• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

9,000 चौरस फुटाच्या नर्सरीतून महिन्याला 2 लाखांची कमाई

कोविड लॉकडाऊनचा फटका बसल्यानंतर टेरेस गार्डनच्या छंदातून बांधकाम ठेकेदाराला गवसला नवा उद्योग

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 12, 2023
in यशोगाथा
0
9,000 चौरस फुटाच्या नर्सरीतून महिन्याला 2 लाखांची कमाई
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

रामविलास सिंग या बांधकाम ठेकेदाराची कृषी उद्योजक बनण्याची ही रंजक कहाणी आहे. मुळात शिक्षक असलेले सिंग पायाभूत सुविधांच्या अमर्याद संधी लक्षात घेऊन काही वर्षांपूर्वी शिक्षकाच्या नोकरीचा राजीनामा देऊन बांधकाम व्यवसायात उतरले होते. त्यांचे बस्तानही बसले होते. मात्र, सिंग यांच्या व्यवसायाला कोविड लॉकडाऊनचा फटका बसला. घरात बसण्याच्या या काळात त्यांनी टेरेस गार्डनच्या छंदाकडे पुन्हा लक्ष वळवले. मुलांच्या आग्रह आणि मार्गदर्शनातून रामविलास यांनी बागकामाबद्दलचे त्यांचे ज्ञान शेअर करण्यासाठी एक युट्यूब चॅनेल तयार केले. पुढे लोकांच्या मागणीमुळे त्यांनी त्यांची ऑरगॅनिक नर्सरी (सेंद्रिय रोपवाटिका) सुरू केली. यातूनच या बांधकाम ठेकेदाराला नवा उद्योग गवसला. आता ते 9,000 चौरस फुटाच्या नर्सरीतून महिन्याला 2 लाखांची कमाई करत आहेत.

बागकामाबद्दलचे व्हिडिओ शेअर करणाऱ्या युट्यूब चॅनेलनंतर सुरू केलेला नर्सरी उद्योग आता दणक्यात सुरू आहे. सिंग यांनी आता संपूर्ण भारतभर खत, कीटकनाशके, रोपे आणि बियाणे पुरवायला सुरुवात केली आहे.

 

13 वर्षे केली शिक्षकाची नोकरी

रामविलास सिंह यांनी 13 वर्षे हरियाणातील कर्नाल येथील शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यात घालवली. आपल्या विद्यार्थ्यांसोबत ज्ञानाची देवाणघेवाण करत असताना, ते वर्षानुवर्षे न बदललेल्या अभ्यासक्रमात अडकलेले दिसले. 2006 मध्ये बांधकाम क्षेत्र सुमारे 14 टक्के वेगाने वाढत होते. अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प सरकारी आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात येत होते. त्या वेगाने वाढणाऱ्या उद्योगाचा भाग होण्यासाठी सिंग यांनी 2006 मध्ये शिक्षकाची नोकरी सोडली.

 

रामविलास सिंग आपल्या ऑरगॅनिक नर्सरीत. या सेंद्रिय रोपवाटिकेत बियाणे, वनस्पती, जैव खते आणि इतर सेंद्रिय निविष्ठांची विक्री केली जाते.

1997 मध्ये टेरेसवर लावली होती 8 रोपे

2006 ते 2020 पर्यंत त्यांनी अनेक खाजगी आणि सरकारी बांधकाम प्रकल्पांचे ठेके घेतले. त्यानंतर कोविड लॉकडाऊन आले आणि चित्र बदलले. त्या काळातच घरातच राहिल्यामुळे रामविलास यांना त्यांच्या टेरेस गार्डनिंगच्या छंदावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळाली. ते सांगतात, “देशात हाडाचे शेतकरी सोडून फक्त काही टक्के लोकांकडेच शेती किंवा बागकामासाठी घरचे जमीन असते. इतर बहुतांश लोकांकडे झाडे वाढवण्यासाठी अंगण, परसबाग आणि अनेकांकडे तर फक्त टेरेस आणि बाल्कनीच असते. मी 1997 मध्ये माझ्या टेरेसवर फक्त आठ रोपे लावून छंदाची सुरुवात केली आणि कालांतराने त्यात सतत वाढ करत राहिलो.”

