गाईंच्या प्रमुख जाती
साहिवाल (राज्यस्थान)
आपल्या भारतीय गोवंशामध्ये सर्वोत्तम दूध देणारा व दुधाची खाण म्हणून परिचीत असलेला गोवंश म्हणजे साहिवाल गोवंश होय तीव्र उन्हाळ्यात व विषम हवामानात तग धरुन राहणारा असा गोवंश चांगले गुण पुढच्या पिढीत खात्रीने संक्रमीत करणारा म्हणून देखील या गोवंशाची ओळख आहे. या गोवंशाचे मुळ उगमस्थान माँटगोमेरी (सध्या पाकीस्तानमध्ये) हे आहे, तेथून हा गोवंश पंजाब राज्यापर्यंत पसरला आहे. भारत पाक सीमेजवळील फिरोजपूर, अमृतसर, हरीयाना, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड तसेच मध्यप्रदेश या राज्यांमधील काही भागात हा गोवंश चांगल्या प्रकारे सांभाळला जात आहे व विक्रिसाठी उपलब्ध असतो.
वैशिष्ट्ये- या गोवंशाचे बैल मध्यम आकाराचे असतात. बैलांचा रंग गायींप्रमाणेच असतो परंतु वशिंड जवळ काळसर गडद छटेचा असतो. कपाळाच्या मध्यभागी जरा केस जाड असतात. नाकपुडी काळी गोलाकार असते. वशिंड मध्यम आकाराचे घट्ट असते. या गोवंशाचे बैल मंद असतात त्यामुळे फक्त पैदाशीसाठी वापरले जातात. शेतीकाम व वाहतुकीसाठी कमी वापरेल जातात. पूर्ण वाढ झालेल्या व उत्तम तयारीच्या बैलाचे वजन 500 ते 525 कि. गॅ. असू शकते तर पूर्ण वाढ झालेल्या व उत्तम तयारीच्या गायीचे वजन 320 ते 345 कि. ग्रॅ पर्यंत असू शकते. शरिराची मापे पुढील प्रमाणे असतात.या गोवंशाच्या कालवडींचे प्रथम माजाचे वय अंदाजे 30 ते 36 महिन्यांचे दरम्यान असते. प्रथम वेतामधील दुग्धोत्पादन (सर्वात जास्त) 24 तासामधील 8 ते 9 लिटरच्या दरम्यान सहज असते. दोन वेतांमधील 8 ते 9 लिटरच्या दरम्यान सहज असते. दोन वेतांमधील अंतर 18 ते 21 महिन्यांचे दरम्यान असते, तर यामधील संपुर्णत: भाकडकाळ हा 3 ते 5 महिन्यांचे दरम्यान असू शकतो. या गोवंशाच्या गायी स्वभावाने अतिशय शांत असतात, मालकावर जिवापाड प्रेम करतात. सर्वात महत्वाचे म्हणजे दूध काढण्याचे वेळी पान्हा चोरणे, लाथ मारणे, वासरासाठी दुधाचा पान्हा परत सोडणे अशा प्रकारच्या कोणत्याही खोड्या नसतात.
आपल्या देशात प्रथमपासून मिलिटरी डेअरी फार्म, सरकारी डेअरी फार्म, शासकीय कृषी महाविद्यालय ह्यांचेकडे मुळचा गोवंश म्हणून उपयोगात आणला आहे. ह्या गोवंशाच्या उत्तम गायीची किंमत साधारणपणे 35 ते 40 हजारांचे दरम्यान असते. एका जागी चांगल्या मेहनतीवर एका मालकाकडे 10 ते 12 वेणी सहज होतात.
अमृतमहल (कर्नाटक)
भारतीय गोवंशापैकी ज्या गोवंशाचे ब्रिटीश सत्तेला सुद्धा मोहीत केले व संशोधनात्मक कार्यास भाग पाहले, असा अंगामध्ये प्रचड ताकद, विलक्षण चपळाई व कामामध्ये कमालीचे सातत्य असा त्रिवेरी गुणांचा संगम असलेला गोवंश म्हणजे अमृतमहल गोवंश होय. या गोवंशाचे मुळ उत्पत्तीस्थान स्वातंत्र्यपूर्व काळातील म्हैसूर संस्थान हे आहे. ब्रिटीशांच्या काळात मिलेटरी बैलफ म्हणून या बैलांची ओळख परिचीत होती. कारण सैन्याच्या तोफा वाहून नेणे, आरमाराचे अवजड सामान अडचणीचे जागी वाहून नेणे, लांबपल्याची वाहतूक कमीतकमी वेळात करणे. इ. कामे हे बैल करत असत.
वैशिष्ट्ये- या जातीचे बैल एकहाती जास्त होतात. त्यांना चार माणसांची सवय करणे अत्यंत गरजेचे आहे. हया बैलांचा विश्वास येण्यास बराच कालावधी लागतो पण एकदा खात्री झाली की विश्वासघात कमी होतो. अत्यंत तापट स्वभावाचे असतात. या गोवंशातील कालवडींचे प्रथम माजावर येण्याचे वय 36 ते 42 महिन्यापर्यंत असते. गायींमध्ये पहिल्या पाच वेतांमध्ये सलग दुग्धोत्पादन वाढीव असते. व्यायल्यानंतर दुधाच्या ऐनभरामध्ये दिवसाकाठी 4 लिटस पर्यंत दूध सहज देतात. वासरु गायी बरोबर मोकळे ठेवल्यास दोनदोन तासांनी सुद्धा संपूर्णपणे पान्हावून वासरांना दूध पाजतात. या जातीच्या खोंडाना वयाची 3 वर्षे पूर्ण झाली की हळूहळू शेतीची कामे शिकवण्यास व कायम थोडाथोडा वेळ धरण्यास सुरुवात करावे, खोंड दाती जुळवा की लगेच रक्त्यीकरण करावे म्हणजे अंगाने चांगला भरतो. या गायींचे दोन वेतांमधील अंतर 18 ते 24 महिन्यांचे असते तर त्यामधील संपूर्णत: भाकडकाळ 6 ते 9 महिन्यांचे दरम्यान असतो. पूर्ण वाढ झालेल्या बैलाचे वजन 400 ते 425 कि.ग्रॅ. तर गायीचे वजन 275 ते 300 कि.ग्रॅ. असते. हा गोवंश शेती व शर्यतीचे बैल म्हणून प्रामुख्याने उपयोगी असल्याने खोंडाना लहानपणापासून विशेष काळजीने वाढविले जाते. उत्तम अशा एका खोंडाची किंमत 50 हजारापासून 1 लाखापर्यंत असते तर उत्तम गायीची किंमत 40 हजारापर्यंत सहज असते.
