावी. मोहरी किंवा जवस आंतरपीक म्हणून घ्यावेत. रोग प्रतिकारक्षम जातीचा वापर करावा. यात पीकेव्ही, हरिता, बीडी एन जी ७९७, दिग्विजय, जेएससी ५५ आदी बियाण्यांचा समावेश आहे.
रोग नियंत्रणासाठी उपायोजना
मर रोगाच्या नियंत्रणासाठी लागवडीपूर्वी ३ ग्रॅम कार्बेन्डाझिम (बाविस्टीन) किंवा कारबॉक्सिन + २ ग्रॅम थायरम + ४ ग्राम ट्रायकोडर्मा व्हिरीडी /किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते. तसेच हा प्रादुर्भाव दिसून आल्यास शिफारशीनुसार बुरशीनाशकाचा वापर करावा.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