आता टेरेसवर 4,500 फळ-भाज्या, वृक्ष

लॉकडाऊनमुळे सिंग यांना त्यांच्या रोपांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पूर्ण वेळ मिळाला. लॉकडाऊन सुरू होईपर्यंत टेरेस गार्डनमधील रोपांची संख्या 3,000 पेक्षा जास्त झाली होती. त्यात फुले, फळे, भाज्या, औषधी आणि शोभेच्या वनस्पती (MOP) यांचा समावेश होता. आज ही संख्या सुमारे 4,500 च्या आसपास आहे.

कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सिंग यांनी टेरेस गार्डनचा झपाट्याने विस्तार केला. वनस्पतींसोबत राहणे त्यांच्यासाठी जीवनदायी, उत्साहवर्धकही ठरले. तसेही झाडे, फळे, भाज्या, फुले आपल्याला ऑक्सिजन आणि बरेच काही देतात. ते आजूबाजूचा कार्बन-डाय-ऑक्साईड शोषून घेतात आणि हवा शुद्ध करतात. ते महत्त्वाचे आहे.

 

यूट्यूब व्हिडिओ ते नर्सरी व्यवसायापर्यंत

टेरेसवर रोपे वाढवत असताना, रामविलास यांनी 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान मुलांच्या मार्गदर्शनात, युट्यूब चॅनल देखील सुरू केले. बागकाम, फुलशेती आणि फलोत्पादनाचे ज्ञान ते व्हिडिओद्वारे शेअर करू लागले. त्याचे सबस्क्रायबर झपाट्याने वाढले. आज त्यांच्या चॅनेलचे 13 ते 86 वयोगटातील 5 लाखच्या आसपास सबस्क्रायबर आहेत.

सिंग सांगतात, “जेव्हा मी YouTube वर बागकामाचे वर्ग द्यायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या अनेक दर्शकांनी शेणखत आणि इतर सेंद्रिय निविष्ठा वापरूनही त्यांच्या रोपातून अपेक्षित परिणाम न मिळाल्याची तक्रार केली. आज गायी फक्त हिरवा आणि कोरडा चारा खात आहेत, जो फारसा पौष्टिक नाही. त्यामुळे त्यांच्या दूध आणि शेणातही पोषणाची कमतरता असेल, कदाचित.”

“त्यांनी मला माझ्या रोपांसाठी बनवलेले कंपोस्ट त्यांच्यासोबत शेअर करायला सांगितले. म्हणून 2021 मध्ये, मी माझ्या घराजवळ सुमारे 2700 चौरस फूट जागा घेतली आणि ‘द ग्रेस ऑफ गॉड’ ब्रँड अंतर्गत माझ्या ग्राहकांना पुरवठा करण्यासाठी कंपोस्ट तयार केले.”

 

रामविलास सिंग यांची 9,000 चौरस फुटातील नर्सरी.

झाडे, बिया आणि रोपांना देशभरातून वाढती मागणी

वापरकर्त्यांना चांगले परिणाम मिळू लागले आणि रामविलास यांच्या जैव खते आणि सेंद्रिय कीटकनाशकांची मागणी वाढतच गेली. लोकही झाडे, बिया आणि रोपे मागू लागले. 2021 च्या अखेरीपूर्वी, रामविलास यांनी संपूर्ण भारतातील खरेदीदारांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी वसंत विहार, कर्नाल येथे त्यांची सेंद्रिय रोपवाटिका सुमारे 9,000 चौरस फूटपर्यंत वाढवली होती.

ते सांगतात, “सुव्यवस्थित असल्यास रोपवाटिका उभारण्यासाठी जास्त जागा लागत नाही. आम्ही भारतभरातील ग्राहकांना सेवा पुरवतो आणि वनस्पतींसह उत्पादने 72 तासांच्या आत कुरिअरद्वारे वितरीत करतो.”

रामविलास सिंग हे कलम केलेली रोपे विकत नाही, कारण त्यांना फळे मिळण्याची खात्री नसते. त्यामुळे त्यांच्या नर्सरीतून आधीच फुललेली किंवा फळ देणारी झाडे विकली जातात.

अश्वगंधा, तुळस, दालचिनी, ओरेगॅनोही उपलब्ध

नर्सरीतील वनस्पतींमध्ये आंब्याच्या दोन जातींचा समावेश आहे, त्यात वर्षभर फळ देणारी बारामासी जाती, जॅकफ्रूट, मनुका, पीच, संत्रा, लिची, हिरवी सफरचंद, बेरी यांचा समावेश आहे. तर फुलांमध्ये, बोगनवेल आणि मोगरा ते गुलाब आणि हिवाळ्यातील फुलांच्या बल्बपर्यंत, नर्सरी उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे.

