• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हिवाळ्यात शेळ्या-मेंढ्यात होणारे आजार व घ्यावयाची काळजी

Team Agroworld by Team Agroworld
October 13, 2020
in तांत्रिक
0
हिवाळ्यात शेळ्या-मेंढ्यात होणारे आजार व घ्यावयाची काळजी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेळी -मेंढीपालन व्यवसायामध्ये जसे संगोपन व व्यवस्थापन याला महत्व आहे. तसेच शेळ्यांचे आरोग्य सुध्दा तितकेच महत्वाचे आहे. जेथे शेळी-मेंढीपालन हा एक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात केले जातो, तेथे कळपातील जनावरांना वेगवेगळ्या ऋतूत साथीच्या व इतर रोगांची लागण होऊन शेळ्या-मेंढ्यांच्या मृत्यूमुळे फार मोठे आर्थिक नुकसान होवू शकते. शेळी-मेंढीपालन व्यवसायिकांना शेळ्या-मेंढ्यांना होणारे रोग, त्याची लक्षणे तसेच उपचार व प्रतिबंधात्मक उपाय माहित असल्यास मरतुकीवर नियंत्रण ठेवता येईल व मिळणा-या उत्पन्नात चांगली वाढ होईल. हिवाळ्यामध्ये शेळ्या-मेंढ्यांना प्रामुख्याने आंत्र विषरक्तता (ET), संसर्गजन्य,न्युमोनिया , मवा   (Contageous ECthyma) फुट रॉट , सांसर्गिक गर्भपात , बाह्यकृमी , करडांची हगवण , इनफेकशस केऱ्याटायटीस (पिंक आय) असे विविध प्रकारचे आजार होतात. आता आपण प्रत्येक आजाराची लक्षणे व त्याची घ्यावयाची काळजी समजून घेऊया.

अांत्र विषरक्तता

या रोगास एन्ट्रोटॉक्सीमिया व काही ठिकाणी भूल देखील म्हणतात. हा आजार विषाणूमुळे (Clastradium pusfringens type C’ and ‘D’) होतो. अचानक खाण्यात होणा-या बदलामुळे किंवा तणावामुळे हा रोग उद्भवतो.

लक्षणे

शेळीचे पोट दुखते यामुळे शेळी वारंवार उट-बस करते. कृचितप्रसंगी धनुष्याकृती होतो व कधी कधी हगवण देखील सुरू होते. या आजाराची रोगबाधा ही प्रमुख तीन ठळक स्वरूपात आळलून येते.

  1. अतितीव्र स्वरूप : सामान्यत: करडात आढळून येते. रोगाचा कालावधी हा २४ तासापेक्षा देखील कमी असतो आणि पुष्कळदा लक्षात देखील येत नाही व ते दगावते.
  2. तीव्र स्वरूप : सामान्यत: लक्षणे ही सारख्याच स्वरूपाची आढळतात, परंतू तिव्रता कमी असते. रोगाचा कालावधी हा ३ ते ४ दिवसांचा असतो. उपचाराअभावी काही जनावरे मरण पावतात. रोगबाधा साधारणत: प्रौढ जनावरांत आढळून येते. रोगबाधेचा लसीकरण झालेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या कळपातदेखील आढळून येतो.
  3. दिर्घकालीन बाधा : वारंवार कळपातील शेळ्या-मेंढ्या आजारी पडताना आढळतात. साधारणत: प्रौढ शेळ्या बळी पडतात. आजारी शेळ्या मलून मरणासन्न दिसतात. हगवण वारंवार होत असल्याने शेळ्या-मेंढ्यांच्या वजनात घट होते. हा आजार टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे रोगप्रतिबंधक उपाय व काळजी घेतली पाहिजे.

करडू ४ ते ६ आठवड्याचे झाल्यावर लसीची पहिली मात्रा टोचून घ्यावी. बुस्टर लस १५ दिवसांनी लावावी व त्यानंतर ६ महिन्यांनी लसीकरण आवश्य करून घ्यावे. कळपात रोगबाधेची नोंद झाली असल्यास लसीकरण दर ४ महिन्यांनी करून घ्यावे.

