लोणी, माचला गावाची बियाणे बँकेकडे वाटचाल
बुऱ्हानपूर अंकलेश्वर मार्गावरील लोणी ( जि. जळगांव ) हे गांव रस्त्यालगत असून बौगोलिक दृष्ट्या समृध्द आहे तसेच जवळच सातपुडा पर्वताचा पायथा लाभलेला,शिवारातील जमीन व पाणी मुळे शेतकरी संपन्न झालेला आहे. या गावातील शेतकरी खरीप हंगामात कापूस, केळी व भाजीपाला पिके घेतात त्याचप्रमाणे – रब्बी हंगामात हरभरा, गहू आणि इतर पिकांची पारंपारीक पध्दतीने लागवड होते. पाल येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनने काही शेतकरी उन्हाळी भुईमुग लागवडी कडे वळले असता लोणी गांव भुईमुग उत्पादनात अव्वल ठरत आहे.
गावांची निवड महत्त्वाची –
भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली व्दारे अटारी क्षेत्रीय कार्यालय,पुणे यांच्या वतीने पाल येथील कृषी विज्ञान केंद्राची भुईमुग बिजौत्पादन कार्यक्रम करिता निवड झालेली असून जळगांव जिल्ह्यात व राज्यात इतर ठिकाणी बियाणे उपलब्ध करून देण्याची संधी प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने यंदाच्या उन्हाळी पिक प्रात्यक्षिक कार्यक्रम अंतर्गत चोपडा तालुक्यातील लोणी व माचला या गांवांची निवड भुईमुग बिजौतापाद्न साठी करण्यात आली.लोणी येथील प्रगतीशील शेतकरी श्री.नरेंद्र मधुकर पाटील यांच्यासह एकूण २५ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली यामध्ये माचला येथून ७ एकरावर व लोणी येथे १८ एकरावर प्रथम दर्शनी समूह पंक्ती पिक प्रात्यक्षिक कार्यक्रम साठी भुईमुग पिकाचे एकात्मिक लागवड तंत्रज्ञान राबविण्यात आले.
पाल के व्ही के मार्फत तंत्रज्ञानाचा प्रसार –
कृषी विज्ञान केंद्रा मार्फत तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने निवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले तसेच एकात्मिक लागवड तंत्रज्ञान अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबीची माहिती देण्यात आली कि ज्या मुले शात्कार्यांना भुईमुग लागवड करण्यास मदत झाली अन्नद्व्रे व्यवस्थापन,कीड रोग नियत्रण,पाणी व्य्वस्थ्पण,अंतर मशागत या विषयी सविस्तर मार्गदर्शन प्रशिक्षण,क्षेत्र भेट व चीक्स्त्या भेट माध्यमातून तांत्रिक माहिती वरवर पुरविण्यात आली.
आवश्यक निविष्ठा चा पुरवठा-
एकूण २५ एकरावर प्रात्याक्षिके राबविण्यात आली यामध्ये निवड केलेल्या शेतकऱ्यांना एकर क्षेत्र एकात्मिक पिक व्यवस्थापनातील आवश्यक निविष्ठानाचा पुरवठा करण्यात आला.
अ.क्र. | निविष्ठा | विवरण |
बियाणे | ६० किलो शेंग (३५ ते ३८ बियाणे ) | वाण- फुले भारती |
बीज प्रक्रिया | २५०ग्राम रायझोबियम व पी एस बी | (जीवाणू संवर्धक खते ) |
सूक्ष्म अन्नद्रवे | १० किलो | झिंक सल्फेट चा पुरवठा होणे साठी |
पिवळे चिकट सापळे | ०५ सापळे प्रती एकर | कीड नियत्रण व्हावे करिता |
५%निमार्क, | २० लिटर | कीड नियत्रण व्हावे करिता |
जैविक बुरशीनाशक | १ किलो | रोग व्यवस्थापन होणेसाठी |
बदल महत्वाचा ठरला :-
पारंपारिक पद्धतीने भुईमुग लागवड करत असतांना आलेले अनुभव व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड याची योग्य रित्या सांगड घालून पाल के व्ही के मार्फत प्रबोधन केल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान कारक उत्पन्न मिळवले आहे .बीजप्रक्रिया केल्यामुळे उगवण चांगली झाली तसेच सुरुवातीला रासायनिक किडनाशांकाचा वापर न करता जैविक कीडनाशकाचा वापर केल्यामुळे खर्चात बचत झाली.प्रती एकर झाडांची संख्या योग्य राखली गेली,कीड व रोगांचे वेळेवर नियत्रण झाले,सूक्ष्म अन्न द्रव्यांचा वापर मुळे पिक जोमाने वाढून सशक्त राहिले.
