आपल्या रोजच्या जेवणात भेंडीची भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. मात्र भेंडीचे उत्पादन करताना कीटक, रोग आणि नेमेटोड्सचा फार त्रास होतो व कधीकधी तर शेतकऱ्याचे खूपच नुकसान होते. भेंडीची साल नरम असते हे एक आणि तिचे पीक दमट हवामानात घेतले जाते हे दुसरे कारण ज्यामुळे त्यावर कीडकीटकांचा चटकन हल्ला होतो आणि 35-40% पर्यंत नुकसान होऊ शकते.
कीडनाशकांच्या अति वापरामुळे उद्भवणारे प्रश्न
किडीपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी भेंडीवर मोठ्या प्रमाणात कीडनाशके इ. फवारली जातात. मात्र ह्यामुळे
- कमी मुदतीत तयार होणार्याम भेंडीमध्ये ह्या औषधांचे अंश नक्कीच शिल्लक राहतात आणि त्याचे वाईट परिणाम खाणार्याच्या प्रकृतीवर होतात.
- रासायनिक कीडनाशके सतत वापरल्यास किडींनाही त्यांची सवय होते आणि ते त्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे तेच रोग पुन्हा उद्भवतात शिवाय एकंदर पर्यावरणावर व इतर वनस्पतींवर घातक परिणाम होतात.
मुख्य किडी
तुडतुडे / लीफ हॉपर:
लीफ हॉपर व त्यांच्या अळ्या हिरव्या रंगाच्या असतात.ते पानावर तिरक्या रेषेत हल्ला करतात व पाने पिवळी पडून दुमडली जातात. रोग गंभीर बनल्यास पाने विटकरी रंगाची होऊन चुरगळतात.
खोड व फळे पोखरणारे किडे:
ह्यांच्या अळ्या रोपट्यांच्या फुटव्यांतच वरून खाली भोके पाडून ठेवतात व झाड मरतुकडे बनते. सुरकुतलेले व निस्तेज फुटवे हे अगदी नेहमीचे लक्षण आहे. त्यानंतर ह्या अळ्या फळांमध्ये घुसल्याने ती वेडीवाकडी होऊन कोणी गिर्हाीइक मिळणे अशक्यच असते.
लाल कोळी:
ह्यांच्या अळ्या हिरवट लाल तर मोठे कोळी लंबगोलाकार व विटकरी रंगाचे असतात. लाल कोळी पानाच्या खालच्या पृष्ठभागावर हल्ला करतात. ह्यामुळे पाने दुमडली व अखेर चुरगाळली जातात/p>
पिवळ्या शिरांच्या नक्षीचा रोग:
पानावर पिवळ्या शिरांचे जाळे तयार होते व त्यात मधेमधे पानाचा हिरवा रंग दिसतो. नंतर मात्र पूर्ण पानच पिवळे पडते. पांढर्याा माशीमार्फत पसरणारा हा रोग उत्पादकाच्या दृष्टीने फारच खर्चिक ठरतो.
मुळावर गाठी आणणारा किडा:
ह्यामुळे मुळांवर गाठी तयार होतात. झाडाची एकंदर वाढ खुंटते. ही कीड सूक्ष्म असते व जमिनीत राहून वनस्पतिजन्य पदार्थांवर जगते
एकात्मिक कीड–व्यवस्थापन पद्धती
- YVMV रोधक हायब्रीड जाती, विशेषतः खरीप हंगामात, लावणे – उदा. मखमली, तुलसी, अनुपमा-१ किंवा सन-४० इ.
- खोड व फळ पोखरणारी कीड दूर ठेवण्यासाठी शेताच्या बांधावर मका किंवा ज्वारीसारखे तटरक्षक पीक घ्यावे.
- पांढर्यास माशा चिकटून बसाव्या ह्यासाठी डेल्टा व पिवळे चिकट सापळे ठेवा.
- किडे खाणार्या पक्ष्यांनी शेताला भेट द्यावी ह्यासाठी १०/ एकर या प्रमाणात छोटी मचाणे उभारा म्हणजे त्यांना त्यावर उतरता येईल.
- लीफ हॉपर, पांढरी माशी, माइट्स आणि ऍफिड्सना दूर ठेवण्यासाठी ५% एनएसकेई च्या दोन-तीन फवारण्या, आळीपाळीने, कीटकनाशकांसोबत द्या. ईटीएलची पातळी (प्रत्येक झाडावर जास्तीतजास्त 5 हॉपर) ओलांडली गेल्यास इमिडाक्रोपिल १७.८ एसएलची फवारणी १५० मिली/हेक्टरप्रमाणे करा. ह्याने इतर शोषक किडीही दूर राहतील.
- इरियास व्हायटेला ही माशी दूर ठेवण्यासाठी फेरोमोन तत्त्वावर काम करणारे सापळे २/ एकर या प्रमाणे बसवा. दर १५-२० दिवसांनंतर सापळ्यांतील आमिष बदला.
- खोड व फळाला भोके पाडणार्याम किड्यांच्या अंड्यांना खाऊन जगणार्याक (एग पॅरासॉइड) ट्रायकोडर्मा चिलोनिस चा वापर १-१.५ लाख/ हे ह्या प्रमाणात, पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी, दर आठवड्यानंतर ४-५ वेळा करा. किडींचे प्रमाण ईटीएल पातळीच्या (५.३ % संसर्ग) वर राहिल्यास सायपरमेथ्रिन २५ ईसी, २०० g a.i /हे या प्रमाणात वापरा.
- YVMV ने ग्रस्त झाडे आढळल्यास ती नष्ट करा.
- खोडकिड्याने पोखरलेले फुटवे व फळे वारंवार वेचून नष्ट करा
- फ हॉपर, पांढरी माशी, माइट्स आणि ऍफिड्सना दूर ठेवण्यासाठी कडुनिंबावर आधारित रासायनिक खतांचा वापर करा – उदा. इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल, १५० मिली/हेक्टर, सायपरमेथ्रिन २५ ईसी, २०० g a.i/हे (०.००५%), क्विनॉलफॉस २५ ईसी, ०.०५% अथवा प्रोपर्गाइट. ५७ ईसी, ०.१% इ
नैसर्गिक शत्रू (फायदेशीर किडे)
काय करावे आणि करू नये?
हे करा
हे करू नका
- वेळेवर पेरणी
- शेताची स्वच्छता
- दरवेळी ताजा निंबोणीचा अर्क (NSKE) वापरणे.
- गरज असेल तेव्हाच कीडनाशकांचा वापर
- फळे वापरण्याआधी धुणे
- कीडनाशकाचा डोस सांगितल्यापेक्षा जास्त वापरणे
- एकाच प्रकारचे कीडनाशक पुनःपुन्हा वापरणे
- दोन कीडनाशकांचे मिश्रण करणे
- भाज्यांवर मोनोक्रोटोफॉससारखी जहाल कीडनाशके वापरणे
- काढणीआधी कीडनाशके वापरणे
- कीडनाशक फवारल्यानंतर 3-4 दिवस न थांबता लगेचच फळे खाणे
स्रोत: एकात्मिक कीड-व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय केंद्राची विस्तारित पुस्तिका (ICAR) पुसा संकुल, नवी दिल्ली 110 012