कॅरन फ्राई गाय
राजस्थानमधील थारपारकर जातीची गाय उष्ण आणि दमट हवामानातही सशक्त राहू शकते. पण ही जात दुधासाठी मात्र सर्वसाधारण अशीच समजली जाते. या थारपारकर जातीचा आणि होस्टन फ्रिजियन जातीच्या कृत्रिम संकर करून कॅरन फ्राई या नव्या संकरीत गायीचा विकास करण्यात आला आहे. या संकरीत गायीची गाईंच्या अंगावर, कपाळावर आणि शेपटीच्या गोंड्यावर काळे-पांढरे ठिपके डाग असतात. आचळे गडद रंगाची असतात व दुधाच्या शिरा ठळकपणे दिसतात.
वैशिष्ट्ये- कॅरन फ्राई जात स्वभावाने अतिशय शांत असतात. गो़र्यांपेक्षा गाय लवकर वयात येते व वयाच्या साधारण 32-34 व्या महिन्यामध्ये गाभण राहू शकते. गर्भार काळ 280 दिवसांचा असू शकतो. पहिल्यांदा वासरू दिल्यानंतर पुन्हा 3-4 महिन्यांतच या गायी पुन्हा गाभण राहू शकतात. त्यामुळे स्थानिक जातींच्या तुलनेने हे ही संकरीत जात फायदेशीर पडते. कारण स्थानिक जातीच्या गाई पुन्हा गाभण राहण्यासाठी 5-6 महिने जावे लागतात.
दुधाचे उत्पन्न कॅरन फ्राई जातीची गाय वर्षाकाठी सुमारे तीन ते साडेतीन हजार लिटर्स दूध देतात. एका प्रयोगात या जातीच्या गायीने साधारणतः तीन हजार सातशे लिटर्स दूध दिल्याची नोंद आहे. ह्या दुधामधील स्निग्धांश-फॅटचे प्रमाण 4.2 टक्के आहे व लॅक्टेशन वासराच्या जन्मानंतरच्या तीन चार महिन्यांत दुधाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे दिवसाला पंचवीस ते पस्तीस लिटरपर्यंत जाते. दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे या गायीच्या आचळांची काळजी घ्यावी लागते. त्यांना जंतुसंसर्ग होऊ नये व त्यांच्या दुधामधील विशिष्ट खनिजांचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी वेळीच लक्ष द्यावे लागते.
विदेशी गायी
जर्सी
इंग्लिश खाडीतील जर्सी बेटातील या गायी विदेशी गुरांमधील लहान जातीची जनावरे होत. या गुरांचा रंग लालसर पिवळा असून या रंगाच्या निरनिराळ्या छटा दिसतात. वळूमध्ये रंग काळसर पण असतो. काही गुरांच्या अंगावर पांढरे चट्टे आढळतात. इतर विदेशी गुरांच्या मानाने हि गुरे उष्ण हवामान चांगल्या रीतीने सहन करू शकतात. गायीचा दुध देण्याचा कालावधी 300 दिवस, सरासरी उत्पन्न 4000 लिटर तर सरासरी आयुष्य 12 वर्षे असते.
होल्स्टीन फ्रिजीयन
हॉलंड या युरोपीय देशातील ही गुरे आकारमानाने मोठी असतात. त्यांचा रंग संपूर्ण पांढरा किंवा काळेपांढरे पत्ते असतात . काही गुरे लाल पांढर्या रंगाचेही आढळतात. पायाचा खालील भाग व शेपटीचा गोंडा पांढरा झालेला असतो. ही गुरे दुध उत्पादनाकरीता जगभर प्रसिद्ध आहेत. गायीचा दूध देण्याचा कालावधी 300 दिवसांचा असतो. सरासरी उत्पन्न सर्वात जास्त म्हणजे 6000 लिटर असून, सरासरी आयुष्य मात्र 12 वर्षांचे असते.
ब्राऊन स्वीस
स्वित्झर्लंड या युरोपीय देशातील ही गुरे आकारमानाने मोठी असतात. त्यांचा रंग तपकिरी असून या रंगाच्या विविध छटा असतात. काही गुरांचा रंग काळसर असतो. फिक्या रंगांच्या जनावरांमध्ये कातडीवर रुपेरी रंगांची छटा दिसते. काही गायींचा पोटाखालील भाग व कस पांढरी असते. गायींचा दुध देण्याचा कालवधी 300 दिवस सरासरी उत्पन्न 5000 लिटर व सरासरी आयुष्य 12 वर्षे असते.
या आहेत गाईंच्या प्रमुख जाती “जाणून घ्या वैशिष्ट्ये” भाग – दोन
सेहवल गाई हवी आहे