एकामेंका सहाय्य करु अवघे धरु सुंपथ :-
लोणी गावातील शेतकरी वेगवेगळे पिके घेत असतील तरी एकमेकांना सहकार्य करतात ज्या मुळे विचारांची देवाण घेवाण होते व शेतीला लागणाऱ्या निविष्ठा एकत्रित आणल्यामुळे खर्चात बचत होते.परिसरातील सर्व शेतकरी मदतीची भूमिका ठेवून असतात म्हणून भुईमुग प्रात्यक्षिक कार्यक्रम व्दारे भरघोस उत्पन्न मिळू शकल्याचे शेतकरी सांगतात.
असे केले पीक नियोजन :-
- नोव्हेंबर अखेरीस शेतकर्यांची निवड.
- के व्ही के मार्फत निवड केलेल्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण व बियाणे सह निविष्ठा वाटप.
- डिसेंबर अखेरीस व जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस पेरणीला सुरुवात.
- (काही शेतकऱ्यांनी वाफा + तुषार सिंचन पद्धत व इतरांनी वाफा + ठिंबक सिंचन पद्धतीचा वापर केला )
- पेरणी करते वेळेस बीज प्रक्रिया चे प्रात्यक्षिक व त्या व्दारे बीज प्रक्रिया चे महत्व पटवून दिले.
- तण नियत्रण करिता अंतर मशागत
- चीकीत्य्सा भेट च्या माध्यमातून कीड व रोगांचे सर्वेषण व उपाय योजना बाबत मार्गदर्शन
- क्षेत्र भेट आयोजन व शेतावरील प्रशिक्षण व्दारे मार्गदर्शन
- कीड व रोग व्यवस्थापन करिता निमार्क व जैविक कीडनाशकांचा वापर
- सुक्ष्म अन्नद्रव्ये वापरून योग्य खत व्यवस्थापन
- ५ पिवळे चिकट सापळ्यांचा प्रती एकर उभारणी
- तूषार सिंचन व ठिंब क सिंचन व्दारे पाणी व्यवस्थापन
- १५ मे पासून काढणीस सुरुवात
- प्रती एकर सर्वसाधारण पणे २७० डब्बे (एक डब्बा =१०किलो ओली शेंग ) मिळाली
- शेतकरी काय म्हणतात-
एकात्मिक पिक लागवड तंत्रज्ञान चा वापर केल्यामुळे अधिक उत्पादन मिळाले व पिक उत्पादन खर्चहि कमी झाला तसेच जैविक कीड नाशकांचा वापर केल्यामुळे कीड रोग नियत्रण करण्यासाठी मदत झाली.- पंकज पाटील,माचला
फुले भारती हे भुईमुग उच्च उत्पादन देणारे आहे कमी पाण्यत तसेच तूषार सिंचन वापर करून मला एकरी २७ किंव उत्पन्न मिळाले आहे.केउशी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तांत्रिक माहिती प्राप्त झाल्या मुले लागवड पद्धतीत बदल ने फायदा झाला.
– श्री.दीपक पाटील,माचला
लोकडा उन च्या काळातही मोबाईल व्हात्स अप च्या मध्य तून वेळोवेळी कीड व रोग बाबत मार्गदर्शन प्राप्त झाले व आधुनिक तंत्रज्ञांचा वापर केल्या मुळे सर्व शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळेल आहे.
– नरेंद्र पाटील,लोणी
शास्त्रज्ञ काय म्हणतात-
योग्य जातीचे निवड,बीज प्रक्रिया,संतीलीत खंतच वापर,पाण्याचे योग्य नियोजन तसेच कीड व रोगांचे सर्वेक्षण करून वेळीच केलेई उपाययोजना या पंचसूत्री मुळे पिक उत्पादनातील खर्च कमी झाला असून अपेक्षित उत्पादन प्राप्त झाले आहे
.-प्रा.महेश महाजन (शास्त्रज्ञ-पिक सरंक्षण,कृषी विज्ञान केंद्र,पाल जि-जळगांव)
सचिन धोंडु बोरसे