पुणे/नवी दिल्ली : लवकरच रिटर्न मान्सूनला अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. पुढील 3 दिवसात शेवटचे कमी दाब क्षेत्र बंगालच्या उपसागरात आकार घेऊ शकते. त्यामुळे 26 सप्टेंबरपासून महाराष्ट्रातील पाऊसमान कमी होण्याची शक्यता आहे.
यंदा, रिटर्न मान्सून 17 सप्टेंबर रोजीच राजस्थानातून प्रवासाला सुरवात करेल, असा अंदाज हवामान विभागाने सुरुवातीला वर्तवला होता. नंतर तो बदलण्यात आला. राज्यात सध्या सर्वत्र सुरू असलेला पाऊस हा परतीचा मान्सूनचा नसून शेवटच्या टप्प्यातील सक्रीय मान्सून असल्याचेही आयएमडीने स्पष्ट केले आहे. गेल्यावर्षी राज्यातून 6 ऑक्टोबर रोजी मान्सूनच्या परतीला सुरवात झाली होती.
शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज। PMEGP Scheme।
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/ScTiASiJrCo
आता बंगालच्या उपसागरात आणखी एक कमी दाब क्षेत्र निर्माण झाले आहे. याच्या प्रभावामुळे विदर्भ आणि लगतचा मराठवाडा, खान्देशात 20 ते 24 सप्टेंबरदरम्यान बऱ्याच भागात जोरदार पाऊस राहणार आहे. मान्सून 2022 मधील बंगालच्या उपसागरातील ही शेवटची सिस्टिम असेल.
ऑफर : स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात
रिटर्न मान्सूनला अनुकूल परिस्थितीची चिन्हे
पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी ॲग्रोवर्ल्डला सांगितले, की मान्सून परतीचा प्रवास जवळ आलाय. पुढील 3 दिवसात वायव्य भारतातील काही भागात नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. उत्तर पश्चिम भारतावर चक्रीवादळविरोधी प्रवाह खालच्या पातळीवर असल्याचे भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) म्हटले आहे. त्यामुळे येत्या 3 दिवसांत राजस्थानातून परतीचा मान्सून सुरू होऊ शकतो. महाराष्ट्रातून त्याच्या परतीला ऑक्टोबर उजाडेल.
26 सप्टेंबरपासून मान्सून ब्रेक फेजमध्ये जाणार
24 सप्टेंबरनंतर मान्सून 2022चा परतीचा प्रवास सुरू होत आहे. 26 सप्टेंबरपासून मान्सून ब्रेक फेजमध्ये जाणार आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील पाऊसमान कमी होण्याची शक्यता आहे. 28 सप्टेंबरच्या आसपास पाकिस्तान, राजस्थानवर चक्रीवादळविरोधी प्रवाह (अँटी सायक्लोन) निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच मान्सून परत जाण्याची प्रक्रिया चालू होईल.विदर्भ, मराठवाड्यातून मान्सून प्रत्यक्षात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात परत् जाण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण मात्र त्याआधीच कमी होईल.
राज्यातील काही भागात 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार
राज्यातील काही भागात 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. असल्याचा अंदाज आहे. त्यानंतरच परतीच्या पावसाच्या प्रवासाला सुरवात होणार आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर तसेच विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये, कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पालघर परिसरात 20 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे.
नव्या चक्रीवादळामुळे ओडिशात जोरदार पाऊस
बंगालच्या उपसागरात ओडिशानजीक लवकरच कमी दाब क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामुळे ओडिशा, उत्तर प्रदेशसह उत्तरेकडील आणि उत्तर-पूर्वेतील अनेक राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली गेली आहे. अपेक्षित कमी दाबाचे क्षेत्र आणि मान्सूनच्या जोरदार प्रवाहाच्या प्रभावाखाली, 20 सप्टेंबर रोजी उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागराच्या खोल समुद्राच्या परिसरात 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह वादळी हवामानाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाच्या प्रभावाखाली 18 सप्टेंबरपासून ओडिशामध्ये पावसाच्या हालचालींमध्ये वाढ होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. ओडिशाच्या खोरधा, कटक, केंद्रपारा, जगतसिंगपूर, पुरी आणि गंजमसह अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. आयएमडीच्या भुवनेश्वरमधील प्रादेशिक केंद्रानुसार, सोमवारी राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाच्या हालचाली होतील.
अमेझॉन प्राईम मेंबरशिप : फ्री डिलिव्हरी, अतिरिक्त डिस्काउंट
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Amazing : पुण्यात आयव्हीएफ तंत्रज्ञानाने साहिवाल वासरू घातले जन्माला; 27 किलो वजन
- बी.एस.सी. अॅग्री की बी.टेक. अॅग्री इंजिनिअरिंग? कृषी पदवीसाठी कोणता पर्याय अधिक उत्तम…
Comments 1