नासाने केलेल्या दाव्यानुसार येत्या 21 मार्च रोजी सर्वात मोठा उल्कापिंड पृथ्वीजवळून जाणार आहे. या उल्कापिंडाचे नाव एफओ- 32 आहे. त्याचा शोध 20 वर्षांपूर्वी लावण्यात आला होता. नासाने केलेल्या दाव्यानुसार एफओ- 32 आता खूप वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत आहे. उल्कापिंडाची लांबी तीन हजार फूट आहे. हा उल्कापिंड पाहण्यासाठी खगोलशास्त्रज्ञ खूप उत्सुक आहेत.
वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार उल्कापिंडने पृथ्वीचे कोणतेही नुकसान होणार नाही. नासा संशोधन केंद्राचे प्रमुख पॉल चौडास यांनी सांगितले की, उल्कापिंड पृथ्वीपासून 1.25 दशलक्ष मैल अंतरावर असेल. याचा वेग ताशी 77 हजार मैली असा असेल. अंतराळ शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे लघुग्रह अद्यापपर्यंतच्या सर्व लघुग्रहांपैकी सर्वात मोठा असेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार 21 मार्च रोजी हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळ असेल तरीही यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही. उल्कापिंड आकाशात दक्षिण दिशेला दिसून येणार आहे. लकाकणारे उल्कापिंड कोणीही पाहू शकेल.
नासाच्या मते, 2001 एफओ 32 लघुग्रहांची उच्च गती 77,000 मैल प्रति तास आहे. जी पृथ्वीजवळील लघुग्रहांपेक्षा खूपच जास्त आहे. लान्स बॅनर, नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेतील मुख्य वैज्ञानिक यांनी सांगितले की अद्याप या लघुग्रहाबद्दल बरेच लोकांना माहिती नव्हते, पण आता सर्वांना त्याबद्दल माहिती होईल.