• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ग्रेपनेट अंतर्गत द्राक्षांची निर्यात… 45 हजार 393 द्राक्ष उत्पादकांनी केली नोंदणी – फलोत्पादन संचालक डॉ कैलास मोते

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 30, 2021
in हॅपनिंग
0
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे (प्रतिनिधी) ः राज्यातून फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशांच्या किडनाशक उर्वरित अंश व किडरोग मुक्तची हमी देण्यासाठी सन 2004-05 पासून ग्रेपनेट या कार्यप्रणालीची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. सध्या ग्रेपनेट अंतर्गत 45 हजार 393 द्राक्ष बागायतदारांनी नोंदणी केलेली असून चालू वर्षी 1 लाख 95 हजार मेट्रीक टन द्राक्षांची निर्यात झाली असल्याची माहिती फलोत्पादन संचालक डॉ कैलास मोते यांनी दिली.

नाशिक मध्ये 11 डिसेंबरला द्राक्ष निर्यात संधी एक दिवसीय कार्यशाळा

डॉ मोते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादन पिकाचे क्षेत्र, उत्पादन व निर्यातीमध्ये अग्रेसर आहे. राज्यातून मोठ्या प्रमाणात विशेषत: द्राक्ष, डाळींब, आंबा, केळी, संत्रा व इतर फळ पिकाची तसेच कांदा, हिरवी मिरची, भेंडी व इतर भाजीपाला पिकांची युरोपीयन देशासह इतर विविध देशांमध्ये निर्यात केली जाते. ग्रेपनेटच्या धर्तीवरच राज्यात आंब्यासाठी मँगोनेट, डाळिंबांसाठी अनारनेट, भाजीपाल्यासाठी व्हेजनेट, संत्रा, लिंबू व मोसंबीसाठी सीट्रसनेट या ट्रेसेबीलीटी नेटची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन जास्तीत जास्त निर्यातक्षम बागांची नोंदणी करण्यात येते. सद्यःस्थितीत एकूण देशात 72 हजार व राज्यात 63 हजार 388 निर्यातक्षम बागांची नोंदणी झाली आहे. एकूण देशाच्या 80 टक्के निर्यातक्षम बागांची नोंदणी महाराष्ट्रात झालेली आहे. फळे व भाजीपाला बागांच्या निर्यातीकरिता निर्यातक्षम बागांची नोंदणी केलेल्या बागेतीलच माल निर्यातीसाठी बंधनकारक करण्यात आल्यामुळे त्याचा फायदा राज्यातील फळ व भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना होत आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य हे फलोत्पादन निर्यातीमध्ये देशात अग्रेसर आहे.

केळी, भाजीपाला निर्यात
राज्यातून केळीची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे केळीच्या निर्यातीला चालना देण्यासाठी अपेडाच्या मार्गदर्शनाखाली राज्यात जुलै-2021 पासून बनाना नेट, या कार्यप्रणालीद्वारे निर्यातक्षम केळी बागांची नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच भाजीपाला निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व स्थानिक बाजारपेठेत ग्राहकाला चांगल्या दर्जाचा भाजीपाला उपलब्ध होण्याकरिता 43 भाजीपाला पिकांचा व्हेजनेटमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी भाजीपाला पिकांची ऑनलाईन नोंदणी करीत आहेत. कोविडच्या काळात राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये सेवा चालू ठेवण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत कोव्हीड कालावधीमध्ये 8000 निर्यातक्षम फळ व भाजीपाला पिकांची अधिक नोंदणी करण्यात आलयाचेही डॉ मोते यांनी सांगितले.

निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यातील 12 जिल्ह्यात 16 अधिकार्‍यांना फायटोसॅनीटरी सर्टीफिकेट शेअरिंग थॉरिटी म्हणून केंद्राने अधिसूचित केलेले आहे. सदर अधिकार्‍यांमार्फत कृषि माल निर्यातीकरीता फायटोसॅनीटरी प्रमाणपत्र देण्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

