• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

तयारी खरीपाची …!

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in तांत्रिक, हॅपनिंग
0
तयारी खरीपाची …!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पीक उत्पादनवाढीसाठी ठिबक सिंचन महत्वाचा घटक
पीक उत्पादनात पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पिकाच्या वाढीवर व पर्यायाने उत्पादनावर गरजेपेक्षा की अथवा अधिक पाणी दिल्यास अनिष्ट परिणाम होतो. याकरिता पिकासाठी पाण्याचे योग्य नियोजन करणे जरूरीचे आहे. पाण्याचे नियोजन हे प्रमुख्याने पीक प्रकार, जमिनीचा प्रकार, पिकाच्या वाढीच्या अवस्था हवामान व हंगाम या बाबींवर अवलंबून आहे. पाण्याचे योग्य नियोजन करणे म्हणजे एखाद्या पिकास हंगामानुसार व त्याच्या गरजेनुसार किती पाणी द्यावे ? पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याच्या किती पाळ्या व प्रत्येक पाळीस किती पाणी द्यावे ? पाणी कसे द्यावे ? या सर्व गोष्टींचा समावेश होतो. उपलब्ध पाण्याचा शेतीसाठी योग्य पद्धतीने वापर व्हावा यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती ठिबक सिंचन यांचा प्राधान्याने वापर व्हावयास पाहिजे.


ठिबक सिंचन हि पिकांना पाणी देण्याची एक आधुनिक पद्धत आहे. या पद्धतीत जमीन, पाणी, हवामान व पिक इत्यदी बाबींचा विचार करून पिकास लागणारे पाणी बंद नळ्यांमार्फत ( लॅटरल्स ) तोट्याद्वारे ( ड्रिपर्स ) कमी दाबाने व नियमित दराने थेंब – थेंब स्वरुपात मुळांच्या कार्यक्षम कक्षेत समप्रमाणात देता येते. या पद्धतीत पाणी देण्याचा वेग हा जमिनीच्या पाणी मुरण्याच्या वेगापेक्षा कमी असल्याने मुळांच्या कार्यक्षेत्रात हवा व पाणी यांचे योग्य संतुलन राखले जावून पिकांची वाढ जोमदार होते. पिकास गरजेइतकेच पाणी दिले जात असल्याने पाण्याचा अपव्यय टळतो. खतांची कार्यक्षमता वाढते व जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची चांगली वाढ होऊन दिलेल्या पाण्याचा जमिनीवर अनिष्ट परिणाम न होता पिकाची उत्पादकता प्रचलित सिंचन पद्धतीपेक्षा अधिक प्रमाणात वाढते.

  • पाण्याची बचत व पाण्याचा कार्यक्षमरित्या वापर
    ठिबक सिंचन पद्धतीत पिकाच्या मुळाना बंद नळ्यामार्फत ( लॅटरल्स ) पाणी दिले जाते. त्यामुळे पाणी वहन अपव्यय टळतो. पिकाच्या एकूण क्षेत्रापैकी ठराविक मर्यादित क्षेत्रास पाणी दिले जाते. पाणी मुळांच्या कार्यक्षेत्रात दिल्याने पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. तसेच पाण्याचा कार्यक्षम मुळांच्या खाली जाऊन होणारा नाश टाळला जातो. इत्यादी कारणांमुळे पाण्याची ४० ते ६० टक्के बचत होऊन पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.
  • पिकाची उत्पादकता व गुणवत्तेत वाढ
    पिकास वारंवार गरजेनुसार पाणी दिल्याने मुळांच्या कार्यक्षेत्रात नेहमी ओलावा राहत असल्याने पिकास पाण्याचा ताण सोसावा लागत नाही. यामुळे पिकाची जलद व जोमाने वाढ होते, पर्यायाने उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ होते. तसेच पिकाच्या उत्पादनाची परत सुधारते. त्यामुळे बाजारभाव चांगला मिळून आर्थिक फायदा होतो.
  • खतांचा कार्यक्षमरित्या वापर
    ठिबक सिंचनाद्वारे पिकांना योग्य पाण्याची मात्रा व त्यातून योग्य खतांचा पुरवठामुळांच्या कार्यक्षेत्रातच केला जात असल्याने निचऱ्याद्वारे होणारा खतांचा अपव्यय टाळला जातो. पिकांना समप्रमाणात खते देता येतात. त्यामुळे खतांचा वापर कार्यक्षमरित्या व परिणामकारक होतो. पर्यायाने खताच्या मात्रेत २५ ते ५० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते.
  • आंतरमशागतीवरील खर्च कमी
    एकूण क्षेत्रापैकी ठराविक क्षेत्र ओळीत केल्याने व इतर भाग कोरडा राहत असल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव अतिशय कमी आढळतो. परिणामी आंतरमशागतीवरील खर्चात ३० ते ४० टक्के बचत होऊ शकते.
  • क्षारयुक्त पाण्याचा वापर
    पिकाच्या मुळाभोवती सातत्याने योग्य प्रमाणात ओलावा रहात असल्याने मचूळ पाण्याचा वापर ठिबक सिंचनाद्वारे केला असता त्याचा विपरीत परिणाम पिकांवर न होता जमिनीतील असलेले क्षार हे कार्यक्षम मुळांच्या क्षेत्रापासून दूर लोटले जातात आणि त्यामुळे पिकांवर अनिष्ट परिणाम होत नाही.
  • पिक पक्वतेच्या कालावधीत घट
    ठिबक सिंचनाद्वारे पाण्याचे आणि खताचे पिकास योग्य नियोजन केल्यास पिके लवकर फुलावर येतात आणि लवकर काढणीस तयार होतात. त्यामुळे पिक पक्वतेचा कालावधी कमी होतो. विशेषतः केळीसारखे पिक पारंपारिक पद्धतीपेक्षा ३० ते ६० दिवस आणि ऊसासारखे पिक ३० ते ४० दिवसांनी लवकर तयार होते.
  • याव्यतिरिक्त विजेची बचत, जमिनीची कमी धूप, पिकांवरील रोग व किडींचा कमी प्रादुर्भाव, मजूर खर्चात बचत इत्यादी फायदे मिळू शकतात.
    ठिंबक सिंचन पद्धतीच्या मर्यादा
  • संचावरील मुलभूत खर्च अधिक
    ठिबक संचात विविध घटकांचा उदा : इलेक्ट्रिक मोटार, नियंत्रण यंत्रणा, पाणी वाहून नेणारे पी.व्ही.सी. पाईप्सचे जाळे, उपनळ्या, तोट्या, खत संयंत्र इत्यादी. चा समावेश होतो. त्यामुळे प्रति हेक्टरी एकूण भांडवली खर्च प्रारंभी अधिक असतो.
  • संचाची निगा
    अनेकवेळा मुख्य व उपवाहिनी तसेच उपनळ्या ज्या ठिकाणी जोडल्या जातात तेथे पाण्याच्या जास्त दाबामुळे गळती होते. त्याचप्रमाणे गाळण यंत्रणा सक्षम नसेल तर वारंवार तोट्या बंद पडतात. पाणी क्षारयुक्त असेल, तर उपनळ्या व तोट्या कार्यक्षमतेने कार्य करीत नाहीत. यासाठी संचाची वारंवार निगा ठेवणे आवश्यक असते.
  • उंदीर / खारींचा उपद्रव
    काही भागात उंदरांमुळे अथवा खारींमुळे उपनळ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.
  • आधुनिक यंत्राच्या माहितीचा अभाव
    ठिबक सिंचन संच बसविल्यानंतर पिकास तोट्या किती बसवाव्यात, पाण्याची एकूण मात्र किती द्यावी, संच किती वेळ चालवावा, खते कशी द्यावीत, संचाची निगा कशी राखावी याबाबतीत बर्याच वेळा माहिती उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी येतात.

सध्या पावसाच प्रमाण हे अनियमित व अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये पाणी वाटपाची कार्यक्षमता कमी आहे व पाण्याचा अपव्यय सुद्धा जास्त होतो. त्यामुळे ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन पद्धती वापरणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये २५ ते ६० टक्के पाण्याची बचत होते व ३० टक्क्यापर्यंत उत्पादनात वाढ होते. जमीन, पाणी व हवा यांची उत्तम सांगड घातली गेल्याने उत्पादनाची परत सुद्धा सुधारते. तसेच कोणत्याही जमिनीवर त्याचा अवलंब करता येतो. यामधून खते देता येत असल्यामुळे खत वापर क्षमता जवळपास दुप्पटीने वाढते. यासर्व बाबतीत येणारा मजुरांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

Share this:

  • Facebook
  • X
Previous Post

हीच ती वेळ…! मे महिना माती परिक्षणाची योग्य वेळ

Next Post

खरीप हंगामासाठी योग्य खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी – कृषिमंत्री दादाजी भुसे

Next Post
खरीप हंगामासाठी योग्य खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी – कृषिमंत्री दादाजी भुसे

खरीप हंगामासाठी योग्य खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी - कृषिमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.