• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हा आहे दीर्घायुषी लोकांचा देश… या देशातील लोक कोणता आहार, विहार घेतात, ज्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभते….!!

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 3, 2022
in वंडरवर्ल्ड
0
हा आहे दीर्घायुषी लोकांचा देश… या देशातील लोक कोणता आहार, विहार घेतात, ज्यामुळे त्यांना दीर्घायुष्य लाभते….!!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

दीर्घायुष्य लाभणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.. आजकालच्या धकाधकीच्या, मानसिक ताणतणावाच्या स्पर्धात्मक युगात तर एखाद्या व्यक्तीने 80 वय गाठले तरी त्याचे कौतूक होते.. पण एखाद दुसरी व्यक्ती नाही तर सुमारे 18 लाख लोकसंख्या असलेल्या देशातल्या तब्बल 23 लाख नागरिकांनी नव्वदी पार केली आहे. 71 हजारांहून अधिक नागरिकांचं वय 100 पेक्षा अधिक असेल तर…! या देशातील पुरुषांचे सरासरी वय 80 वर्षे तर महिलांचे सरासरी वय 86 वर्षे आहे… अर्थात या दीर्घायुष्याला या देशातील नागरिकांचा काटेकोर आहार – विहार (Healthy Lifestyle) कारणीभूत आहे…

🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे, आमचा सुमारे 70% उपक्रम रिमोट किंवा मशीन इत्यादींनी घेतला आहे. आणि मोबाईल फोनने तर 80% पेक्षा जास्त खुले चालणे, खेळणे आणि मॉर्निंग वॉक इ. कमी झालेले आहे. या कारणास्तव, आजच्या काळात जगभरातील लोक मधुमेह, कर्करोग, हृदयविकाराचा झटका आदी विकारांनी त्रस्त आहेत. पण तंत्रज्ञानातही जगात आघाडीवर असलेला हा देश दीर्घायुषी तसेच निरोगी लोकांमध्येही आघाडीवर आहे. या देशात रोबोटच्या माध्यमातून प्रमुख कामे केली जातात. असे असूनही सर्वात निरोगी आणि तंदुरुस्त लोक या देशामध्ये राहतात. येथील लोकांमध्ये लठ्ठपणाही नगण्य आहे. या देशातील लोकांच्या दीर्घायुष्याच्या टीप्सही याच लेखात पुढे दिल्या आहेत.. जर आपणही या देशाचे नियम आणि त्यांचे खाण्यापिण्याचे पालन केले तर आपणही त्यांच्यासारखे निरोगी व दीर्घायुष्य जगू शकतो…

हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..

 

दीर्घायुषी लोकांचा देश आहे.. जपान..!

जपानी नागरिकांच्या दैनंदिन आहारात (Daily Diet) सी फूड, सोयाबीन, आंबवलेले पदार्थ आणि चहाचा प्रामुख्याने समावेश असतो. जपानी नागरिक साखर, बटाटा, दुग्धजन्य पदार्थ आणि फळांच्या सेवनावर फारसा भर देत नाहीत. जपानी आहार जगात सर्वोत्तम मानला जातो. जपानी नागरिकांची त्वचादेखील अत्यंत चांगली व तुकतुकीत असते. जपानमधल्या बहुतांश हॉटेल्समध्ये प्रमुख डिश म्हणून चपाती किंवा ब्रेडऐवजी भाताला (Rice) प्राधान्य दिलं जातं.

 

 

सोयाबीनचा मुबलक वापर..

सोयाबीनमध्ये (Soybean) कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि चांगले फॅट्स मुबलक असतात. त्यामुळे सोयाबीन पचनाला हलका असतो. जपानमध्ये सोयाबीनचा वापर सोया मिल्क, मिसो, टोफू आणि नाटो (आंबवलेलं सोयाबीन) तयार करण्यासाठी होतो. सोया प्रोटीन स्नायूंना बळकटी देतं. त्यामुळे हॉर्मोन्सचं संतुलन चांगलं राहतं. तसंच वजनदेखील वाढत नाही.

 

 

समुद्री शैवाळ व सीफूड खाणे आवडते..

शाकाहारी असो की मांसाहारी जपानमधील लोकांना समुद्रात आढळणाऱ्या बहुतेक गोष्टी खाण्याची आवड आहे. मग ते समुद्री जीव असो की समुद्री भाज्या, समुद्री शैवाळ.. जापनीज लोकांचे ते आवडते व पौष्टिक खाद्य आहे. समुद्री भाज्या जमिनीवर वाढणाऱ्या भाज्यांपेक्षा 10 पट अधिक शक्तिशाली असतात. आणि त्याचबरोबर चिकनपेक्षा माशांच्या मांसामध्ये कित्येक पटीने अधिक पोषक घटक आढळतात.

 

 

दरवर्षी जगातील 10% मासे फक्त जपान वापरतो..

जपानचे लोक दरवर्षी एक लाख टन सीव्हीड वापरतात. फक्त एक कप सीव्हीडमध्ये 5 ते 10 प्रकारची प्रथिने असतात. यासह, ते आयोडीन आणि पोटॅशियमने समृध्द आहेत. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, ओमेगा 3 सारख्या पोषक आणि लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम व झिंकची मात्राही त्यात भरपूर असते. यासोबतच असे म्हटले जाते की जे लोक समुद्री वस्तूंचे सेवन करतात ते नेहमी तरुण राहतात आणि त्यांची त्वचा गुळगुळीत राहते. केस काळे आणि जाड राहतात.

 

आवडते पेय चहा.. पण साखर, दुधाशिवाय..

