युरोपात भेंडी भाजीसाठी नव्हे तर जेवणानंतर कच्ची खाण्यासाठी वापरतात.. जाणून घ्या कारण..
भेंडी हे भाजीपाला पीक मूळचे दक्षिण आफ्रिकेतील किंवा आशिया खंडातील मानले जाते. भेंडी ही वर्षायू वनस्पती माल्व्हेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव अबेलमोशस एस्कुलेंटस आहे. कापूस व जास्वंद या वनस्पतीदेखील या कुलात येतात. जगातील सर्व उष्ण प्रदेशांत भाजीसाठी तिची लागवड केली जाते. भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. भेंडीमध्ये विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात.
भेंडीमधे फार मोठ्या प्रमाणात ॲन्टीऑक्सिडेंट असतात, त्यामुळेच मानवी शरीरातील टाॅक्झीन बाहेर काढण्यासाठी भेंडीचा आहारात वापर अनिवार्य आहे. भारतातून युरोपियन देशात निर्यात होणाऱ्या भेंडीचा अधिकतर उपयोग, भाजीसाठी होत नसून, युरोपियन हेल्थ काॅन्शियस पब्लिक जेवणानंतर 3 – 4 भेंडी कच्ची खातात. जेणेकरुन बाॅडीतील टाॅक्झीन बाहेर पडावे. तसेच, जे लोक स्मोकिंग करतात, त्याच्या बाॅडीतील आतड्यांवर धुरामुळे ऑक्सीडेशन फार मोठ्या प्रमाणात होते. याचेच रूपांतर कालांतराने अल्सर / कॅन्सर अशा आजारात होते. अशा लोकांसाठी ॲन्टीऑक्सिडेंट म्हणून भेंडीचे सेवन अतिशय उपयुक्त आहे. भारतातील सर्वच वयोगटातील लोक ॲलोपॅथी औषधी सेवन करतात. अनेक कुटुंब मधुमेह, रक्तदाब, ॲसिडीटी, युरिक ॲसिड अशा असंख्य आजारांनी ग्रासलेले आहेत. कोणत्याही आजारावर घेतलेली ॲलोपॅथीची औषधी मानवी शरीरात शिल्लक राहून शरीरात ऑक्सीडेशन घडवून आणू शकतात. त्यांना बाहेर काढण्यासाठी भेंडीची आहारात अत्यंत गरज आहे. अशा लोकांनी चार ते सहा महीने दररोज 4 – 5 कच्ची भेंडी किंवा भेंडीची भाजी खाल्ल्यास 100 % फायदा होईल.
महत्वाची सूचना: ज्या लोकांना युरीनस्टोन / किडनी स्टोन चा त्रास असेल, अशा लोकांनी भेंडी खातांना त्यातील बिया काढलेल्या भेंडीचा आहारात उपयोग करावा.
भेंडी खाण्याचे फायदे
∆ भेंडी सेवन केल्याने कॅन्सरची शक्यता कमी असते
∆ भेंडी हृदयाला देखील स्वस्थ ठेवते
∆ मधुमेह होण्याची शक्यता नसते
∆ भेंडी ॲनिमियामध्ये फारच लाभदायक असते
∆ पोटफुगी, बद्धकोष्ट, पोट दुखणे आणि गॅससारख्या समस्या होत नाहीत
∆ हाडे मजबूत होतात
∆ वजन घटण्यास मदत होते
∆ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
∆ मेंदूचे कार्य सुधारते
∆ गरोदर स्त्रियांसाठी उत्तम
∆ तजेलदार त्वचेसाठी – भेंडीमध्ये असणाऱ्या विटॅमीन ए, सी, प्लोएट आणि कॅल्शिअम असते. ही सर्व विटॅमीन त्वचेसाठी फायद्याची ठरु शकतात.
∆ डोळ्यांची निगा – भेंडीमध्ये व्हिटॅमिन-ए, बीटा कॅरोटीन आणि एंटी-ऑक्सीडेंट्सने भरपूर असते, जी सेल्युलर चयापचयाने उत्पन्न झालेले मुक्त कणांना समाप्त करण्यात सहायक असते. हे कण नेत्रहीनतेसाठी जबाबदार असतात. त्याशिवाय भेंडी मोतीबिंदूपासून देखील बचाव करण्यास उपयुक्त ठरते.
Nutrition facts :-
Sources include: USDA
Amount Per 100 grams
Calories 33
% Daily Value*
Total Fat 0.2 g 0%
Saturated fat 0 g 0%
Cholesterol 0 mg 0%
Sodium 7 mg 0%
Potassium 299 mg 8%
Total Carbohydrate 7 g 2%
Dietary fiber 3.2 g 12%
Sugar 1.5 g
Protein 1.9 g 3%
Vitamin C 38%
Calcium 8%
Iron 3% Vitamin D 0%
Vitamin B-6 10% Cobalamin 0%
Magnesium 14%