सर्व सामान्य शेतकरी व माहितगार व्यक्तींना यातील खालचे दोन बॅक्टेरिया (PSB व KSB) परिचीत आहेत.
1) Cellulose degrading Bacteria 2) Xylan degrading Bacteria 3) Phosphorus solubilizing Bacteria (PSB) 4) Potash solubilizing Bacteria (KSB)
तर आता माहिती घेऊ या यातील सर्वात पहिल्या घटकाची म्हणजे
Cellulose degrading Bacteria .
याच्या नावातच याची ओळख आहे. Cellulose (सेल्युलोज) म्हणजे कुठल्याही सेंद्रीय पदार्थातील मुख्य घटक. याला degrade करणारे म्हणजेच सडवणारे किंवा कुजवणारे सूक्ष्म जीवाणू म्हणजेच काष्टापासुन किंवा टाकाऊ पदार्थापासून कार्बन विलग करणारा जिवाणू. हा जिवाणू औद्योगिक वापरात खुपच मोठ्या प्रमाणात सडवण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
याच जिवाणूवरूनच या प्रोडक्टचे नाव ठरविण्यात आलें आहे. तेंव्हा साहजीकच याच जिवाणूंची तीव्रता (काऊंट) या कल्चरमध्ये सर्वात जास्त आहे. त्यामुळे याचा वापर कीड नियंत्रणासाठी ही करता येतो. वेस्ट डिकंपोजर मधील याच जिवाणूंच्या फवारणीने किडींची मेणयुक्त (wax) त्वचा रखरखीत करून त्यांचा उत्कृष्ट परीणाम सोबतच्या साधारण विषाने (औषधी) मिळवणे सहज शक्य आहे, परंतु पिकास जमीनीतूनही बरेच काही हवे असते. ज्याचा पुरवठा जमीनीतील सेंद्रीय कर्बाच्या विघटनातून होत असतो. यासाठी जमीनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण (आच्छादन किंवा टाकावू पदार्थ) जमिनीत वाढवण्यासाठी प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे आहे. अश्या वेगवान विघटकाचा वापर करताना जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी विशेष श्रम घेणेही तितकेच आवश्यक आहे.
क्रमश:
सौजन्य :- समाजमाध्यम