फार्मवर नवीन शेळ्या आढळल्यास त्यांना विनाविलंब लसीकरण करुन घ्यावे. त्यानंतरच शेळ्या कळपात सोडाव्यात. शक्यतो लसीकरण कार्यक्रम असा आयाजित करावा की शेळ्या-मेंढ्या विण्यापूर्वी २ ते ३ आठवडे लस टोचणीची वेळ राहील, जेणेकरून नवजात पिल्ल्यांना आईकडून रोगप्रतिकारशक्ती प्राप्त होईल.

शेळ्या-मेंढ्यात होणारा दुसरा महत्वाचा आजार म्हणजे

मवा (Contageous Ecthyma) होय. हा एक विषाणूमुळे होणारा सांसर्गिक रोग आहे. रोगाचा प्रसार शेळ्या-मेंढ्यांच्या कळपात अतिशय झपाट्याने होत असतो. रोगप्रसारात पिडीत जनावरांचा संपर्क अथवा प्रक्षेत्रावरील अवजारे मदत करतात. या रोगाची विशिष्ट लक्षणे म्हणजे शेळ्या-मेंढ्यांच्या त्वचेवर पिटिका आणि पुटिका आढळतात. कृचितप्रसंगी नाकपुड्या व डोळ्यात देखील दिसतात. त्यानंतर याचे रुपांतर पुटिकांत होते व त्यावर जाड खपली धरली जाते. आजारी कोकरांना दूध ओढता येत नाही व चारा देखील खाता येत नाही. खाता न आल्याने अशी कोकरे व शेळ्या-मेंढ्या झपाट्याने कमजोर होतात व वजनात घट होते.

हा आजार झाल्यास लागण झालल्या शेळ्या-मेंढ्या (ICCO) कळपातून वेगळ्या कराव्यात व इतर आजारी जनावरांचा उपचार सुरू करावा, जेणेकरून कळपातील इतर निरोगी शेळ्या-मेंढ्यांना या रोगाची लागण होणार नाही.

संसर्गजन्य न्यूमोनिया

रोगाचा प्रादुर्भाव कोणत्याही ऋतूत आढळत असला तरी हवामान थंड झाल्यावर रोगाचे प्रमाण वाढलेले आढळतात .

लक्षणे

रोगपिडीत शेळी मलून दिसते. शारीरिक तापमान वाढलेले असते. श्वास घेण्यास त्रास होतो आणि शारीरिक वजन घटल्यास नाकाव्दारे सतत विसर्ग वाहतो. जनावर वरचेवर खोकते आणि झपाट्याने कमजोर होत जाते.

हा आजार शेळ्या-मेंढ्यांना झाल्यास आजारी जनावरांना कळपातून वेगळे करावे व तज्ज्ञपशुवैद्यकाकडून औषधोपचार करून घ्यावा.

सांसर्गिक गर्भपात

शेळ्या-मेंढ्यांमध्ये हा आजार प्रामुख्याने conflyloductor , leptoprosis disteria मुळे होतो .सांसर्गिक गर्भपात  कमी करण्याकरीता शेळ्या-मेंढ्यांच्या कळपासाठी पुरेशी जागा असायला हवी. कळपाचे विभाजन करून ठेवल्यास हिवाळ्यामध्ये हे आजार कमी प्रमाणात पसरतात. शक्यतो दुषित खाद्य, पाणी आणि चारा शेळ्या-मेंढ्यांना देणे टाळावे.

इन्फेक्शस केरेंटायटीस (पिंक आय)

यालाच डोळे येणे असेही म्हणतात. जिवाणूमुळे (Momela bewa) हा आजार होतो. रोगाचा पूर्वकाळ सामान्यतः २ ते ३ दिवसांचा असतो.डोळे जनावरे डोळे बंद ठेवतात. शारीरिक तापमानात सौम्य प्रमाणात वाढ होते. एक ते दोन दिवसात डोळ्याच्या मध्यभागी पांढरा पडदा दिसू लागतो. काहीवेळा डोळा फुटून जातो व अंधत्व येते. परंतू २ ते ३ आठवड्यात दृष्टी पूर्ववत होते.