चहा जपानमध्ये सर्वांचे आवडते पेय आहे. हे लोक सकाळी किंवा संध्याकाळी आणि प्रत्येक विविध सणांना वेगवेगळ्या प्रकारचे चहा करून पितात. जपानमध्ये 100 पेक्षा जास्त प्रकारच्या चहाचे उत्पादन केले जाते. जपानमधील चहा आपल्या चहापेक्षा कित्येक पटीने चांगला आणि आरोग्यदायी आहे. कारण, हे लोक चहामध्ये साखर आणि दुधासारख्या गोष्टी वापरत नाहीत आणि चहाचा वापर इथे अनेक वेगवेगळ्या आजारांमध्येही केला जातो. जपानी नागरिक पारंपारिक माचा चहाला अधिक प्राधान्य देतात. हा चहा पोषक घटकांनीयुक्त असतो. या चहामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. या चहामुळे त्यांचे शरीर सतत सक्रिय राहते, ज्यामुळे ते थकल्यासारखे परिस्थितीतही काम करत राहतात. येथे बनवलेले विविध प्रकारचे चहा हाड, केस, त्वचा यासारख्या गोष्टींचे दीर्घायुष्यासाठी संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देतात.

 

 

जेवणात भाज्यांचा जास्त वापर..

जपानी नागरिक साखर किंवा गोड पदार्थांपासून दूर राहणं पसंत करतात. जपानमध्ये अनेक डेझर्ट (Dessert) लोकप्रिय आहेत. परंतु तरीही तिथले नागरिक तिखट पदार्थ खाण्यास पसंती देतात. शिवाय, ते अर्धवट शिजवलेलं अन्न सेवन करतात. तसेच, अन्न शिजवताना अत्यंत कमी तेल वापरतात. भाज्यांचा जास्ती जास्त वापर केला जातो. या कारणास्तव येथील लोकांना पोटाशी संबंधित आजार खूप कमी आहेत.

 

नाष्ट्यावर भर..

जपानी नागरिकांचा नाष्ट्यावर अधिक भर असतो. त्यांच्या नाष्ट्यात शिजवलेला भात, डाळी किंवा माशांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या डाएटमुळे त्यांची भूक शमते आणि अनावश्यक पदार्थ खाण्याची गरज भासत नाही. पोट 80 टक्के भरेल इतकंच अन्न खावं, असा जपानी नागरिकांचा नियम आहे. या नियमाचं ते काटेकोर पालन करतात. जेवणाच्या वेळी जिभेच्या चवीपेक्षा पोटाकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. जेवणादरम्यान मित्र किंवा कुटुंबातल्या सदस्यांशी संवाद साधतात. यामुळे नातं अधिक घट्ट होतं असं ते मानतात. अन्नाचे घास बारीक चावून खाल्ल्यानं ते सहज पचतं.

 

 

चालणे… उपयुक्त व्यायाम..

जपानमध्ये लोक त्यांचे बहुतेक काम करण्यासाठी चालणे उपयुक्त व्यायाम म्हणून पसंत करतात आणि हा त्यांच्या जीवनशैलीचा एक अतिशय खास आणि महत्वाचा भाग आहे. जरी तांत्रिक विकासामुळे जपानमध्ये आजच्या काळात कशाचीही कमतरता नाही. तरीही इथले लोक त्यांच्या वैयक्तिक वाहनांनी प्रवास करण्यापेक्षा सार्वजनिक ठिकाणच्या वाहतुकीचा जास्त वापर करतात. यामुळे आळस दूर करून ते स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवतात. बस किंवा रेल्वेसाठी एक घरापासून बराच वेळ चालावे लागते आणि अनेक वेळा ट्रेनमध्ये उभे राहून प्रवास करावा लागतो. ज्यामुळे अन्नाचे पचनही जलद होते आणि शरीराचे वजनही खूप कमी वाढते.

 

 

जमिनीवर बसून भोजन करतात..

जपानी लोक जमिनीवर वज्रासनाच्या मुद्रेत बसूनच जेवण करतात.. जपानमध्ये कितीही मोठ्या तारांकित हॉटेलमध्ये गेलात तरी तिथे डायनिंग टेबलासह पारंपरिक पद्धतीने जमिनीवर बसून जेवणाचीही सोय असते. मोठमोठे गर्भश्रीमंत व्यक्तीही अशा हॉटेलांमध्येही जमिनीवर बसूनच जेवतात. उलट त्यांना त्यांच्या या संस्कृतीचा अभिमान वाटतो. जेव्हा आपण खाली बसून जेवता तेव्हा आपली पचनक्रिया योग्य प्रकारे चालते. जमिनीवर बसून जेवतो तेव्हा आपल्याला अन्नाचा घास घेताना वाकायला लागते. आपण घास घेताना वाकतो आणि परत सरळ होतो अशी क्रिया आपण जेवण संपेपर्यंत करत असतो. असे केल्याने आपल्या पोटातील मांसपेशी निरंतर कार्य करत असतात. परिणामी, पचनक्रिया योग्य प्रकारे चालते आणि आपले भोजन चांगल्या रीतीने पचते.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Healthy Lifestyleअँटीऑक्सिडंट्सआंबवलेले पदार्थआवडते पेयचहाचालणेजपानडेझर्टदीर्घायुषीदीर्घायुषी लोकांचा देशदैनंदिन आहारनाष्ट्यावर भर..मांसाहारीशाकाहारीसी फूडसीव्हीडसोयाबीन
Previous Post

सेंद्रीय शेतीवर 50 हजारांची मदत शिवाय ‘या’ दोन योजनांचाही मिळणार लाभ..; सेंद्रिय निर्यातीतही 6 पट वाढ

Next Post

होय… अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेत… 🥭 

Next Post
होय… अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेत… 🥭 

होय... अ‍ॅग्रोवर्ल्डची टीम आपल्यासाठी थेट कोकणातील हापूस बागेत... 🥭 

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.