ऑलंपिकमध्ये प्रथमच उपांत्य फेरीत पोहचलेल्या भारतीय संघाला इंग्लंडच्या संघाकडून पराभूत व्हावे लागले आणि सामना हरूनही देशवासीयांची मने जिंकणारा भारतीय महिला संघ चर्चेत आला. ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या ते हुशार विद्यार्थी नापास होता असतांना, ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हती त्याच महिला संघाने उपांत्य फेरीत धडक मारत भारतीय जनतेला हॉकीतील सुवर्णकाळाची आठवण करून दिली. भारतीय महिलांची कामगिरी स्वप्नवत अशी होती. त्यांचा हा सर्व प्रवास सांघिक असला तरी या सर्व मोत्यांना जोडणारा प्रमुख धागा असणारा अमूल्य असा मोती म्हणजे संघाची कर्णधार राणी रामपाल
जर्मनीत झालेल्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने ऐतिहासिक कांस्यपदक पटकावण्याची करामत केली. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता तो राणी रामपाल, नवनीत कौर, मनजीत कौर, नवज्योत आणि मोनिका या हरयाणातील शाहबाद हॉकी अकादमीच्या पाच खेळाडूंनी! शाहबाद या छोटय़ाशा गावाने आजवर जवळपास ५० च्या वर आंतरराष्ट्रीय हॉकीपटू देशाला दिले आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटविणाऱ्या या छोटय़ाशा खेडय़ातील खेळाडूंच्या संघर्षांची आणि जिद्दीची ही कहाणी त्याच खेळाडू पेईकी एक राणी रामपाल ..
शाहबाद मारकंडा हे कुरुक्षेत्र जिल्ह्यातील एक छोटंसं गाव. मुख्य गावापासून दोन ते तीन कि. मी. अंतरावर असलेली शाहबाद हॉकी अकादमी. त्याच अकादमी जवळ आहे भारतीय महिला हॉकी कर्णधाराचे घर. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आपल्या खेळाची छाप पाडणाऱ्या आणि १८ व्या वर्षीच भारतीय हॉकीची राणी’ बनलेल्या राणी रामपाल हिचा संघर्षही थक्क करणारा आहे. हिरा कोळशाच्या खाणीतच सापडतो, हे राणीच्या घराकडे पाहिल्यावर समजते. घरात प्रवेश केल्यावर समोर येणारे घोडे, डोक्यावर सरपणाची लाकडे घेऊन येणारी तिची आई, गाईच्या शेणाने सारवलेले घर.. वडील पाचवी शिकलेले. व्यवसायाने टांगाचालक. दिवस-रात्र मुलांच्या भवितव्यासाठी कष्ट करण्यात गुंतल्याने त्यांना मुलांकडे जराही लक्ष देता आले नाही. पण राणीचा हॉकीप्रवास कथन करताना रामपाल यांच्या डोळ्यांत आपसूक अश्रू तरळतात.
त्यांचे कुटुंब गरीब. घरी अठरा विश्व दारिद्र्य. घरात वीज नाही, पावसाळ्यात घराचा तलाव होत असेले. त्यामुळे अश्या दरिद्री आर्थिक स्थितीत हॉकीविषयी कोणतेच ज्ञान नव्हते. राणी रामपाल सतत अकादमीत सुरु असलेल्या हॉकीच्या सामन्याचे निरीक्षण करत असे, दिवसातील बरेच तास ती तेथील खेळाडूना सराव करतांना पाहण्यात घालवत असे. चौथीत असताना राणी आपल्या मैत्रिणींसोबत शाहबाद हॉकी अकादमीत पोहोचली आणि तिने मला हॉकी खेळायचे आहे,’ असा हट्टच धरला. येथील प्रशिक्षक म्हणजे द्रोणाचार्य पुरस्कारविजेते बलदेव सिंग. सैन्यातील जवानांपेक्षाही कडक शिस्तीचा माणूस. राणीची कुपोषित शरीरवृष्टी पाहून त्यांनी तिला नकार दिला. परंतु ती हट्टच धरून बसली,
राणी रामपाल तिच्या आई वडिलांसोबत व त्यांचे घर
राणीच्या समाजात कोणत्याही मुलीने आजवर घराची चौकट ओलांडली नव्हती. पण राणीच्या जिद्दी स्वभावासमोर तिचे कुटुंब नरमले आणि तिचा प्रवास सुरु झाला. समाजाने त्यांना वाळीत टाकले. कुणीही त्यांच्याशी बोलत नव्हते. टीका-टोमण्यांच्या वर्षांव होत होता. जगणे असह्य झाले होते. असंख्य वेदना राणी रामपाल च्या परिवाराने पचवल्या. पण राणीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावल्यानंतर तोच समाज आता तिचे गुणगान गातो आहे. आदरार्थी वागणूक देतो आहे. इतकेच नव्हे तर आपल्या मुलींना हॉकी खेळण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.
तब्बल ३६ वर्षांनतर भारतीय महिलांनी ऑलम्पिकची पत्रात मिळविली आणि उपांत्य फेरी गाठली. दिवसाकाठी ८० रु कमाविणारे वडील मुलीला स्टिकदेखील घेऊन देऊ शकत नव्हते. एक दिवस तिला तुटलेली स्टिक मिळाली आणि सलवार कमीज वर तिचा सराव सुरु झाला. सकाळी पाहते सराव सुरुवात व्हायचा, सकाळी वेळ पाहण्यासाठी तिच्या घरी घड्याळही नव्हते त्यामुळे आकाशातील चांदणी वरून अंदाज घेत तिचा सरावाचा वेळ निश्चित होत असे. अकादमीत येतांना प्रत्येकाला अर्धा लिटर दुध आणणे बंधनकारक होते. आधीच कुपोषित असल्याने प्रवेश नाकारणाऱ्या प्रशिक्षकांचे फिटनेसवर विशेष लक्ष होते. त्यामुळे घरी २०० ML दुध घेणे शक्य नसलेल्या राणी रामपालने दुधात पाणी टाकून अकादमीचे नियम अबाधित ठेवले. कालांतराने प्रशिक्षकांनी तिच्यातील गुणवत्ता ओळखत तिचा सर्व खर्च केला. तेव्हा राणी रामपालला नवीन स्टिक व खुराक मिळाला आणि देशाला सुवर्णपदकाची स्वप्ने दाखविणारा तारा..