“द ग्रेस ऑफ गॉड” नर्सरीमध्ये अश्वगंधा, अजवाईन, ब्राह्मी, आठ प्रकारची तुळस, दालचिनी, ओरेगॅनो आणि इतर अनेक औषधी वनस्पतीही विकल्या जातात.

 

ॲग्रोवर्ल्डचे 2024 मधील पहिले कृषी प्रदर्शन पिंपळगाव नगरीत.. । Agroworld Expo 2024।

 

कशी बनतात सेंद्रिय जैव खते आणि जैव कीटकनाशक?

रामविलास दरवर्षी तयार करत असलेले सेंद्रिय पानांचे कंपोस्ट हे त्यांच्या रोपवाटिकेच्या व्यवसायाच्या यशाचे मुख्य गमक आहे. शरद ऋतूत झाडांवरून पडणाऱ्या पानांचा वापर करून तर बनवले जाते. खत बनवण्यासाठी हुडा (हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी), ग्रीन बेल्ट आणि इतर ठिकाणांहून सुमारे 125 ट्रॉली पाने गोळा करून आणली जातात.

नर्सरी मालक सांगतात, “आम्ही ही पाने कापतो आणि त्यात केळीची पाने, साले आणि देठ घालतो, कारण केळीमध्ये नैसर्गिक फॉस्फरस, लोह, पोटॅश आणि बोरॉन व्यतिरिक्त इतर सूक्ष्म पोषक घटक असतात. यामध्ये 88 प्रकारचे जीवाणू जोडले जातात, जे बायोडिग्रेडेबल पदार्थाचे विघटन करतात आणि पोषक घटकांचे सहज शोषण्यायोग्य स्वरूपात रूपांतर करतात,l.”

“हे पानांचे कंपोस्ट तयार होण्यासाठी सुमारे 8 ते 10 महिने लागतात आणि जेव्हा मिश्रणातून मिथेन उत्सर्जन पूर्णपणे थांबते तेव्हाच ते वापरता येते. निव्वळ उत्पादन सुमारे 25-30 ट्रॉली म्हणजे 50,000 ते 60,000 किलो इतके होते. ते वनस्पतींसाठी सर्वोत्तम कंपोस्ट असते.”

 

Om Gaytri Nursary
Om Gaytri Nursary

40 रुपये किलो दराने सेंद्रिय खताची विक्री

सेंद्रिय पानांचे कंपोस्ट 40 रुपये प्रतिकिलो दराने विकले जाते आणि वनस्पतींच्या पौष्टिक गरजा 90 टक्के पूर्ण करते. रामविलास त्यांच्या युनिटमध्ये जैव कीटकनाशक देखील तयार करतात. त्यात 98 प्रकारचे जीवाणू, कडुलिंबाचे तेल, गोमूत्र, कुजलेला काटेरी धतुरा अर्क असतो.

हे कीटकनाशक नैसर्गिकरित्या अनेक रोगांवर नियंत्रण ठेवू शकते. त्याचे वार्षिक उत्पादन सुमारे 1,200 लिटर आहे आणि ते 200 रुपये प्रति लीटरने विकले जाते.

 

ग्रेस ऑफ गॉड नर्सरीत फक्त आधीच फुललेल्या किंवा फळ देणाऱ्या रोपांचीच विक्री केली जाते.

नर्सरीत 50 ते 400 रुपयांपर्यंतची रोपे

ग्रेस ऑफ गॉड नर्सरीमध्ये उपलब्ध असलेल्या वनस्पतींसाठी कॅल्शियम पावडर, कडुलिंबाची पेंड, मोहरी, दगड-धोंड्यांचा चुरा, लोखंड चुरा, गांडूळ खत, शेणखत, गोमूत्र अशा विविध प्रकारच्या मिश्रणाचा कुंडीत वापर केला जातो.

रोपवाटिकेत औषधी वनस्पतींची किंमत 50 ते 300 रुपये आहे, तर बहुतेक फुलांची रोपे 150 ते 400 रुपये किंमतीची आहेत. औषधी वनस्पती कापण्याच्या आणि मुळांच्या पद्धतीने तयार केल्या जातात. त्यासाठी इथे रसायने वापरली जात नाही; पण मुळांना कोरफड वेरा जेल लावली जाते. हिवाळ्यातील फुलांसारखी काही झाडे बिया वापरून तयार केली जातात. नैसर्गिक खतांमुळे, फुलझाडे लवकर बहरतात आणि मोठी आणि अधिक फुले देतात.

दरवर्षी विकली जातात 50 हजार रोपे

रामविलास सांगतात, “आम्ही दरवर्षी 60 ते 70 जातींची सुमारे 50,000 रोपे विकतो. खर्च, पगार वजा जाता नर्सरीचे मासिक उत्पन्न सुमारे 1.75 ते र2 लाख रुपये इतके आहे,” .

“आमचा बारामासी आंबा सर्व हंगामात फळ देतो आणि रोपाची किंमत 300 रुपये आहे. तुम्ही ते मोहोराच्या अवस्थेत विकत घेऊ शकता आणि लवकर आंब्याचा आस्वाद घेऊ शकता.”

 

टेरेसवर कुंडीत पिकवलेल्या काही एक्जॉटिक भाज्या.

भाजीपाला सहजपणे कुठेही पिकवता येतो

ग्रेस ऑफ गॉड नर्सरीमध्ये बियाणे वापरून भाजीपाला पिकवला जातो आणि ते बियाणे आणि रोपटे दोन्ही विकले जाते. सुमारे 50 टक्के भाजीपाला अगदी लहान क्षेत्रातही पिकू शकतो. टॉवर फार्मिंग किंवा व्हर्टिकल फार्मिंग, जिथे पोषक द्रव्ये आणि पाणी पाईपद्वारे पुन्हा प्रसारित केले जाते. 5 फुटांच्या बाल्कनीतही रोपे वाढण्यास मदत करू शकतात.

सिंग सांगतात, “आम्ही 10 इंचाचा प्लॅस्टिक पाईप घेतो, त्यात 10-15 छिद्रे करतो आणि त्यात पौष्टिक पदार्थ, पाणी भरतो आणि नंतर भाज्यांच्या बिया टाकतो. हे अव्यवस्थित आणि लहान जागेत वापरणे अतिशय सोयीचे आहे.”

सिंग आणि त्यांचे कुटुंब. पत्नी आणि मुलेही त्यांना व्यवसायात मदत करतात.

 

पत्नी, मुले यांचीही व्यवसायात मदत

सिंग यांची पत्नी आणि दोन महाविद्यालयीन मुलेही या व्यवसायात सक्रिय आहेत. मुलगे ऑनलाइन ऑर्डर्सची प्रक्रिया पाहतात, तर पत्नी व्हॉट्सॲपवर मिळालेल्या ऑर्डर आणि प्रश्नांचे व्यवस्थापन करते.

रोपवाटिकेत सध्या आठ लोकांना काम मिळाले आहे. कामाचा ताण जास्त असताना, विशिष्ट हंगामात कंत्राटी कामगार नियुक्त केले जातात.

सर्व ग्राहक आणि YouTube सबस्क्रायबर, तसेच जवळपास कोणीही रामविलास सिंग यांच्याकडून विनामूल्य सल्ला घेऊ शकतात. ते सांगतात, “मला संपूर्ण भारतातून आणि परदेशातूनही बागकामाच्या प्रश्नांवर कॉल येतात. मी मार्गदर्शन देण्यासाठी किंवा ज्ञान सामायिक करण्यासाठी काहीही शुल्क घेत नाही.”

 

Ajit seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • दक्षिण भारतातील समुद्रात केली जाणारी लाल शेवाळाची सागरी शेती
  • 33 वर्षांच्या तरुणाने 3 वर्षे शेती करून बनवली 1,200 कोटींची कंपनी, जाणून घ्या या “ॲग्री स्टार्टअप”ची कहाणी

 

Share this:

  • Facebook
  • X
Tags: कृषी उद्योजकटेरेस गार्डनिंगनर्सरीरामविलास सिंग
Previous Post

कृषी सल्ला : खोडवा ऊस – पाचट व्यवस्थापन

Next Post

शेतकऱ्यांनो सेंद्रिय शेती करा ; यासाठी सरकार देतंय अनुदान

Next Post
सेंद्रिय शेती

शेतकऱ्यांनो सेंद्रिय शेती करा ; यासाठी सरकार देतंय अनुदान

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.