कोव्हीड कालावधीमध्ये लॉकडाऊनमुळे बर्‍याचशा सेवा बंद करण्यात आल्या होत्या. परंतु केंद्र शासनाने कृषि व निर्यातीच्या सुविधा चालू ठेवण्यास परवानगी दिल्यामुळे तसेच निर्यातीकरीता फायटोसॅनीटरी प्रमाणीकरणाच्या सुविधा ऑनलाइनद्वारे 24 तास उपलब्ध केल्यामुळे राज्यातून फळ व भाजीपाला विविध देशांना निर्यात करणे शक्य झाले आहे. मागील वर्षाची तुलना केली असता, राज्यात कोव्हीड कालावधीमध्ये 1 लाख 32 हजार मेट्रीक टन फळ व भाजीपाल्याची अतिरिक्त निर्यात होऊन त्यामुळे एक हजार कोटी अतिरिक्त अधिकचे परकीय चलन देशाला प्राप्त झाले आहे. कृषि मालाच्या निर्यातीमध्ये ब्रँडिंगला विशेष महत्व प्राप्त झालेले असल्यामुळे फलोत्पादन विभागामार्फत खास मोहीम राबवून राज्यातील 20 फळे व भाजीपाला पिकांना जी. आय. मानांकनाचा दर्जा प्राप्त करुन देण्यात आलेला आहे. जी. आय. मानांकन प्राप्त पिकांचे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांनी अधिकृत वापराकरिता म्हणून जीओग्राफीकल रजीस्टर ऑफीस, चेन्नई यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी सन 2020-21 या कोव्हीड कालावधी मध्ये सुध्दा खास मोहीम राबवून जवळपास 5000 शेतकर्‍यांची अधिकृत वापरकर्ता नोंदणी करण्याची विशेष मोहीम राबवून कार्यवाही करण्यात आली आहे. त्याचा फायदा राज्यातील फळे व भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांना निर्यातीमध्ये होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ऑनलाइनद्वारे प्रशिक्षणाचा लाभ
सन 2021 मध्ये निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकांची ट्रेसेबीलीटी नेटद्वारे नोंदणी करण्याकरिता 1.00 लाखांचे लक्षांक निर्धारित करण्यात आलेले आहे. तसेच कृषि माल निर्यातीकरिता अनुसरावयाच्या कार्यपध्दती निर्यातक्षम दर्जाच्या उत्पादन टेसेबीलीटी नेट किड नाशक उर्वरित अंश हमी याबाबत विभागनिहाय निर्यातक्षम बागांची निवड करुन प्रादेशिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (रामेती) जास्तीत जास्त शेतकरी व अधिकार्‍यांना ऑनलाइनद्वारे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कृषि माल निर्यातीकरीता फायटोसॅनीटरी प्रमाणिकरणाबाबत येणार्‍या अडीअडचणींबाबत दर महिन्याला लातुर, पुणे औरंगाबाद, अमरावती, नागपूर, ठाणे, नाशिक, कोल्हापूर सर्व बागायतदार संस्थांची कृषी आयुक्त धीरजकुमार व संचालक यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन बैठक आयोजित करुन वेळीच योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. राज्यातून जास्तीत जास्त फळ व भाजीपाल्याची निर्यात होण्याकरिता खास प्रयत्न करण्यात येत असून फळबागायतदारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ मोते यांनी केले.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ChennaiExportGeographical Register OfficeGrapenetHorticulture Director Dr. Kailas Moteकृषी आयुक्त धीरजकुमारग्रेपनेटचेन्नईजी. आय. मानांकनजीओग्राफीकल रजीस्टर ऑफीसनिर्यातफलोत्पादन संचालक डॉ कैलास मोतेरामेती
Previous Post

जमीन खरेदी विक्री तुकडेबंदी कायद्यांतर्गत जिल्हा दुय्यम निबंधकांना देण्यात आल्या या तीन सूचना..

Next Post

‘ई- नाम’ योजनेत महाराष्ट्रातील तब्बल १२ लाख १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग… २५७ शेती उत्पादक कंपन्याही सहभागी

Next Post
‘ई- नाम’ योजनेत महाराष्ट्रातील तब्बल १२ लाख १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग… २५७ शेती उत्पादक कंपन्याही सहभागी

'ई- नाम' योजनेत महाराष्ट्रातील तब्बल १२ लाख १० हजार शेतकऱ्यांचा सहभाग… २५७ शेती उत्पादक कंपन्याही सहभागी

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish