मुंबई : महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात. त्यातच आता स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी योजना राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक उपक्रम राबविला जाणार आहे. ज्यात बचत गटाशी संबंधित जवळपास 3000 महिलांना ड्रोन उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. या उपक्रमांतर्गत महिलांना ड्रोनचे प्रशिक्षण दिले जाणार असून 8 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. या नमो ड्रोन दीदी योजनेचा लाभ हा उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील शेतकरी महिलांना मिळणार आहे.
8 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान
कृषी विभाग किंवा कृषी विज्ञान केंद्राकडून देशातील शेतकरी महिलांना केंद्र सरकारच्या नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन उडवण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच ज्या महिलांना शेती कामासाठी ड्रोन खरेदी करायचा असेल अशा महिलांना या ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून कर्जासह अनुदानही मिळणार आहे. ड्रोन आणि त्यासंबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80 % किंवा जास्तीस्त जास्त 8 लाख रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे. तसेच उर्वरित रक्कमेसाठी AIF योजनेअंतर्गत 3 टक्के व्याजदराने महिलांना कर्जाची सुविधा मिळणार आहे.
ड्रोन किटमध्ये असणाऱ्या सुविधा
इतर कामांसह ड्रोनचा वापर हा शेतीतील कामांमध्ये केला जात आहे. यामुळे नॅनो खते, कीटकनाशके इत्यादी फवारणीसाठी ड्रोनचा वापर हा केला जात असून वेळेची बचतही होत आहे. या योजनेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांतर्गत महिलांना ड्रोन किट मिळणार आहे. या ड्रोन किटमध्ये ड्रोन बॉक्स, चार बॅटरी, चार्जिंग हब आदी गोष्टी देण्यात येणार आहेत.
मासिक 15,000 रुपये मानधन दिले जाणार
या योजनेंतर्गत बचत गटांच्या महिलांना ड्रोन उडवण्याचे आणि पिकांवर कीटकनाशके, खतांची फवारणी करण्याचे पायलट प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच या दरम्यान त्यांना मासिक 15,000 रुपये मानधनही दिले जाईल, तर सह-पायलट महिलेला 10,000 रुपये प्रति महिना दिला जाईल. याशिवाय, सरकार इतर महिलांना ड्रोन दुरुस्त करण्याचे प्रशिक्षण देखील देईल ज्या दरम्यान त्यांना मासिक 5000 रुपये दिले जातील.
योजनेचे आवश्यक निकष
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटकातील महिलांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
ज्या महिलांना लाभ घ्यायचा आहे अशा महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्यत्वाशी जोडलेले असावे
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महिलेकडे शेतीसाठी स्वतःची जमीन असावी.
या सुविधेचा लाभ घेणाऱ्या महिलेचे वय हे 18 ते 37 वर्षे दरम्यान हवे
या योजनेत काम करण्यास इच्छुक महिलांना 15,000 रुपये दिले जातील.
महिलांचा एक क्लस्टर तयार केला जाईल जो 10-15 गावांमध्ये समान असेल.
योजनेचा लाभ घेण्यासाठीची कागदपत्रे
अर्ज करण्यासाठी शेतकरी महिलांना त्यांची महत्त्वाची कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. आधार कार्ड, स्थानिक रहिवासी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, फोन नंबर, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि SHG ओळखपत्र इ.
सरकार योजनेवर इतके रुपये खर्च करणार
नमो ड्रोन दीदी योजनेवर एकूण 1261 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी सरकारने एक विशेष मसुदाही तयार केला असून, त्याअंतर्गत देशातील बचत गटांच्या महिलांना ड्रोनशी संबंधित प्रशिक्षण दिले जाणार आहे.
भारत का सबसे सुंदर गाव । #cleanestvillage #mawlynnong
काय आहे नमो ड्रोन दीदी योजना
केंद्र सरकारने नोव्हेंबर 2023 मध्ये नमो ड्रोन देते योजनेची सुरुवात केली होती. या योजनेच्या माध्यमातून देशातील 15000 पेक्षा जास्त महिला बचत गटाच्या सदस्यांना ड्रोन दिदी बनवण्याचे उद्दिष्ट आहे. ड्रोन उडवणे, डेटा विश्लेषण, ड्रोनची देखभाल, ड्रोनद्वारे पिकांवर लक्ष ठेवणे, कीटकनाशके व खतांची फवारणी करणे, बियाणे पेरणे आधी विविध शेतीकामांसाठी महिलांना नमो दिदी योजनाअंतर्गत प्रशिक्षण दिले जात आहे.
अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा.