मुंबई : राज्यात सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने पहिल्या टप्प्यात राज्यातील चार कृषी विद्यापीठांना या संदर्भातील अभ्यास करून अहवाल सादर करण्याची सूचना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे.
नैसर्गिक शेती वाढणार
शेतीमध्ये सध्या अनेक प्रकारचे बदल होत चालले आहेत. पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारचे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. पिकांच्या पोषक वाढीसाठी एकीकडे रासायनिक खतांच्या वापरात वाढ होत असली तरी दुसरीकडे या खतांमुळे शरीराला होणारे नुकसान लक्षात घेता, सेंद्रिय पीक उत्पादन घेण्याकडे देखील शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. अनेक शेतकरी पीक पद्धतीमध्ये बदल करू लागले आहेत. सेंद्रिय शेतीचे आता महत्व वाढू लागल्याने केंद्र सरकारने नैसर्गिक शेतीची वाढ होण्याच्या दृष्टीने यापूर्वीच पावले उचलली आहेत. केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा यामध्ये महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. सेंद्रिय शेतीचे क्षेत्र वाढवण्यासाठी राज्यातील चार कृषी विद्यापीठांना या संदर्भातील अचुक अहवाल सादर करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आहेत.
कृषीतज्ज्ञ साधणार संवाद
राज्यातील चार कृषी विद्यापीठातील कृषी तज्ञ लवकरच गावागावातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या संवादाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या संकल्पना आणि शेतकऱ्यांची त्या बाबतीतली भूमिका जाणून घेतली जाणार आहे. सेंद्रिय शेतीचे उत्तम उदाहरण कृषी विद्यापीठाच्या मदतीने शेतकऱ्यांना समजणे गरजेचे आहे, त्यासाठी ही संकल्पना केलेली आहे. प्रति कृषी विद्यापीठास यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी सुद्धा दिलेला आहे. सेंद्रिय शेतीबाबत राज्य सरकार तयारीत आहे जसे की शास्त्रीय अभ्यास आणि योग्य नियोजन असणे गरजेचे आहे. विद्यापीठालातील कृषी तज्ञांमुळे आता सेंद्रिय शेतीला गती येणार आहे. सेंद्रिय शेती संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाला शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
बेक्टीरिया व मित्र बुर्शी आधारित बायो फर्टिलाइज़र व बायो पेस्टिसाइड cib व fco नोंदनी कृत- शेतकरी बंधुना सर्व माहिती उपलब्ध आहे