आजार कमी करण्यासाठी लागण झालेल्या शेळ्या-मेंढ्यांना तात्काळ

वेगळे करावे व पुशुवैद्यकांच्या साहाय्याने उपचार सुरू करावेत.

करड्यांची हगवण

प्रक्षेत्रावरील करडात आढळून येणारा हा सामान्य आजार असून त्याची प्रमुख लक्षणे म्हणजे अतिसार आणि जंतूरक्तता ही होत. करडांचे मृत्यु होत असल्याने रोगाचे आर्थिक महत्व खूप आहे. अणूजवांचे उगमस्थान म्हणजे पिडीत जनावरांची विष्ठा तसेच करडांना अणूजवांचा संसर्ग हा गादी म्हणून टाकलेले गवत दुषित होऊन होतो.

दुधाची भांडी अस्वच्छ असणे, कळपातील रोगपिडीत करडे, शेळ्यांची कास व बाह्य भाग चाटल्याने हा या आजाराच्या लक्षणात प्रामुख्याने पहिल्या ४ दिवसात सामान्यतः जंतूरक्तता अतिसार आढळून येत असतो. बाधा तीव्र स्वरूपाची असते व अतिसार २४ ते ९६ तास टिकतो. पिडीत करडू मलूल व अशक्त भासते. सुरुवातीस शारीरिक तापमान वाढलेले असले तरी करडू मरणासन्न झाल्यावर शारीरिक तापमान असाधारण होते. काही करडांत अतिसार किंवा रक्तमिश्रित हगवण दिसते.

रोगमुक्त करडात जंतूचे स्थानिकरण सांध्यात होते आणि यामुळे गुडघे सुजतात. करडांना चालता येत नाही व त्यातच त्यांचा मृत्यू ओढवतो. रोगप्रतिबंधक उपाय रोगबाधेची कारणे शोधत न बसता कळपात हगवण आढळल्याबरोबर पिडीत करडू तात्काळ वेगळे काढावे व तज्ज्ञ पशुवैद्यकाकडून उपचार सुरू करावेत. शक्य असल्यास संपर्कात असलेली पिले कळपातून वेगळी करून स्वच्छ ठिकाणी स्थानांतरीत केल्यास हगवणीचा त्रास असणा-या कळपाचे बेड निर्जतुक करता येतील. बंदिस्त पध्दतीने ठेवलेल्या करडात रोगबाधेचा पिल्ले थंड पडणार नाहीत याकडे लक्ष पुरवावे.

पिल्ले जन्मताच ६ तासांच्या आत त्यांना आईचा चीक पिण्यास मिळणे आवश्यक आहे. पिल्लांचे सारख्या वयाचे गट पाडावेत. गादी म्हणून पसरविलेले गवत स्वच्छ आणि कोरडे असावे. दुध काढण्याची भांडी, दुध पाजण्याची भांडी दरवेळेस स्वच्छ व निर्जतुक असावीत. नवजात पिल्लांना गवत चघळू द्यावे आणि २ आठवड्यानंतर धान्यपदार्थ द्यावेत.

स्त्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अांत्र विषरक्तताइन्फेक्शस केरेंटायटीसऍग्रीऍग्रोकृषीमवाशेळ्या-मेंढ्यासांसर्गिक गर्भपात
Previous Post

परतीचा मान्सून १७ ऑक्टोबर पर्यंत राज्यात रेंगाळणार

Next Post

मोबाइलचे रेडिएशन कमी करणार गायीच्या शेणापासून निर्मित गौसत्व कवच चिप

Next Post
मोबाइलचे रेडिएशन कमी करणार गायीच्या शेणापासून निर्मित गौसत्व कवच चिप

मोबाइलचे रेडिएशन कमी करणार गायीच्या शेणापासून निर्मित गौसत्व कवच चिप

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.